ऊस बेणे मळ्याचे व्यवस्थापन
शेतकऱ्यांनी उसाच्या कोणत्या जातीचे
बियाणे लावावे हे कारखान्यांनी भौगोलिक परिस्थिती, प्रचलित बियाणे मागणी आणि दुष्काळात टिकून राहतील अशा प्रजातींचा विचार करावा.. शक्यतो कोसी 671, को 86032 , कोव्हीएसआय 9805 व्हीएसआय 434 कोएम 0265 आणि कोव्हीएसआय 03102 या प्रजातीचे उत्पादन घ्यावे.
- चांगला निचरा होणारी मध्यम खोल काळी सुपीक जमीन निवडावी. ऊस लागणी अगोदर उभी आडवी नांगरट आणि रोटव्हेटच्या साहाय्याने जमीन भुसभुशीत करावी. प्रति एकर 20 टन शेणखत किंवा शिफारशीनुसार बायोकंपोस्टचा वापर करावा.
- हलक्या जमिनीत सरीतील अंतर 3.5 ते चार फूट ठेवावे किंवा जोड ओळ केल्यास 2.5 ु 5.0 फूट अंतर ठेवावे. मध्यम ते खोल भारी जमिनीत सरीतील अंतर 4.5 ते पाच फूट आणि जोड ओळ केल्यास 3.0 ु 6.0 फूट अंतर ठेवावे.
- पायाभूत बेणे प्लॉट किंवा नेहमीच्या उसातून बेणे प्लॉटची निवड करताना उसाचे बेणे जाड, सशक्त आणि रसरशीत असावे. डोळे फुगीर असावेत, जून किंवा निस्तेज नसावेत, बेण्यासाठी 10 ते 11 महिन्याचे प्लॉट निवडावेत, बेणे रोग आणि कीडमुक्त असावे, मुळ्या फुटलेला. पांक्षा फुटलेला किंवा तुरा आलेला प्लॉट निवडू नये.
- निवड केलेल्या प्लॉटमधून बेणे पाचट न साळता वाढे न तोडता लागणीच्या ठिकाणी आणून मगच साळून उसाच्या टिपऱ्या कराव्यात. बेणे धारदार कोयत्याने उभे राहून न तोडता ओंडक्यांवर खांडावे. बेणे खांडताना ऊस न पिचता डोळ्याच्या खालील भाग 2/3 आणि शेंड्याकडील 1/3 भाग राहील याची काळजी घ्यावी. बेणे काही कारणाने शिळे झाल्यास 500 ग्रॅम चुना प्रति 200 लिटर पाण्यात द्रावण तयार करून बेणे टिपऱ्या या द्रावणात 24 तास बुडवून ठेवून मगच लागण करावी.
- बेण्याद्वारे प्रसार होणाऱ्या रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 300 मि.लि. मॅलेथिऑन प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून बनविलेल्या द्रावणात बेणे टिपऱ्या 15 मिनिटे बुडवून बेणे प्रक्रिया करावी.
- ऊस लागणीचे वेळी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे द्रवरूप जिवाणू खत प्रत्येकी एक लिटर किंवा ऍझो-फॉस्फो द्रवरूप खत प्रति एकर एक लिटर या प्रमाणात शेणखतात मिसळून चळीत टाकून लागण करावी किंवा 250 लिटर पाण्यातून आळवणी करावी.
- बेणे मळा करताना लागवडीसाठी चांगले बेणे आणि सरी डोस (बेसल डोस), बेणे प्रक्रियेसाठी बुरशीनाशक व कीटकनाशक, जैविक खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये इ. निविष्ठांची उपलब्धता करावी.
- बेणे मळ्यासाठी निवड प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी करखान्याचे ऊस विकास अधिकारी, कृषी विभाग, व्हीएसआयचे शास्त्रज्ञ/तांत्रिक अधिकारी यांच्या मदतीने करावी.
- बेणे मळा साधारण 45 ते 60 दिवसांचा झाल्यानंतर प्रति एकर एक लिटर द्रवरूप ऍसिटोबॅक्टर 200 लिटर पाण्यात मिसळून उसाच्या पानांवर फवारणी करावी.
- बेणे मळा साधारण 70 ते 75 दिवसांचा झाल्यानंतर मल्टिमॅक्रोन्युट्रिएंट आणि मल्टिमायक्रोन्युट्रिएंट प्रति एकरी प्रत्येकी दोन लिटर प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून उसाच्या पानांवर फवारणी करावी. दुसरी फवारणी तीन लिटर प्रति 300 लिटर पाण्यात मिसळून एक महिन्याच्या अंतराने करावी.
एस.डी. रोकडे, शिंदेवाडी, जि.पुणे;
वैभव शेळके, पंढरपूर, जि. सोलापूर
- 020- 26902100
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट , पुणे
माहिती संदर्भ: अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.