यावर्षी खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे ब-याच क्षेत्रात क्षेत्र वाढणार आहे. रब्बी पिकाची निवड करताना कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणा-या आणि अवर्षणाचा ताण सहन करणा-या पिकाचा विचार फैं केल्यास करडईसारखे फायदेशीर पीक दुसरे जाणारे करडई हे प्रमुख पीक आहे. भारतात फार करडई पिकाच्या क्षेत्रात घट होत आहे.
या पिकाचे क्षेत्र घटण्याची काही प्रमुख करणे म्हणजे मोठ्या प्रमाणात हंगामातील पाऊसमानात बदल , रोगांचा प्रादुर्भाव, तसेच इतर स्पर्धात्मक पिके. उदा. ज्वारी, सूर्यफूल, हरभरा, करडईचे बाजारभाव इतर पिकांच्या मानाने कमी असल्यामुळे शेतकरी अधिक फायदा मिळणा-या पिकांकडे वळले. जागतिक व्यापार खुला झाल्यामुळे स्वस्तात पामतेल आयात करण्याचा पर्याय निवडल्यामुळे करडई तेलाच्या किमती कमी राहिल्या, त्यामुळे हे पीक परवडेनासे झाले. वास्तविक पाहता हे करडई तेल आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. करडईच्या तेलात असंपृक्त आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे म्हणून हृदयरोग असणा-यांसाठी करडई तेल उत्तम आहे.
करडईचे तेल आरोग्यदायी असल्यामुळे तसेच त्याचे क्षेत्रही मर्यादित असल्यामुळे आणि मागणी जास्त असल्यामुळे भाव कमी होणार नाहीत. त्यात वाढ होईल किंवा दर सध्याच्या ठिकाणी स्थिर राहतील. ज्वारी पिकापेक्षा करडई पिकासाठी कमी मजूर लागतात. करडई पिकाचा उत्पादनखर्च कमी असल्यामुळे त्यापासून जास्त फायदा मिळतो तसेच करडईचे तेल आरोग्यदायी असल्यामुळे शेतक-यांनी स्वत:ला लागणा-या गरजेएवढी तरी करडई पिकवावी.
करडई पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे तीन फुटांपेक्षा जास्त खोलीतील ओलावा व अन्नद्रव्ये शोषून घेतली जातात. त्यामुळे अवर्षणप्रवण परिस्थितीत कमी पावसाच्या वेळेस या पिकापासून हमखास उत्पादन मिळते. या पिकाच्या पानांचा आकार पूर्ण वाढीनंतर कमी होऊन कडेने काटे येतात. त्यामुळे झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन अवर्षणात चांगल्या प्रकारे तग धरुन राहते. पानांवर मेणचटपणा असल्यामुळे देखील बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे करडई हे पीक दुष्काळी विभागासाठी वरदानच ठरते.
करडई पिकास जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर पाण्याची गरज भासत नाही. परंतु टंचाईच्या काळात पिकास एक ते दोन पाण्याची आवश्यकता असते, परंतु गव्हाचा विचार केल्यास त्यास पाच-सहा पाणी लागतात. म्हणजेच एक एकर गव्हाऐवजी आपण दोन-तीन एकर करडई झाल्या पीक घेऊ शकतो आणि त्यापासून जास्त फायदा घेता येतो. तसेच वारंवार गहूपीक घेतल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील अन्नद्रव्ये वापरली जातात. अशा ठिकाणी थरातील अन्नद्रव्याचा आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल आणि अधिक फायदा होईल खरीप पिकानंतर रब्बी हंगामात दुसरे पीक घ्यायचे असेल आणि ओलावा ठराविक प्रमाणात असेल तर करडई हे एक उत्तम पर्याय आहे .
करडईच्या पिकास मध्यम ते भारी खोल जमीन निवडावी. ६० सें.मी.पेक्षा जास्त खोल जमिनीत करडईचे पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी असावी. पाणी साचून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड़याफार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शेकते.
करडई पिकाची मुळे खोल जात असल्यामुळे खोल नांगरट करावी त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. खरीप हंगामात ६ x ६ मीटर अथवा १o x १o मीटर आकाराचे सपाट वाफे किंवा सरी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ६.२५ टन (१२ ते १३ गाड्या) मिसळून पाळी द्यावी.
