অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जीएम बटाट्यात आहेत कर्करोग कमी करणारे गुणधर्म


चिप्स, फ्राईज निर्मितीसाठी उपयुक्त जात "इनेट'

अमेरिकन कृषी विभागाने जनुकीय सुधारित बटाट्याच्या व्यावसायिक लागवडीसाठी प्रथमच मान्यता दिली आहे. हा बटाटा विशेषतः फ्रेच फ्राईजसाठी वापरला जाणार असून, कर्करोगासाठी कारक घटकांचे प्रमाण त्यात कमी असल्याचा दावा इदाहो येथील उत्पादक जे. आर. सिम्प्लोट कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.
पारंपरिक बटाट्याच्या फ्राईज, चिप्समध्ये कर्करोगजन्य ऍक्रलामाईड हा घटक आढळतो. या घटकांची निर्मिती ऍस्पॅराजीन या अमिनो आम्लाची उच्च तापमानामध्ये शर्करेशी प्रक्रिया झाल्याने होते. या नव्या जनुकिय सुधारीत बटाटा जातीमध्ये ऍस्पॅराजीनचे प्रमाण कमी केले आहे.

फायद्याविषयी कंपनीने केलेला दावा

  • बटाट्यातील ऍस्पॅराजीन या अमिनो आम्लाची तळतेवेळी (49 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक) तापमानाला शर्करेशी प्रक्रिया होऊन, ऍक्रलामाईड तयार होते. बटाट्याचे चिप्स व फ्रेंच फ्राईजमध्ये या घटकांचे प्रमाण अधिक असते. "इंटनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर' यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍक्रलामाईड हे कर्करोगकारक आहे.
  • ऍस्पॅराजीनच्या निर्मितीसाठी कारणीभूत जनुकांची कार्यक्षमता कमी करण्यासाठी बटाटा जातीमध्ये जनुकिय सुधारणा करण्यात आल्या आहेत. अन्य बटाटा जातीतील गुणधर्म "आरएनए इंटरफरन्स टेक्‍नॉलॉजी' द्वारे या जातीत वापरण्यात आले आहेत.

खाद्यपिकात जीएमला विरोध...

  • इनेट या जीएम बटाटा जातीच्या प्रक्षेत्र चाचण्या फ्लोरीडा, इंडीयाना, इदाहो, मिशिगन, नेब्रास्का, वॉशिंग्टन आणि विस्कॉन्सिन या आठ राज्यामध्ये 2009 ते 2011 या कालावधीत करण्यात आल्या.
  • जनुकिय सुधारीत पिके अमेरिकेसाठी नवीन नाहीत. 1990 मध्ये व्यावसायिकदृष्ट्या जीएम पिकांचा अंतर्भाव झाला. 1997 मध्ये जीएम सोयाबीन 17 टक्के होते, मात्र आता अमेरिकेतील एकूण सोयाबीनच्या 90 टक्के, तर मक पिकापैकी 89 टक्के हे जनुकीय सुधारित उत्पादन आहे. ही पिके प्रामुख्याने पशुखाद्यासाठी वापरली जातात. खाद्यपिकामध्ये विशेषतः गहू, फळे आणि भाज्यामध्ये जनुकीय सुधारित पिकांना अद्याप परवानगी देण्यात येत नाही.
  • मानवी आरोग्यासाठी संभाव्य कर्करोगाचा धोका कमी करणाऱ्या बटाटा जातीला प्रथमच परवानगी मिळाली आहे. मात्र, जीएम पिकांच्या विरोधात असलेल्या संस्थांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.

एक उलटा इतिहास...

  • 1995 मध्ये मोन्सॅटो कंपनीने जनुकीय सुधारित बटाट्याची निर्मिती केली होती. त्यांचे कॅनिंग 2001 मध्ये सुरू झाले. मात्र, त्या वेळी त्याला फारच कमी ग्राहक व बाजारपेठ मिळाली. त्या वेळी सिम्प्लोट कंपनीने शेतकऱ्यांना या बटाटा जातींची लागवड न करण्यासाठी प्रयत्न केले होते. (स्रोत ः न्यूयॉर्क टाइम्स)
  • त्याविषयी सिम्प्लोट कंपनीचे पीट क्‍लर्क यांनी सांगितले, की शेवटी ग्राहक हे बाजारपेठेमध्ये महत्त्वाचे असून, त्यांनी स्वीकारल्यानंतर इनेट बटाटा व त्यांचे प्रक्रिया पदार्थ तग धरू शकतील.

जीएम बटाटा जोड

ऍमफ्लोरा जीएम बटाटा - 
ऍमफ्लोरा (EH92-527-1) हा जनुकीय सुधारित बटाटा "बीएएसएफ प्लॅंट सायन्स'मधील जनुकशास्त्रज्ञ लेन्नर्ट इर्जेफाल्ट आणि कृषिशास्त्रज्ञ स्वालोफ वेईबुल एबी यांनी विकसित केला होता. त्याची नोंद 5 ऑगस्ट 1996 मध्ये करण्यात आली. या बटाट्याला औद्योगिक वापरासाठी युरोपियन संघाने 2 मार्च 2010 मध्ये परवानगी दिली. मात्र, युरोपमध्ये जीएम पिकांना होत असलेला विरोध आणि ग्राहकांनी न स्वीकारल्याने पुढे जानेवारी 2012 मध्ये युरोपियन बाजारपेठेतून हा जनुकीय सुधारित बटाटा मागे घेण्यात आला.

ही सुधारणा केली होती...

  • साध्या बटाट्यामध्ये सुमारे 80 टक्के ऍमिलोपेक्‍टीन आणि 20 टक्के ऍमिलोज असते. ऍमिलोपेक्‍टीन हे पॉलिमर उद्योगामध्ये वापरले जाते, तर ऍमिलोज हे स्टार्च रेट्रोग्रेडेशन सारख्या समस्या निर्माण करते. ही समस्या दूर करण्यासाठी खूप खर्च येतो.
  • जनुकीय सुधारणा करीत संशोधकांनी ऍमफ्लोरा ही शुद्ध ऍमिलोपेक्‍टीन स्टार्चची निर्मिती करणारी बटाटा जात विकसित केली होती, त्यांनी ऍमिलोज निर्मिती करण्यासाठी कारणीभूत जनुक अकार्यक्षम केले.

    उशिरा येणाऱ्या करप्याला प्रतिकारक जात

  • युरोपामध्ये लेट पोटॅटो ब्लाईट रोगाचा मोठा प्रादुर्भाव होत असतो. पीक संरक्षणासाठी सुमारे 15 ते 20 फवारण्या कराव्या लागतात.
  • टीगास्क रिसर्च (Teagasc research) ही युरोपातील संशोधन संस्था असून, त्यांचे बटाट्यामध्ये उशिरा येणाऱ्या करपा रोगाला प्रतिकारक जनुकीय सुधारित जात विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही व्यावसायिक कंपनी नाही. पर्यावरण आणि अन्य बाबींवर होणाऱ्या परिणांमाचा प्राथमिक अभ्यास 2012 पर्यंत करण्यात आला. त्यानंतर ईपीए या संस्थेकडून 2012 मध्ये या प्रकल्पाला परवानगी मिळाली.
  • लेट पोटॅटो ब्लाईटला प्रतिकारक अशा मध्य अमेरिकी बटाटा जातीतील जनुकांचा वापर करपा रोगासाठी संवेदनशील व्यावसायिक जात "डिजायर'मध्ये करण्यात येणार आहे. साधारणपणे 2016 पर्यंत हा प्रकल्प चालेल.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate