ऊस हे आपले प्रमुख नगदी पीक असून करार शेती असल्याने आपली जबाबदारी फक्त कमी खर्चात एकरी जास्तीत जास्त ८० ते १०० टन उत्पादन काढणे एव्हढीच आहे, पण असे घडत नाही. केवळ चुकीच्या व्यवस्थापनामुळे एकरी खर्च जास्त होतो आणि एकरी टनेजही अतिशय कमी मिळते.
ऊसशेतीत खर्चाच्या बाबी पुष्कळश्या आहेत. त्यातील प्रमुख बाब म्हणजे मजुरीचा खर्च. ऊसलागणीपासून ते ऊसातोडणीपर्यंत प्रत्येक काम मजुराकरवी जास्त मजुरीत करावे लागते. म्हणून संशोधकांनी याला पर्याय म्हणून ऊसलागणी यंत्र, ऊसतोडणी यंत्र, उसाच्या पाचटाचे तुकडे करणारे यंत्र. शिवाय
आंतरमशागतीसाठीची यंत्र शोधून काढली आहेत. ऊस उत्पादनात केवळ मजुरीवर ४० ते ४५ टक्के खर्च होतो.याला फाटा देण्यासाठी नवीन औजार यंत्राचा वापर केल्यास मशागतीवरचा खर्च २५ ते ३० टक्के कमी करून १२ ते १५ टक्के टनेजमध्ये वाढ होते. म्हणून ऊस शेतीत या यंत्राचा वापर हा करायलाच हवा. आणखी दुसरे म्हणजे बैलांचा आणि शेतमजुरांचा तुटवडा असून, खर्च मोठ्या प्रमाणात होतो. तो कमी करण्यासाठी यांत्रिकीकरण केलेच पाहिजे.
ऊसशेतीसाठी अनेक औजारे आणि यंत्रे उपयोगी आहेत. त्यामध्ये ऊसलागणी यंत्र अतिशय उपयुक्त आहे. हा प्लॅन्टर ४५ अश्वशक्तीचा ट्रॅक्टरचलित आहे. या प्लॅन्टरने चांगल्या दिवसात ५ – ६ एकर ऊसलागण करता येते. मजुराकरवी मळ्यातले बेणे तोडून वाडे खंडून पाचट साळून प्लॅन्टरला फक्त पुरवावे लागे. बेणेप्रक्रिया खत घालणे, बेण्याच्या पाहिजे तशा टिपऱ्या करून कोरडी लागण करणे हि सर्व कामे प्लॅन्टरने चांगल्या पद्धतीने करता येतात. ऊसउगवणीचे अनुभव आतिशय चांगले आहेत. द्रय्वार्सः ४ ते ५ मजुरांत दिवसाला
५ ते ६ एकर उसाची लागण प्लॅन्टरने होऊ शकल्याने केवळ मजुरीत ६२ टक्के बचत होते आणि कमी कालावधीत हंगामात वेळेवर लागण करणे शक्य होते.
दुसरे यंत्र आहे ऊसतोडणी यंत्र. दिवसेंदिवस ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. नव्हे हा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ तोडणीमुळे उसाचे गाळप होऊ शकलेले नाही. असे दरवर्षीच घडत असते. शिवाय खर्च अमाप होतो. वेळ लागतो. यासाठी उसाची वेळेवर तोडणी होऊन गाळप होण्यासाठी हार्वेस्टरचा चांगला उपयोग होतो. या चापर हार्वेस्टरमुळे ऊस जमिनीलगत योग्य प्रकारे तोडला जातो. लोळलेला ऊससुद्धा या चापर हार्वेस्टरणे चांगल्या प्रकारे तोडला जातो. मजुराकारवी तोडणीच्या खर्चापेक्षा निम्म्याने खर्च कमी होतो. तोडणी जलद गतीने होत असल्याने कारखान्यांना क्षमतेएवढा सतत ऊस पुरविणे शक्य होते. त्यामुळे इथून पुढे ऊसशेतीत ऊसतोडणीसाठी चपर हार्वेस्टरचा वापर अनिवार्य आहे.
उसाच्या पाचटीने व्यवस्थापन खर्चिक आणि किचकट काम असल्याने प्रत्येक जण सरसकट पाचट जाळून मौल्यवान सेंद्रिय खतांची राख करतात. म्हणजे आपणच आपल्या शेतीला तिनचं दिलल खत हिरावून घेतो. हि एक प्रकारी गद्दारीच म्हणावी लागेल. आपल्या संशोधकांनी याच्यावर संशोधन करून ट्रॅक्टरचलित पाचटीचे तुकडे करणारे यंत्र शोधून काढले आहे. अगदी थोडक्या वेळेत एकरात ४ ते ५ टन पाचटाचे बारीक तुकडे करून मातीत मिसळण्याचे महान काम या यंत्राद्वारे केले जाते. शिवाय ऊसखोड्व्यांच्या बुटक्या तोडण्याचे कामही वाचते. खोडवा चांगला फुटतो. आता हे यंत्र उपलब्ध आहे. याचा वापर करून मौल्यवान पाचट पुन्हा तुकड्याच्या रूपाने त्याचं जमिनीला द्या.
या यंत्राशिवाय ऊसशेतीसाठी सबस्वायलर, अंतरमशागतीची म्हणजे चाळणी – बांधणीची औजारे बैलचलीत ट्रॅक्टरचलित आणि पावर ट्रॅक्टरचलित आहेत. त्याचा वापर जरूर करावा.
एकंदरीत मजूर आणि मजुरी खर्चात बचत करण्यासाठी वेळेवर काम होण्यासाठी, दर्जेदार होण्यासाठी आणि उत्पादनवाढीसाठी या यंत्रे अगर औजाराचे महत्व ओळखून त्यांचा जरुर वापर करून फायदा करून घ्यावा.
स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव
अंतिम सुधारित : 5/25/2020
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...