करडईची पेरणी योग्यवेळी करणे फार महत्वाचे आहे. लवकर पेरणी (सप्टेंबरचा पहिला पंधरावडा) केल्यास पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे फार नुकसान होते आणि पर्यायाने उत्पादनात घट येते. याउलट उशिरा पेरणी केल्यास (ऑक्टोबराचा दुसरा पंधरावडा) पीक थंडीच्या काळात आल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि उत्पादनात घट येते. त्यासाठी करडईची पेरणी सप्टेंबरचा दुसरा पंधरवाडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत करण्याची शिफारस करण्यात येत आहे. बागायती करडईची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंत करावी.
पेरणीसाठी करडईचे १o किलो बी प्रती हेक्टरी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास २ ग्रॅम बाविस्टीन प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर या जीवाणूसंवर्धकाची २५ गॅम/किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. अॅझोटोबॅक्टर/ अॅझोस्पिरिलम हे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाण्याला लावल्यास हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे पी.एस.बी. या स्फुरद विरघळवणा-या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
करडई पिकाचे दोन ओळीमधील अंतर ४५ सें.मी. आणि दोन रोपामधील अंतर २0 सें.मी. ठेवावे.
करडई हे पीक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. या पिकाच्या अधिक उत्पादनासाठी कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र (११० किलो युरिया) आणि २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे. काही प्रमाणात पाण्याची सोय असलेल्या पिकास ७५ किलो नत्र (१६३ किलो युरिया) व ३७.५० किलो स्फुरद (२३५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टरी द्यावे.
करडई पीक जमिनीतील ओलाव्यावर वाढत असल्यामुळे पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी दोन जोमदार रोपातील अंतर २० सें.मी. ठेवून विरळणी करणे अत्यंत गरजेचे आहे. गरजेनुसार खुरपणी व कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पेरणीपासून तिस-या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, दातेरी सायकल कोळप्याने कोळपणी करावी.
सुधारित वाण
अ. क्र. | सरळ / संकरित वाण | तयार होण्याचा कालावधी (दिवस) | उत्पादन (किं./हे.) | विशेष गुणधर्म | |
---|---|---|---|---|---|
१ | भीमा | १२० ते १३० | ते १४ | कोरडवाहू क्षेत्रास योग्य, अवर्षणास प्रतिकारक्षम, मावा व पानावरील ठिपके रोगास मध्यम प्रतिकारक. महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस. | |
२ | फुले कुसुम | १२५ ते १४० | जिरायती १२ ते १५ बागायती २० ते २२ | कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याच्या ठिकाणी योग्य बागायती २0 ते २२ || अखेिल भारतीयस्तरावर लागवडीसाठी शिफारस | |
३ | एस.एस.एफ.६५८ | ११५ ते १२० | ११ ते १३ | बिगरकाटेरी वाण, पाकळ्यासाठी योग्य अखिल भारतीयस्तरावर लागवडीसाठी शिफारस | |
४ | एस.एस.एफ.६५८ | ११५ ते १२० |
|
बिगरकाटेरी वाण, पाकळ्यासाठी योग्य अखिल भारतीयस्तरावर लागवडीसाठी शिफारस | |
५ | एस.एस.एफ.७०८ |
११५-१२० | जिरायती १३ ते १६ बागायती २० ते २४ | कोरडवाहू आणि बागायतीसाठी उपयुक्त, माव्यास मध्यम बागायती २० ते २४| प्रतिकारक. महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी शिफारस. | |
६ | फुलेएस.एस.एफ-७३३ | १२० ते १२५ | १३ ते १६ | अधिक उत्पादनासाठी पांढ-या फुलांचा काटेरी वाण, माव्यास मध्यम তথ্যসূত্ৰ-(ও33 प्रतिकारक. अख्रिल भारतीयस्तरावर लागवडीसाठी शिफारस. | |
७ | फुले चंद्रभागा (एस.एस.एफ.७४८ ) | १२५ ते १४० | जिरायती १३ ते १६ बागायती २० ते २५ | कोरडवाहू आणि बागायतीसाठी उत्तम, काटेरी वाण, माव्यास मध्यम प्रतिकारक. अखिल भारतीयस्तरावर लागवडीसाठी शिफारस. | |
८ | परभणी कुसुम (पी.बी.एन.एस. १२ ) | १३५ ते १३७ | १२ ते १५ | मावा किडीस सहनशील, मराठवाड्यासाठी अखिल भारतीयस्तरावर लागवडीसाठी शिफारस. | |
९ |
|
११८ ते १२८ | १२ ते १३ | बिगरकाटेरी, पाकळ्यासाठी अखिल भारतीयस्तरावर लागवड़ीसाठी शिफारस | |
१० | अे.के.एस-२०७ | १२५ ते १३५ | १२ ते १४ | विदर्भासाठी, माव्यास मध्यम प्रतिकारक | |
११ | नारी - ६ | १३० ते १३५ | १० ते १२ | बिगरकाटेरी, पाकळ्यासाठी योग्य, संरक्षित पाण्याखालील लागवडीस तसेच अखिल भारतीयस्तरावर लागवडीसाठी शिफारस. | |
१२ | नारी - ५७ | १२५ ते १३५ | बागायती २० ते २२ | अधिक तेलाचे प्रमाण, बागायती लागवडीसाठी योग्य | |
संकरीत वाण | |||||
१ | नारी एन.एच.-१ | १३० ते १३५ | १२ ते १४ | संकरित बिगरकाटेरी वाण, पाकळ्यासाठी, संरक्षित पाण्याखाली तसेच अखिल भारतीयस्तरावर लागवडीसाठी शिफारस. | |
२ | नारी.एन.एच.- १ | १३० ते १३५ | २० ते २३ | माव्यास सहनशील, बागायतीसाठी, अखिल भारतीयस्तरावर लागवड़ीसाठी शिफारस. |
करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते. मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही. पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर ३५ ते ४o दिवसांनी किंवा जमिनीस फुलो-यात येताना ५५ ते ६० दिवसांनी द्यावे. करडईची फुले उमलण्यास सुरवात होताच 'सायकॉसिल' या वाढ प्रतिरोधकाच्या १ooo पीपीएम तीव्रतेच्या (१ooo मि.लेि.५oo लीटर पाण्यात) द्रावणाची प्रती हेक्टरी फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.
करडई पिकाचे माव्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अवर्षणप्रवण विभागात करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुस-या पंधरावड्यात केल्यास या किडीची तीव्रता बरीच कमी होते. मावा किडीच्या नियंत्रणासाठी ३० टक्के डायमिथोएट (१५ मि.लेि. १o लीटर पाण्यात) या कीटकनाशकाची फवारणी करावी किंवा थायोमेथंक्झाम/ अॅसिटामिप्रीड ३ ते ४ ग्रॅम/ १o लीटर पाणी किंवा अॅसिफेट १६ ग्रॅम /१o लीटर पाणी किंवा क्लोथायनिडीन १ ग्रॅम/१० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. या पिकावर पानावरील ठिपके (अल्टरनेरिया) या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. पानावरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा काबॅन्डॅझिम + मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २० गॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाची तीव्रता कमी झाली नाही तर १० ते १५ दिवसांनी वरीलप्रमाणे दुसरी फवारणी करावी तसेच पिकाची फेरपालट करावी म्हणजे रोगाचे नियंत्रण होते.
करडई पीक १३0 ते १३५ दिवसात काढणीस तयार होते. या पिकाची बोंडे व पाने पिवळी पडल्यानंतर काढणी करावी. कापणी सकाळच्या वेळेस करावी. सकाळी आद्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे काटे टोचत नाहीत. करडई चांगली वाळल्यानंतर बडवणी करावी. एकात्मिक काढणी व मळणी यंत्र पिकाच्या काढणीसाठी उपयुक्त आहे. या यंत्राने कमी वेळेत व कमी खर्चात करडईची काढणी करता येते. या मशीनमधून स्वच्छ धान्य बाहेर येते आणि कोणतीही प्रक्रिया न करता माल विक्रीसाठी नेता येतो. करडई पिकास काटे असल्यामुळे मजूर काढणीसाठी तयार होत नाहीत. त्यासाठी एकत्रित काढणी व मळणीयत्र हे एक वरदान आहे.
सुधारित तंत्राचा वापर केला असता मध्यम जमिनीत करडई पिकापासून प्रती हेक्टरी १२ ते १४ किंटल तर भारी जमिनीत हेक्टरी १४ ते १६ किंटल उत्पादन सहज मिळते. तसेच बागायती करडईपासून २० ते २२ क्रिटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते.
काढणीनंतर करडईतील कडी-कचरा इत्यादी स्वच्छ करून उन्हात वळवावी . वळविल्यानंतर निर्जंतुक पोत्यात भरून साठवण करावी. करडईचा उपयोग प्रामुख्याने तेल मिळविण्यासाठी केला जातो. खेड्यामध्ये तसेच शहरात बैलावर चालणारे तसेच विद्युत मोटारीवर चालणारे घाणे तेल काढण्यासाठी वापरतात. या पद्धतीत तेल काढले असता बियापासून पूर्णपणे तेल निघत नाही. करडई पेंडीमध्ये ३ ते ५ टक्क्यांपर्यंत तेल राहते. परंतु खेड्यात सर्रास ही पध्दती वापरली जाते.
बियाचा वापर परदेशात प्रामुख्याने पाळीव तसेच जंगली पक्षांच्या खाद्यासाठी करतात. भारतात बियाचा उपयोग प्रामुख्याने तेलासाठी करतात. बियामध्ये २८ ते ३५ टक्के तेल असते. करडईच्या तेलात 'लिनोलीक' या असंपृक्तघटकाचे प्रमाण ७८ टक्के असते. करडईच्या तेलाच्या वापराने शरीरात कोलेस्टॅरॉलचे प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. रक्तदाब, हृदयविकार असणा-यांसाठी हे तेल उपयुक्त आहे. याशिवाय करडई तेलाचा उपयोग रंग तयार करणे, रेक्झीन तयार करणे, अन्न तयार करण्यासाठी, मार्गारीन बनविण्यासाठी तसेच खाद्यतेल म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो.
जनावरांना पौष्टिक खाद्य म्हणून उपयोगी आहे. करडई बियाची टरफले सेल्युलेज व इन्सुलेशन तयार करण्यासाठी उपयोगात आणतात.
लहान अवस्थेत करडईचा भाजीसाठी वापर केला जातो. करडईच्या पानामध्ये 'अ' जीवनसत्व, लोह, स्फुरद आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. हिरवापाला जनावरांना चा-यासाठी वापरतात तर हिरव्या झाडापासून मुरघास करता येतो.
खोडामध्ये लिओसिलीसिकचे प्रमाण जास्त असते म्हणून पार्टीकल बोर्ड पेपरसाठी लगदा तयार करण्यासाठी वापरतात. एकत्रित काढणी व मळणी यंत्राद्वारे काढणी केली असता झाडाच्या फांद्या, खोडाचे तुकडे, पाने इत्यादी शेतात विखुरले जातात. कुजल्यानंतर त्यांचा सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो.
करडई पाकळ्यांना औषध म्हणून अतिशय महत्व आहे. सुकलेल्या पाकळ्याच्या औषधामुळे रक्त वाहिन्यामध्ये रक्तपुरवठा तसेच प्राणवायू मिसळण्याचे प्रमाण वाढून रक्त वाहिन्यात गिटुळ्या होण्याचे प्रमाण कमी होते. तसेच कोलेस्टेरॉलचे देखील प्रमाण कमी होते. त्याचबरोबर मधुमेह, हृदयविकार, स्पॉन्डॅलायसिस, उद्यरक्तदाब, मासिक पाळीतील इत्यादी रोग कमी होतात. चीनमध्ये पाकळ्यांचा उपयोग प्रामुख्याने औषधनिर्मिती, रंग निर्मिती व सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. पाकळ्यांपासून उत्तम प्रकारचा चहा तयार होतो.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/10/2020
भात रोपांचे वय आठ ते बारा दिवसांचे म्हणजे रोपे दोन...
विविध सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी सेवांचे वितरण अ...
ओषधी गुणधर्म ओव्यात ब-याच मोठ्या प्रमाणत आहे. ओवा ...
कर्ण रोपण तंत्रज्ञान (Cochlear Implant) हे एक अत्य...