प्रचलित सरी पद्धतीत जमिनीच्या मगदुराप्रमाणे 90 ते 100 सें.मी. रुंदीच्या सऱ्या पाडतात. (तक्ता क्र. 1) या पद्धतीत दोन सऱ्यांत ऊस लागवड करावी व पुढील एक सरी रिकामी ठेवावी, त्यामुळे उसाच्या दोन ओळीनंतर रिकामा पट्टा राहतो.
जमिनीचा प्रकार +जोडओळीतील अंतर (सें.मी.) +पट्ट्यातील अंतर (सें.मी)
जास्त खोलीची काळी जमीन +90 +180
मध्यम खोलीची जमीन +75 +150
ऊस पीक बारमाही असल्यामुळे हंगामानुसार प्रवाही सिंचन पद्धतीने सुरू, पूर्वहंगामी व आडसाली पिकासाठी अनुक्रमे 250, 275 व 350 सें.मी. पाण्याची गरज असते. हवामान, जमिनीचा प्रकार, जमिनीची खोली, पिकाचे वय इत्यादी घटकांवर प्रत्येक पाळीतील पाण्याची मात्रा अवलंबून असते. उसाला 25 टक्के सरीच्या बुडातील भाग ओला होईल एवढेच पाणी देणे गरजेचे असते.
"कटथ्रोट फ्ल्यूम' या पाणी मोजण्याच्या साधनाचा वापर करून उसाच्या पाण्यात बचत आणि उत्पादनात वाढ करता येते.
क) पिकाला पाणी केव्हा द्यावे?
जमिनीचा प्रकार +ऋतुमान +पाण्याच्या पाळीतील अंतर (दिवस)
भारी +पावसाळा हिवाळा उन्हाळा +26 20 13
मध्यम +पावसाळा हिवाळा उन्हाळा +18 14 09
हलकी +पावसाळा हिवाळा उन्हाळा +08 06 04
1) मे महिन्यातील उपलब्ध पाणी विचारात घेऊनच उसाचे क्षेत्र ठरवावे.
2) जमिनीचे सपाटीकरण करून उतार मर्यादित (0.3 ते 0.5 टक्का) ठेवावा.
3) लांब सरी पद्धतीमध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर कमी ठेवावे.
4) जास्त खोलीच्या भारी, मध्यम आणि हलक्या जमिनीत प्रत्येक सरीमधून उपलब्ध पाण्याचा प्रवाह अनुक्रमे 1 ते 1.5, 2 ते 2.5 आणि 2.5 ते 3 लि./ सेकंदाचा प्रवाह विभागून द्यावा.
5) पाचट आच्छादनामुळे पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वाढते. पाण्याच्या दहा पाळ्या वाचतात.
6) शेताच्या बाहेरच्या बाजूस साधारणपणे एक मीटर पट्ट्याचे पाचट काढू नये.
7) अति अवर्षण काळात पानांद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन (10 टक्के) सारख्या बाष्पीभवन विरोधी द्रावणाची 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
8) तणांचा बंदोबस्त वेळीच करावा.
9) अवर्षण काळात पाण्याची टंचाई जाणवत असल्यास नोव्हेंबरपासूनच पाण्याच्या प्रत्येक पाळीतील अंतर हळूहळू वाढवीत जावे. शक्य तेथे आंतरमशागत करावी. पिकाची मुळे खोलवर जाऊन अवर्षणास तोंड देण्यास समर्थ बनतात. अवर्षणग्रस्त परिस्थितीत पिकाला पोटॅश खताचा 25 टक्के हप्ता अधिक द्यावा. त्यामुळे उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट येत नाही.
10) दोन पाळ्यांतील अंतर तक्ता क्र. 2 मध्ये दर्शविल्याप्रमाणे ठेवावे.
11) प्रवाही सिंचनाचे मुख्य पाट व दांड स्वच्छ ठेवावे.
- महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊस शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर सुरू आहे. त्याची व्याप्ती अधिक ऊस क्षेत्रावर होण्याची आवश्यकता आहे. ती मोठ्या प्रमाणावर वाढविणे ही काळाची गरज आहे. ऊस शेतीसाठी सूक्ष्मनलिका (मायक्रोट्यूब) पद्धत, दाबनियंत्रण नसणारे ड्रीपर पद्धत, दाबनियंत्रण असणारे ड्रीपर्स पद्धत, लॅटरलच्या आत ड्रीपर्स असणारी (इनलाईन ड्रीप) पद्धती या चारपैकी एका ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करता येतो.
