गोड्या पाण्यातील कोळंबी (मॅक्रोब्राकिअम माल्कोल्म्सोनी) ही दुसर्या क्रमांकाची सर्वांत जास्त वेगाने वाढणारी कोळंबी असून ती बंगालच्या उपसागरास जाऊन मिळणार्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. एकेरी शेती पद्धतीमध्ये 750-1000 किलो कोळंबी/हे./8 महिने इतके उत्पादन मिळविण्यात येते. शिवाय ती महत्त्वाच्या भारतीय आणि चिनी माशांच्या प्रजातींसोबत दुहेरी शेतीमध्येही वापरता येते. या पद्धतीमध्ये सुमारे 400 किलो कोळंबी आणि 3000 किलो मासे दर हेक्टर दरवर्षी मिळतात. व्यावसायिक शेतीसाठी आवश्यक असणार्या प्रमाणात या प्रजातीचे बियाणे नैसर्गिकरित्या उपलब्ध होत नसल्याने वर्षभर पुरवठा करण्यासाठी नियंत्रित स्थितींमध्ये मोठ्या प्रमाणात या बियाण्याचे उत्पादन करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात बियाणे उत्पादनाच्या आणि संवर्धन संस्करणाच्या तंत्रज्ञानामुळे शेतकरी आणि उद्योजक यांचे त्यांच्या शेतीपद्धतीतील विविधतेकडे लक्ष वेधले गेले आहे.
बीज-निर्मितीच्या निरंतर प्रक्रियेमध्ये ब्रूडस्टॉक आणि मादी मासे अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक प्रजातीच्या पुनरुत्पादनाच्या कालावधीत मोठा फरक असतो आणि हा फरक तेथील शेतकी-पर्यावरणीय परिस्थितींवर अवलंबून असतो. गंगा, हुगळी आणि महानदीच्या नदीप्रणालीमध्ये पुनरुत्पादनाची प्रक्रिया मे पासून सुरू होते आणि ऑक्टोबरच्या अंतापर्यंत चालू असते, तर गोदावरी, कृष्णा आणि कावेरी नद्यांच्या प्रणालीत हीच प्रक्रिया एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत चालते. तलावांमधील परिस्थितींत, सामान्यतः 60-70 मि.मी. आकार प्राप्त झाल्यावर लैंगिक परिपक्वता येते. काही तलावांत वर्षभर अंडधारक माद्या असल्याचे आढळून आले आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अंडधारक माद्यांचे सरासरी प्रमाण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सर्वात जास्त असल्याचे आढळले आहे आणि या काळात त्या चांगल्या प्रमाणात (8000-80,000) अंडी धारण करतात. एका मोसमात कोळंबी 3-4 वेळा प्रजनन करते. एअर लिफ्ट बायोफिल्टर रिसर्क्युलेटरी सिस्टम वापरून नियंत्रित परिस्थितींमध्ये यशस्वी सामुदायिक प्रजनन आणि वर्षभर बियाणे उत्पादन करणे शक्य आहे.
भारतीय नदीतील कोळंबी हॅचरीचे अवलोकन
पौढ मादीने कात टाकल्यानंतर लगेचच मीलन होते आणि मिलनाच्या काही तासानंतर लगेच अंडी तयार होतात. पाण्याच्या तपमानानुसार (28-30 अंश से.) ही अंडी 10-15 दिवस उबतात. मात्र पाण्याचे तपमान कमी असेल तर हा कालावधी 21 दिवसांपर्यंतही वाढू शकतो. पूर्णपणे विकसित 1ला छोटा लार्व्हा (झोईआ) अंड्याचे कवच फोडून बाहेर येतो आणि प्लँक्टन म्हणून पोहू लागतो.
लार्व्हा संगोपनाच्या विविध पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्थिर, प्रवाही, स्वच्छ किंवा हिरवे पाणी, बंद किंवा अर्धबंद, अभिसरण प्रक्रियेसहित किंवा रहित अशा पद्धतींचा समावेश आहे. इतर पद्धतींपेक्षा हिरव्या पाण्याच्या पद्धतीमुळे उत्तर-लार्व्हा उत्पादनात 10-20% ने वाढ होते असे आढळून आले आहे. मात्र शक्यतो pH वाढल्याने आणि शैवालात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो. शिवाय हिरव्या पाण्यातील मुबलक खाद्यामुळे प्रौढ आर्टेमियांच्या संख्येत वाढ झाल्यास संस्करण माध्यमामध्ये अमोनिया जमा होतो. एअर लिफ्ट बायोफिल्टर रिसर्क्युलेटरी सिस्टम वापरून उत्तर-लार्व्हा (पोस्ट-लार्व्हा/पीएल) चे उत्पादन वाढविणे शक्य आहे. पीएल टप्प्यात येण्यापूर्वी लार्व्हाला 11 झोईआ पायर्यांमधून जावे लागते. याला 18-20% खारटपणा आणि 28-31 अंश तपमान असणार्या स्थितीत 39-60 दिवस लागतात.
एअरलिफ्ट रीसर्क्युलेशनची सुविधा असणारा बायोफिल्टर वापरून पीएल टप्प्यामध्ये विविध पालन माध्यमांमध्ये पाण्याची गुणवत्ता उत्तमरित्या टिकविण्यात येते असे सिद्ध झाले आहे. पालन माध्यमाच्या विविध भौतिकी-रासायनिक निष्कर्षांपैकी तपमान, pH, विरघळलेला प्राणवायू (ऑक्सीजन), एकूण कठीणपणा, एकूण आम्लता, एकूण क्षारता आणि अमोनिकल नायट्रोजन हे कार्यक्षम निष्कर्ष मानण्यात आले आहेत जे नियंत्रित पालनामधील लार्वांची वाढ, पोषण आणि जीवनमान यांच्यावर मोठा प्रभाव टाकतात. लार्व्हा वाढवितांना या निष्कर्षांची सामान्य आकडेवारी अनुक्रमे 28-30 अंश से., 7.8-8.2, 3000-4500 ppm, 80-150 ppm, 18-20%० आणि 0.02-0.12 ppm एवढी आहे.
लार्व्हासंगोपनाच्या दरम्यान आर्टेमिया नॉप्ली, सूक्ष्म झूप्लँक्टन, विशेषतः क्लॅडोसेरॉन्स, कोपेपॉड्स, रोटिफेर्स, मासे आणि कोळंबीची त्वचा, शिंपल्यांचे मांस, गांडुळ, ट्युबिफिसिड वर्म्स, अंड्याचे कवच, बकरी/कोंबडीच्या व्हिसेराचे कापलेले तुकडे इत्यादि पदार्थ खाद्य म्हणून वापरण्यात येतात. यापैकी कोळंबीच्या लार्व्हांसाठी आर्टेमिया नॉप्ली सर्वोत्तम मानली जाते. 1ल्या ट्प्प्यातील झोईआला सुरूवातीला दररोज दोनदा असे 15 दिवस किंवा 6व्या टप्प्यात जाईपर्यंत नुकतीच उबविलेली आर्टेमिया नॉप्ली 1 ग्रा./30000 लार्व्हा या दराने दिली जाते. त्यानंतर हे खाद्य दिवसाला एकदा अंड्याचे कवच आणि चार वेळा शिंपल्यांचे मांस, ट्युबिफिसिड वर्म्स अशा प्रकारे देण्यात येते.
कोळंबीच्या समुदायामध्ये राहण्याच्या सवयीमुळे त्यांच्या उत्तर-लार्व्हा पिलांना सांभाळणे तसे कठीणच असते. म्हणून, पाणी वळविणे आणि निचरा करणे या दोन्ही पद्धती साठवणीसाठी वापरल्या जातात. मात्र उत्तर-लार्व्हा टप्प्यात येण्यासाठी खूप कालावधी लागत असल्याने वरील दोन्ही पद्धती उपयुक्तही नाहीत आणि सुरक्षितही नाहीत. तसेच, लार्व्हांच्या टाकीतील उत्तर-लार्व्हा पिलांच्या उपस्थितीमुळे अन्नासाठी स्पर्धा वाढते व त्याचा प्रगत लार्वांच्या वाढीवर आणि जीवनमानावर परिणाम होतो. म्हणूनच उत्तर-लार्व्हा पिलांच्या सुगीसाठी आदर्श पर्याय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच कारणास्तव टप्प्याने केल्या जाणार्या उत्तर-लार्व्हा पिलांच्या सुगीसाठी स्ट्रिंग शेल वापरतात. एअरलिफ्ट बायोफिल्टर रीसर्क्युलेशन प्रणाली वापरून उत्तर-लार्व्हा पिलांचे जगण्याचे प्रमाण आणि उत्पादन 10-20 पीएल/ली. ह्या श्रेणीत आहे.
भारतीय नद्यांतील कोळंबीची उत्तर-लार्व्हा पिल्ले
नर्सरीमध्ये वाढवलेली पिल्ले साठविल्यास थेट नुकत्याच बदल झालेल्या उत्तर-लार्व्हा पिलांबरोबर साठवण्याऐवजी संवर्धन तलावांत साठविल्यास कोळंबीची जास्तीत जास्त वाढ, उत्पादन आणि जगण्याचा दर मिळतो. उत्तर-लार्व्हा पिल्ले हळूहळू स्वतःला गोड्या पाण्याशी जुळवून घेतात. प्रकृतीने उत्तम पिलांची जास्तीत जास्त वाढ व जगण्याचा दर 10०% एवढ्या क्षारतेमध्ये मिळते.
योग्य वायूवीजन असणारे सुसज्ज मातीचे तलाव आणि बायोफिल्टर रीसर्क्युलेटरी प्रणाली असणारी हॅचरी यांपैकी कोठेही उत्तर-लार्व्हा पिलांचे संवर्धन करता येते. योग्य प्रकृतीस्वास्थ्य असणार्या उत्तर-लार्व्हा पिल्लांचे संवर्धन करताना साठवण घनता, खाद्य आणि पाण्याची गुणवत्ता राखणे हे फार महत्त्वाचे असते. 10-15 उत्तर-लार्व्हा पिल्ले/ली. हे प्रमाण साठवण घनतेसाठी योग्य आहे. चार्यामध्ये अंड्याचे कवच आणि सोबत शिंपल्यांचे तुकडे केलेले मटण चांगल्या वाढीस कारणीभूत ठरते. पाण्याचा दर्जा ठरवणारे निकष म्हणजेच तपमान, सामू, विरघळलेला प्राणवायू (ऑक्सीजन) आणि विरघळेला अमोनिया यांची सामान्य आकडेवारी अनुक्रमे 27.5-30 अंश से, 7.8-8.3, 4.4-5.2 ppm आणि 0.02-0.03 ppm एवढी आहे.
कोळंबीच्या संवर्धन संस्करणाची पद्धत गोड्या पाण्यातील माशांच्या संवर्धन संस्करण पद्धतीसारखीच आहे. कोळंबी त्यांच्या रांगत राहण्याच्या सवयीमुळे सहज एका तलावातुन दुसर्या तलावात स्थलांतर करू शकते म्हणून तलावाचे काठ पाण्याच्या पातळीपेक्षा 0.5 मी. उंच असले पाहिजेत. वाळू आणि चिकणमातीचा तळ असलेला तलाव चांगल्या वाढीसाठी उत्तम मानला जातो. पाणीनिचर्याची सुविधा नसलेले तलाव पारंपारिक मत्स्यनाशक वापरून वनस्पती/भक्षकमुक्त करता येतात. निम-केंद्रित शेतीसाठी साठवणीची घनता 30000 ते 50000/हे. असावी. पाणी बदलण्याची आणि वायूवीजनाची सुविधा असणारे तलाव शेतीसाठी वापरता येतात, यात साठवण घनता 1 लाख/हे. पर्यंत वाढविता येते. कोळंबीची वाढ आणि जगण्याचा दर यांच्याशी तपमानाचा थेट संबंध असतो म्हणूनच तो एक महत्त्वाचा घटक आहे. 35 अंश से. पेक्षा जास्त आणि 14 अंश से. कमी तपमान घातक असते आणि 29-31 अंश से. तपमान उत्तम मानले जाते.
नर माद्यांपेक्षा जास्त वेगाने वाढतात. शेंगदाण्याच्या तेलाची मळी आणि माशांचे मांस यांचे 1:1 मिश्रण पुरवणी खाद्य म्हणून वापरता येते. एकाच प्रजातीची शेती करून आणि 30-50 हजार एवढी साठवण घनता ठेऊन संगोपनाच्या सहा महिन्यांत 500-1000 किलो/हे. इतके उत्पादन घेता येते. बहुसंस्करण पद्धतीत हीच घनता एम. माल्कोल्म्सोनी ची 10-20 हजार/हे. असतांना आणि माशांची 2,500-3000/हे. असतांना 300-400 किलो कोळंबी आणि 2000-3000 किलो मासे मिळवता येतात.
अनु.क्र. |
विषयवस्तु |
किंमत |
I. |
खर्च |
|
A. |
अस्थिर किंमत |
|
1. |
ब्रूड स्टॉक तलाव बांधणे |
50,000 |
2. |
हॅचरीची शेड (10 मी X 6 मी) |
2,20,000 |
3. |
लार्व्हा संगोपनाची टाकी (1000 लीटरच्या 12 सिमेंटच्या टाक्या) |
1,00,000 |
4. |
पीव्हीसी पाईपची ड्रेनेज सिस्टिम |
20, 000 |
5. |
बोअरवेल |
40, 000 |
6. |
पाण्याची टाकी (20,000 लीटर) |
40, 000 |
7. |
विद्युत अधिष्ठापन |
30, 000 |
8. |
एअर-ब्लोवर (5 hp, २ नग) |
1,50,000 |
9. |
एअरेशन पाईप नेटवर्किंग सिस्टम |
40,000 |
10. |
जनित्र (5 KVA) |
60,000 |
11. |
पाण्याचे पंप (2 hp) |
30,000 |
12. |
शीतकपाट (फ्रिज) |
10,000 |
13. |
इतर खर्च |
30,000 |
एकूण खर्च |
8,20,000 |
|
B. |
अस्थिर किंमत |
|
1. |
खाद्यासह ब्रूडस्टॉक विकसित करणे |
50,000 |
2. |
समुद्राचे पाणी आणणे |
20,000 |
3. |
खाद्य (आर्टेमिया आणि तयार खाद्य) |
2,30,000 |
4. |
रसायने आणि औषधे |
10,000 |
5. |
वीज आणि इंधन |
40,000 |
6. |
पगार (1 हॅचरी व्यवस्थापक आणि 4 कुशल कामगार) |
1,80,000 |
7. |
इतर खर्च |
50,000 |
|
एकूण किंमत |
5,80,000 |
C. |
एकूण खर्च |
|
|
अस्थिर किंमत |
5,80,000 |
|
स्थिर भांडवलावर वार्षिक 10% दराने घसारा |
82,000 |
|
वार्षिक 15% दराने स्थिर भांडवलावर व्याज |
1,23,000 |
|
संपूर्ण बेरीज |
785,000 |
II. |
निव्वळ उत्पन्न |
|
|
20 लाख माशांच्या बियाण्यांची विक्री (दर हजार रु. 500 या दराने) |
10,00,000 |
III. |
एकूण उत्पन्न (निव्वळ परतावा-एकूण किंमत) |
2,15,000 |
अनु.क्र. |
विषयवस्तु |
किंमत |
I. |
खर्च |
|
A. |
अस्थिर किंमत |
|
1. |
तलाव लीज किंमत |
10,000 |
2. |
खते आणि चुना |
6,000 |
3. |
कोळंबीखाद्य (50,000/हे. रु. 500/1000) |
25,000 |
4. |
पुरवणी खाद्य (रु. 20/किलो) |
40,000 |
5. |
पगार (1 कामगार रु. 50/दिवस) |
14,000 |
6. |
साठवण आणि विपणन खर्च |
5,000 |
7. |
इतर खर्च |
5,000 |
|
एकूण खर्च |
1,05,000 |
B. |
एकूण खर्च |
|
1. |
अस्थिर किंमत |
1,05,000 |
2. |
वार्षिक 15% दराने अस्थिर खर्चावर 6 महिन्यांसाठी व्याज |
7,875 |
|
संपूर्ण बेरीज |
1,12,875 |
II. |
निव्वळ उत्पन्न |
|
|
1000 किलो कोळंबीची विक्री (रु. 150/ किलो या दराने) |
1,50,000 |
|
|
|
III. |
एकूण उत्पन्न (निव्वळ उत्पन्न-एकूण खर्च) |
37,225 |
अनु.क्र. |
विषयवस्तु |
किंमत |
I. |
खर्च |
|
A. |
अस्थिर किंमत |
|
1. |
तलाव लीज किंमत |
10,000 |
2. |
खते आणि चुना |
6,000 |
3. |
कोळंबीखाद्य (10,000/हे, रु. 500/1000) |
5,000 |
4. |
माशांचे बियाणे (3500/ हे) |
1,500 |
5. |
पुरवणी खाद्य |
50,000 |
6. |
पगार (1 कामगार रु. 50/माणशी-दिवस) |
15,000 |
7. |
साठवण खर्च |
5,000 |
8. |
इतर खर्च |
10,000 |
|
एकूण खर्च |
1,02,500 |
B. |
एकूण खर्च |
|
1. |
अस्थिर किंमत |
1,02,500 |
2. |
वार्षिक 15% दराने अस्थिर खर्चावर 6 महिन्यांसाठी व्याज |
7,688 |
|
संपूर्ण बेरीज |
1,10,188 |
II. |
निव्वळ उत्पन्न |
|
|
कोळंबीची विक्री (रु. 150 किलो या दराने 400 किलो) |
60,000 |
|
माशांची विक्री (रु. 30 या दराने 3000 किलो) |
90,000 |
|
|
1,50,000 |
III. |
एकूण उत्पन्न (निव्वळ उत्पन्न-एकूण खर्च) |
39,812 |
स्त्रोत: सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर ऍक्वाकल्चर, भुवनेश्वर, ओरिसा
अंतिम सुधारित : 10/7/2020
मोटार लाँचेसचा मासेमारी आणि वाहतुकीसाठी प्रायोगिक ...
भारतात आणि इतरत्र मोत्यांची मागणी वाढत असूनसुध्दा...
गोड्या पाण्यात मत्स्य व्यवसाय करायचा असेल तर भारती...
व्यावसायिक तत्वावर ह्या खेकड्याची जोपासना करण्याचे...