1) ज्वारी + तूर ही आंतरपीक पद्धती 3ः3 किंवा 4ः2 अशा ओळींच्या प्रमाणात लागवड करावी.
2) ज्वारीचे पीक 110 ते 115 दिवसांत निघून गेल्यावर ज्वारीच्या पाटातील ओलावा, अन्नद्रव्ये तुरीला उपलब्ध होतात. मोकळी हवा, सूर्यप्रकाश उपलब्ध होतो. मोकळी हवा, सूर्यप्रकाश यामुळे तुरीच्या सलग पिकापेक्षाही आंतरपीक पद्धतीतील तुरीचे पीक अधिक जोमदार येऊन उत्पादन चांगले मिळते.
3) तूर व ज्वारी यांच्यावर येणाऱ्या कीड व रोगांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होते.
4) ज्वारी + तूर ही एक स्वयंचलित फेरपालट होणारी आंतरपीक पद्धती आहे. एकाच शेताच्या तुकड्यावर गरज पडल्यास 2 ते 3 वर्षे ही पीक पद्धती घेता येते. असे करताना दुसऱ्या वर्षी ज्वारीच्या ओळींच्या क्षेत्रावर तुरीच्या ओळी पेरल्या जातील, याची काळजी घेणे जरुरीचे आहे.
संपर्क - 02452- 225843
अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
-------------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
उसामध्ये आंतरपीक घेतल्याने फायदा होतो. प्रामुख्यान...
जळगाव जिल्ह्यातील वेले (ता. चोपडा) येथील विनोद पाट...
सूत्रकृमी प्रतिबंधाबरोबरच झाला आर्थिक फायदा कोरव...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...