खुल्या व्यापार धोरणानुसार संपूर्ण जग हि खुली बाजारपेठ झालीय. वेगवेगळ्या कृषी मालाला वेगवेगळ्या देशातून मागणी आहे. पण निर्यात करण्यात येणाऱ्या कृषी उत्पादनात वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाल्यांचा मोठा वाट आहे. म्हणूनच निर्यात करण्यात येनाऱ्या भाजीपाल्याचा दर्जा उत्तम असावाच लागतो. निवडक प्रतवारी केलेला कीड-रोग्नाशकाच्या अवशेषापासून मुक्त, सेंद्रिययुक्त, योग्य पॅकींगमध्ये भरलेला असावा लागतो. शिवाय हवा त्या दर्जाचा आणि मागणीनुसार खात्रीशीर पुरवठा चालू ठेवणं, हे निर्यातीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. भाजीपाला निर्यात करताना त्याचा दर्जा, आधुनिक पॅकींग, शित साखळी, फवारलेल्या औषधांच्या घटक अवशेषाचे प्रमाण, विविध देशांतील गिर्हैकांच्या आवडी निवडी, बाजारपेठ, मालाचा उठाव आदींचा काटेकोरपणे अभ्यास करून निर्यात वाढण्यावर भर देणे आवश्यक आहे.
भेंडी: गडद हिरवा रंग, कोवळी लुसलुशीत ६-७ सें.मी. लांब साठवणीस योग्य, एकसारख्या आकाराची भेंडी फळ डागविरहित अगर कोणत्याही प्रकारची इजा झालेली नसावी.
मिरची: गर्द हिरव्या रंगाची, तिखट, साठवणीसाठी योग्य फळाचा आकार एकसारखा असावा. मिरची ६-७ सें.मी. लांब असावी.
कारल्याचा: रंग हिरवा, २५-३० सें.मी. लांबीची असावी. मान बारीक असावी. हिरवी काटेरी असल्यास अधिक चांगले.
गवार: हिरव्या रंगाची असून ७-१० सें.मी. लांब असावी आणि कोवळी लुसलुशीत असावी.बी धरलेली जून असू नये.
दुधी भोपळा: २५-३० सें.मी. लांबीचा, दंड गोलाकार, ड्रमच्या आकाराचा आणि फिकट हिरव्या रंगाचा असावा.
टोमॅटो: गोल, मध्यम आकाराचे अगर अंडाकृती असावे. रंगानं लालसर, पूर्ण पिकण्याच्या अगोदरची अवस्था, तसच वरची साल सुरकुतलेली नसावी. तुकतुकीत आकर्षक असावी. टोमॅटोचं फळ डागरहित असावं. रासायनिक औषधांचे आवशेष असू नयेत. अशा टोमॅटोला खूप देशातून मोठी मागणी आहे.
घेवडा: घेवड्याला खूप मागणी आहे. १०-१२ सें.मी. लांबीच्या शेंगा असाव्यात. रंगाने हिरव्या असाव्यात, सरळ असाव्यात.
कोहळा: आकारानं गोल असावा. त्याच वजन २ ते २.५ किलो असावे. टो जास्त वजनाचा असू नये. रंगाने पांढरा असावा.
लसूण: गोलाकार, पांढऱ्या रंगाचा ५ सें.मी. व्यासापेक्षा मोठा आकार, मोठी कुडी, एका गडयात १० ते १५ कुड्या असाव्यात.
बटाटा: ४.५ ते ६.०० सें.मी. आकाराचा पांढरट अंडाकृती असावा. वरची साल आकर्षक असावी, बांगला देशात तांबड्या रंगाच्या बटाट्यास, तर इराण, इराकमध्ये पिवळसर फ्रेश असलेल्या बटाट्यास मागणी असते.
शेवग्याच्या शेंगा: ५० ते ६० सें.मी. लांबीच्या असाव्यात. शेंगा गरयुक्त असाव्यात. एकसारख्या जाडीच्या आणि लांबीच्या असाव्यात.
कलिंगड: २ ते ३ किलो वजनाची असावीत. आतला गर लाल असावा. शुगर बेबीसारखे वरून म्हणजे सळीने हिरवे आणि आतला गार लाल कमी बियांचे असावे.
कांदा: दोन प्रकारची निर्यात करू शकतो. एक मोठा कांदा आणि लहान कांदा. मोठया कांद्याचा आकार ४-६ सें.मी. असावा. गडद ते फिकट लाल रंग, गोलाकार (पोळीच्या उंड्यासारखा), तिखट अशा प्रकारच्या कांद्यास काही देशांत मागणी असते, तर बंगालमध्ये गडद लाल गोलाकार आकार आणि ३-४ सें.मी. आकारच्या कांद्यास मागणी असते.
युरोपियन देशांत पिवळसर झाक असलेला ७-१० सें.मी. आणि कमी तिखट असणाऱ्या कांद्या मागणी असते. आणि अगदी लहान कांद्यास म्हणजे २-३ सें.मी. आकार (गुलटी) लाल रंगाच्या गोलाकार कांद्यास खूप देशांतून मागणी आहे.
अशा या मानकांचा भाजीपाला आपण पिकवला, तर निर्यातीसाठी खूप मोठा वाव आहे. मात्र यासाठी जाणीवपूर्वक कष्ट घेतले पाहिजे.
स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव
अंतिम सुधारित : 5/23/2020
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कृषी माल ...
युरोपीय देशांना द्राक्ष निर्यातीकरिता बागायतदारांन...
भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे. जगा...
आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचे कार्य करणारी अमेरिकाच्या...