1) उत्पादनात वाढ - मुळांच्या कक्षेतील ओलावा (पाणी) व हवा यांचे योग्य प्रमाण साधले जाऊन उत्पादकता 25 ते 30 टक्के वाढते.
2) पाण्याची बचत - पिकाला त्याच्या आवश्यकतेनुसार हवे तेवढेच पाणी दिल्यामुळे 45 ते 50 टक्क्यांपर्यंत पाण्यात बचत होते.
3) पाण्यात विरघळणारी खते (युरिया व पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश) मुळांच्या सहवासात देता येतात व त्यामुळे खतांच्या मात्रेत 30 टक्के बचत होते.
4) तणांचा प्रादुर्भाव व कमी व पर्यायाने खुरपणीचा/ तणनाशकांचा खर्च कमी येतो.
5) रानबांधणीची आवश्यकता नाही.
6) जमीन सपाटीकरणाची आवश्यकता नसते.
7) पिकांच्या गरजेनुसारच पाणी दिल्यामुळे कालांतराने जमीन नापिक (खारवट, चोपण) होण्याची शक्यता नाही.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस शेतीत ठिबक सिंचनाच्या वापराच्या प्रयोगातील निष्कर्ष (सरी-वरंबा पद्धतीच्या तुलनेत)
उसासाठी एकूण देण्यात आलेले पाणी (हे. सें.मी.) +240 ते 300 +130 ते 150 +पाण्यात बचत - 45 ते 50 टक्के
ऊस उत्पादन (टन/हे.) +100 ते 110 +130 ते 145 +उत्पादनात वाढ - 25 ते 30 टक्के
पाणी वापर क्षमता (टन/हे. सें.मी.) +0.35 ते 0.40 +0.80 ते 1.0 +सरी वरंबा पद्धतीच्या तुलनेत ठिबक सिंचनाची पाणी वापर क्षमता 2 ते 2.5 पट जास्त
पाणी देण्याची कार्यक्षमता (%) +45 - 50 +90 ते 95 +पाणी देण्याच्या कार्यक्षमतेत 30 टक्के वाढ
रासायनिक खतमात्रा (कि.ग्रॅ./हे.) +250 - 115 - 115 +175 - 8- 81 +खतमात्रेत 30 टक्के बचत
योग्य रानबांधणी +लांब सरी/ पट्टा पद्धत +जोडओळ पट्टा पद्धत/ जास्त अंतरावरील (1.5 मी.) सरी पद्धत +जोड ओळ पद्धतीत 0.75 - 1.5 मी. अंतर मध्यम जमिनीसाठी तर 0.90 - 1.8 मी. अंतर जास्त खोलीच्या भारी जमिनीसाठी उपयुक्त
ऊस शेतीत योग्य ठिबक सिंचन पद्धत +-- +-- +पृष्ठभागावरील दाबनियंत्रित ठिबक व इनलाईन ठिबक पद्धत
नफा - खर्च गुणोत्तर +1 - 8 - 1 +2.5 - 1 +ऊस शेतीमध्ये तांत्रिक व आर्थिक दृष्ट्या ठिबक सिंचन किफायतशीर
भूपृष्ठांतर्गत (सबसरफेस) ठिबक सिंचन पद्धती
जमिनीखाली पिकांच्या मुळांच्या सहवासात थेंबा-थेंबाद्वारे सिंचन करण्याच्या पद्धतीला भूपृष्ठांतर्गत (सबसरफेस) ठिबक सिंचन असे म्हणतात. या पद्धतीतील घटक भूपृष्ठावरील ठिबक सिंचन पद्धतीप्रमाणे असून, इनलाईन इमिटिंग पाइप्स जमिनीखाली 10-15 सें.मी. खोलीपर्यंत घालून सर्व ठिकाणी सारख्या प्रवाहाने पाणी दिले जाते.
1) जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी होते. पाणी वापर क्षमता वाढते आणि पाण्यात बचत होते.
2) जमिनीचा पृष्ठभाग कोरडा राहिल्याने तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
3) इनलाईन इमिटिंग पाइप जमिनीत ठराविक खोलीवर (10 ते 15 सें.मी.) घातली असल्याने यांत्रिक पद्धतीने तोडणी करताना अडचण येत नाही.
4) मुळांजवळ गरजेएवढा ओलावा ठेवता येत असल्याने अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...