অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोहरी पेंड ठरेल तेलापेक्षाही अधिक मौल्यवान

मोहरी पेंड व माशांच्या उर्वरित अंशापासून अधिक दर्जेदार व उपयुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचा प्रयत्न फिनलॅंड येथील एका संशोधन प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे. त्यापासून पशुखाद्यासह जैविक कीडनाशक, प्रथिने व प्रसाधनांची निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्यामुळे लघु खाद्य उद्योगासह शेतकऱ्यांनाही अधिक दर मिळण्यास मदत होईल.
मोहरीचे तेल काढल्यानंतर पेंड शिल्लक राहते; त्याचप्रमाणे माशांतील आवश्यक तितके मांस काढून घेतल्यानंतर शिल्लक अवशेषांची विल्हेवाट लावण्याची समस्या खाद्य उद्योगासमोर असते. या घटकापासून साध्या साध्या पद्धतीने नवीन उपयुक्त पदार्थ मिळवणे शक्य असल्याचे पिनलॅंड येथील व्हीटीटी टेक्निकल रिसर्च सेंटरमध्ये झालेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडातील विविध देशांतील व्यवसायांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने युरोपीय संघाने या प्रकल्पाला आर्थिक मदत दिली आहे.

प्रकल्पाबाबत माहिती देताना संशोधक रैजा लॅन्टो यांनी सांगितले, की या प्रकल्पामध्ये खाद्य उद्योगातून वाया जाणाऱ्या पदार्थापासून विविध उपयोगी पदार्थांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यातून शून्य कचरा आणि दर्जेदार अंतिम उत्पादन ही दोन ध्येये ठेवण्यात आली होती. त्याचा लाभ शेतकरी, उद्योजक आणि ग्राहकांनाही होणार आहे.

मोहरी पेंडीमध्ये असतात प्रथिने, पेपटाइड फिनॉलिक घटक

मोहरीपासून तेल काढल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पेंडीचा वापर सध्याही काही ठिकाणी पशुखाद्यासाठी केला जातो. मात्र, पेंडीमध्ये असलेल्या प्रथिने व अन्य मौल्यवान घटकांमुळे अनेक पदार्थांची निर्मिती करता येते. 
1. साधारणपणे मोहरी बियांतील एकूण प्रथिनांतील अर्ध्यापर्यंत प्रथिने मिळविता येतात. मात्र, APROPOS प्रकल्पामध्ये केवळ प्रथिने मिळविण्याऐवजी तंतुमय पदार्थांसह (फायबर) उच्च दर्जाची प्रथिने मिळवली आहेत. ही प्रथिने शुद्ध प्रथिनांच्या तुलनेत पेयामध्ये अधिक स्थिर राहू शकतात. सध्या शुद्ध मोहरी प्रथिने व्यावसायिकरीत्या उत्पादन करणारा व्यावसायिक प्रकल्प कॅनडा येथे आहे. 
2. ‘दी पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी ऑफ कॅटालोनिया’ (UPC) येथे मोहरी पेंडीतील जैवकार्यशील गुणधर्मांचा शोध घेण्यात येत आहे. त्यातील पेपटाईड- फिनॉल घटकांमध्ये व्हीटीटी संस्थेला दाह प्रतिबंधक, वार्धक्यरोधक, जीवाणू स्थिर करणारे, आरोग्यवर्धक आणि सूक्ष्मजीवरोधक गुणधर्म आढळले आहेत. त्याचा वापर त्वचेवरील मलमांमध्ये दोन खासगी कंपन्यांनी यशस्वीरीत्या केला आहे. पेपटाईड फिनॉल मिळविण्यासाठी UPC ने अल्ट्रासाउंडवर आधारित नवी पद्धती वापरली असून, रसायनाचा तपकिरी- पिवळा रंग कमी करणे शक्य झाले. 
3. प्रथिने मिळविण्यासाठी व्हीटीटी संस्थेने एन्झायमॅटिक प्रक्रिया वापरली आहे. या प्रक्रियेमुळे पाणी बचतीबरोबरच 
वाळविण्याची क्रिया कमी झाल्याने खर्चात मोठी बचत साधते. 
4. मोहरीतून उपलब्ध होणाऱ्या फिनॉलिक घटकामध्ये सिनापाईन आणि सिनापीक आम्ल ही अन्न व प्रसाधन उद्योगासाठी महत्त्वाची संयुगे मिळाली आहेत. ते मिळविण्याची कार्यक्षम पद्धत, विद्राव्यता आणि आरोग्यवर्धक गुणासाठी व्हीटीटी संस्थेने संशोधन केले आहे. नॉर्वेतील सिन्टेफ (SINTEF) सोबत त्यांनी चाचण्या घेतल्या आहेत. 
कदाचित मुख्य मोहरी व त्याचे तेल हे उपपदार्थ म्हणून गणले जातील, इतकी पेंडीमध्ये क्षमता आहे. त्यातील प्रथिने व अन्य घटकांची आजची किंमत लावल्यास मोहरी पेंडीची किंमत ५ हजार युरो प्रति टन राहू शकते. सध्या पशुखाद्य म्हणून त्याची किंमत केवळ १५० ते ३०० युरो इतकीच असते. तसेच, मोहरी तेलाची किंमत ४०० ते ८०० युरो प्रति टन होते. 
दरवर्षी एकट्या फिनलॅंडमध्ये ५० हजार टन, तर युरोपमध्ये १५ दशलक्ष टन मोहरी पेंडीचे उत्पादन होते.

भारतासाठी कीडनाशक

  • भारतातील मोहरी बियांतील ग्लुकोसिनोलेट घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. ग्लुकोसिनोलेट व प्रथिने वेगळे करण्यासाठी APROPOS प्रकल्पामध्ये तंत्रज्ञान विकसित केले आहे. ग्लुकोसिनोलेट घटक हा नैसर्गिक कीडनाशकामध्ये उपयुक्त ठरू शकतो. सध्या नवी दिल्ली येथील ऊर्जा संशोधन संस्थेच्या सहकार्याने ग्लुकोसिनोलेट मिळविण्याचा एक पथदर्शी प्रकल्प उभारण्यात आला आहे.

मत्स्य उत्पादनातील टाकाऊ भागही ठरतील उपयुक्त

निले पर्च हे पूर्व आफ्रिकेतील महत्त्वाचे निर्यातक्षम मत्स्य उत्पादन आहे. त्यातील उर्वरित अवशेषापासून सध्या काही प्रमाणात खाण्यासाठी तेल मिळवले जाते. मात्र, नॉर्वेतील सिन्टेफ संशोधन संस्थेने माशांच्या या उर्वरित अवशेषापासून उच्च प्रथिने असलेले पूरक खाद्य पथदर्शी प्रकल्पामध्ये विकसित केले आहे. त्याची चव व आकार हा आफ्रिकन लोकांच्या खाद्यपदार्थाप्रमाणे ठेवला आहे. याने पूर्व आफ्रिकेतील प्रथिनांच्या कमतरतेवर उपाय मिळू शकेल. 
नॉर्वेतील सॅलमोन माशांच्या अवशेषांपासून प्रथिने व तेल मिळविण्याची कार्यक्षम पद्धतीही सिन्टेफने विकसित केली आहे.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate