অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गादीवाफा पद्धतीने रोपवाटिका फायद्याची...

गादीवाफा पद्धतीने रोपवाटिका फायद्याची...

  1. गादीवाफ्याची रुंदी एक मीटर, उंची 50 सेंमी. आणि लांबी गरजेनुसार ठेवतो. साधारणपणे रोपवाटिकेतील एक गुंठा क्षेत्राला एक किलो निंबोळी पावडर आणि 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळून देतो.
  2. पेरणीपूर्वी एका किलोस एक ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करतो. एका चौरस मीटरला सहा ते दहा ग्रॅम बियाणे पडेल, याप्रमाणे बियाण्याची पेरणी करतो. गादीवाफ्यावर दोन ओळींत 2.5 सें.मी. अंतर ठेवून बियाणे एक सें.मी. खोलीवर पेरतो.
  3. तुषार सिंचनाने एक दिवसाआड पाणी दोन तास रोप उगवून येईपर्यंत पाणी देतो. त्यानुसार गरजेनुसार पाणी दिले जाते. साधारणपणे 50 ते 60 दिवसांनी रोप पुनर्लागवडीत तयार होते.
  4. गादीवाफा पद्धतीने रोपवाटिका करण्याचा फायदा म्हणजे बियांची उगवण चांगली होते.
  5. निंदणी करणे सोपे जाते. रोप चांगले तयार होते, अवकाळी पाऊस झाला तरी जादा पाणी सरीतून निघून जाते. त्यामुळे रोपांची मर होत नाही. रोपांची मर होत असेल, तर बुरशीनाशकाची आळवणी सोपी जाते.

संपर्क - 9422752101 
डॉ. दत्तात्रय वने, 
मानोरी, जि. नगर

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate