अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी.
जमिनीची योग्य मशागत करून जमीन तयार करावी. लागवड जून, जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करावी.
वडीच्या अळूसाठी कोकण हरितपर्णी ही जात निवडावी. लागवड 90 बाय 30 सें.मी. अंतराने करावी. लागवडीसाठी निरोगी कंद निवडावेत.
लागवडीपूर्वी शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. माती परीक्षणानुसार 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 80 किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. जमिनीच्या मगदुरानुसार पिकाला पाणी द्यावे.
पानांचा उपयोग करायचा असल्यास दोन ते अडीच महिन्यांनी तोडणी करावी.
अशी तोडणी आठ ते नऊ महिने करता येते. कंदाचा उपयोग करायचा असल्यास सहा महिन्यांत कंद तयार होतात.
संपर्क - 02426 - 243861
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
यवतमाळची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वदूर...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...