गहू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी.
ज्वारीचे पीक 110 ते 115 दिवसांत निघून गेल्यावर ज्वारीच्या पाटातील ओलावा, अन्नद्रव्ये तुरीला उपलब्ध होतात. मोकळी हवा, सूर्यप्रकाश उपलब्ध होतो.
बऱ्याच वेळा ओलाव्याची कमतरता व खोडमाशीचा प्रादुर्भाव यामुळे ज्वारीच्या पिकात कणसे न निसवणे, कणसांत दाणे न भरणे अशा अडचणी निर्माण होतात, उत्पादनात घट होते. त्यासाठी ज्वारी पिकात कोळपणी, तण नियंत्रण, कीडनियंत्रण करणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. त्यासाठी योग्य नियोजन करावे.
सध्या महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी हंगामात ओर्लिताची सोय मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भुईमूग पिकाऐवजी बाजरी लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
जगातील महत्वाच्या तृणधान्यांपैकी भात हे एक तृण धान्याचे पिक असून त्याखाली १५३९ लाख हेक्टर क्षेत्र असून त्याचे उत्पादन ६१८o लाख टन तर उत्पादकता ४.o२ टन प्रती हेक्टर एवढी आहे.
राज्यातील गव्हाची उत्पादकता देशातील गव्हाच्या उत्पादकतेच्या केवळ ५o टक्के एवढीच असते.
भात रोपांचे वय आठ ते बारा दिवसांचे म्हणजे रोपे दोनच पानांवर असताना त्यांची पुनर्लागवड करावी.
ओट ही गव्हासारखे धान्य देणारी एक वनस्पती आहे. ही वर्षायू वनस्पती ओषधी आहे. ती पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अॅव्हेना सटायव्हाअसे आहे.
नेपाळमधील पीक उत्पादनवाढीसाठी नेपाळ कृषी संशोधन परिषद ही संस्था काम करते. या संशोधन केंद्राने आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राच्या सहकार्याने पाण्याचा ताण सहन करणाऱ्या भाताच्या तीन जाती विकसित केल्या आहेत.
जागतिक उत्पादनात बाजरीचा सर्वात मोठा वाटा (४२ टक्के ) भारताचा आहे.
आंतरपिके मका पिकामध्ये खरीप हंगामात काही अांतरपिके घेता येतात. त्यात उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, भुईमूग, तूर यांचा समावेश होतो.
गहू पिकाविषयी अधिक माहिती - गहू हे भारतातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. - जगातील गहू पिकाचे एकूण क्षेत्र व उत्पादनामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक आहे. या विभागात गव्हाच्या लागवड कशी करावी या संबधी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात सन २०१४-१५ या वर्षात गव्हाखाली एकूण ८.९५ लाख हेक्टर क्षेत्र होते तर उत्पादन १२.३६ लाख टन मिळाले आणि उत्पादकता १३.८१ किंव./हे. होती.
हरितक्रांती घडवून आणण्यामध्ये गहू पिकांचा सिंहाचा वाटा आहे. सन १९६० नंतर भारतातील हरितक्रांतीला सुरूवात झाली.
चारसूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने रोपांची चांगली वाढ होते. पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते. त्याचबरोबरीने चांगले उत्पादन मिळते.
ज्वारी एक सुपरिचित तृणधान्य. भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीसाठी सुधारित पेरणी यंत्र विकसित केले आहे.
ज्वारीचे उत्पादन कमी होण्यास अनेक करणे आहेत, त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणाऱ्या किडी व रोग. या विभागात ज्वारीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे यासंबधी माहिती दिली आहे.
लागवडीनंतर पहिल्या 21 दिवसांमध्ये पोंगे वाळण्याचे प्रमाण दिसून आल्यास ते खोडमाशीमुळे होत असते.
अधिक दर्जेदार उत्पादनासाठी रब्बी ज्वारीच्या सुधारित जातीचे शुद्ध बियाणे पुरेशा प्रमाणात वेळेवर उपलब्ध होणे आवश्यक असते. कारण या बियाण्याची उत्पादनक्षमता स्थानिक वाणापेक्षा जास्त असते.
जंगली भातवर्गीय तणांतील काही जनुकीय गुणधर्म अधिक सहनशील, ताकदवान आणि अधिक उत्पादनक्षम भातजाती विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचे दिसून आले आहे.
या विभागात भाताच्या / तांदुळाच्या खोद्कीडीचे व्यवस्थापन कश्या प्रकारे करावे याविषयी माहिती दिली आहे.
तृणधान्यांची पोषण क्षमता वाढवण्यासाठी, त्यामधील अपायकारक घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते.
दररोज वापरात येणाऱ्या तृणधान्यांमधून आपणाला एकूण उष्मांकापैकी 70 ते 80 टक्के कॅलरीज मिळतात.
दुर्जल शेतीसाठी सर्वांत चिवट असे हे गरीब लोकांचे बारीक तृणधान्य आहे. ते पौष्टिक आणि शक्तिदायक समजले जाते आणि त्यात प्रथिने व कॅल्शियम पुष्कळ प्रमाणात असतात. मधुमेही लोकांना ते उपयुक्त समजले जाते.
एक तृणधान्य. नाचणी ही वर्षायू वनस्पती गवताच्या पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इल्युसाइन कोरॅकोना आहे.
पिकांच्या संकरित जाती विकसनासाठी जनुकीय अभियांत्रिकीचा वापर वाढत आहे. मात्र, पारंपरिक पैदास पद्धतीने दुष्काळ प्रतिकारक मका जातीच्या विकसनामध्ये जनुकीय सुधारित पैदास पद्धतीला मागे टाकले आहे.
भातासारख्या पिकांच्या वाढीमध्ये सिलिकॉन महत्त्वाचे असल्याचे निष्कर्ष विविध प्रयोगातून पुढे आले आहेत. सिलिकॉनमुळे उत्पादन वाढीसोबतच रोग किडींना अटकाव होण्यास मदत होते.