खेकडा संवर्धन हे तलावामध्ये तसेच पिंजरा पद्धतीनेदेखील करता येते. निमखाऱ्या पाण्यामध्ये सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रॅक्युबेरिका या जाती चांगल्या आहेत. सिल्ला सेरेटा रंगाने तपकिरी काळपट आणि डेंग्याच्या कार्पस भागावर बाहेरील बाजूस एकच अणकुचीदार टोक (दात) असते. सिल्ला ट्रॅक्युबेरिका खेकडे रंगाने हिरवट काळपट असून, डेंग्याच्या कार्पस भागावर बाहेरील बाजूस दोन टोके असतात.
खेकडा संवर्धनासाठी सिल्ला ट्रॅक्युबेरिका या जातीस प्राधान्य द्यावे. हा खेकडा एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये 2 ते 2.4 किलोपर्यंत वाढतो. सिल्ला सेरेटा हा आठ महिन्यांत 700 ते 800 ग्रॅमपर्यंतच वाढतो. खेकडा संवर्धनाबाबत अधिक माहितीसाठी मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी (02352-232987) या ठिकाणी संपर्क साधावा.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्ह...
खेकडा संवर्धनाविषयी तांत्रिक सल्ला कोठे मिळेल याबा...
गिधाडांचे महत्त्व आणि गिधाड- संवर्धनाचे प्रयत्न या...
लोकपंचायत संस्थेने संगमनेर तालुक्यात शाश्वत शेतीच्...