काकडी लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी. जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे. लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे, अर्धे नत्र (50 किलो) लागवडीनंतर दोन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावे. लागवडीसाठी हिमांगी, फुले शुभांगी या जातींची निवड करावी. एक हेक्टर लागवडीसाठी दीड किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी शिफारशीत बुरशीनाशकाची लागवड 1 मीटर x 0.5 मीटर अंतराने करावी. या पिकावर रस शोषणारी कीड, फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो, तसेच केवडा व भुरी रोगांचा प्रादुर्भाव होतो. हे लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने कीड, रोगनियंत्रण करावे.
संपर्क - 02426-243242
भाजीपाला सुधार योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...