অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधुनिक शेतीची कार्यपद्धति

आधुनिक शेतीची कार्यपद्धति

कालावधी जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान चालते.
  • पूर्व मशागत करताना नांगरणी, दोन वेळा वखरणी करावी.
  • पुसा नसदार, देशी, चैताली, को-१, कोकण हरिता, फुले-सुचेता इत्यादि शिफारसीत वाणचे एकरी २ किलो बियाणे वापरावे.
  • लागवड पद्धत - दोन ओळीत २ अंतर,दीड मीटर अंतरावर २ बाय २ फुटाचे खड्डे करून माती शेणखताने भरावे. एका ठिकाणी २/३ बिया पेराव्या. मांडव उभारणे आवश्यक आहे.
  • शेवटच्या पाळी पूर्वी एकरी २ टन शेणखत टाकून पाळी द्यावी.लागवड करताना एकरी २५ किलो नत्र,३० किलो स्फुरद ,५० किलो पालश एक महिन्याने २५ किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.

या सोबतच लागवड केल्यास २ दिवसांनी १२:६१:० खत १.५ किलो + युरिया २ किलो ड्रेंचिंग करा.
हिरवी वाढ व्यवस्थित झाल्यास १९:१९:१९ खताची २ किलो + युरिया २ किलो ड्रेंचिंग करा.

फूल लागवड कालावधीत व पहिल्या तोडणी अगोदर १२:६१:० ची २.५ किलो + १३:०:४५ ची २ किलो + कॅल्शियम नायट्रेट ०.५ किलो ड्रेंचिंग करा.

दुसर्‍या किंवा त्या पुढील तोडणीच्या वेळी १३:०:४५ ची ३ किलो ड्रेंचिंग करा.

  • पाणी व्यवस्थापन करताना ५०% वापसा अवस्था राहील असे ठिबकद्वारे दर ४ ते ५ दिवसांनी पाणी पाळी द्यावी.
  • रोग / किडी नियंत्रणासाठी या पूर्वी दिलेल्या कारले पीक व्यवस्थापन प्रमाणे काळजी घ्यावी.

६० दिवसानंतर फळे काढणीस येतात. उत्पादन एकरी ४ ते ५ टन मिळू शकते.

माहिती दाता- गणेश काकडे

अंतिम सुधारित : 4/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate