मोती हे एक नैसर्गिक रत्न आहे आणि ते मोलस्क नावाच्या शंबुकामध्ये (शिंपल्यामध्ये) तयार होते. भारतात आणि इतरत्र मोत्यांची मागणी वाढत असूनसुध्दा त्यांचा नैसर्गिक पुरवठा मात्र अतिवापरामुळे आणि प्रदूषणामुळे कमी होत चालला आहे. भारत घरगुती मागणी पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात संस्करित मोत्यांची आयात करतो. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर ऍग्रीकल्चर, भुवनेश्वर या संस्थेने साध्या गोड्या पाण्यातील शिंपल्यांपासून गोड्या पाण्यातील मोत्यांची शेती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. गोड्या पाण्यातील शिंपले देशातील गोड्या पाण्याच्या स्त्रोतात मुबलक प्रमाणात आढळतात.
कलात्मक मोती
निसर्गात, जेव्हां एखादा परकीय कण उदा. वाळूचा कण किंवा लहानसा कीटक चुकून शिंपल्यामध्ये घुसला आणि शिंपला त्यास बाहेर घालवू शकला नाही तर तो त्या कणाभोवती एक चमकदार आवरण तयार करतो. या आवरणाचे थरावर थर जमून मोती तयार होतो. याच साध्यासोप्या तत्त्वाचा वापर मोत्यांची शेती करतानाही करण्यात येतो.
मोती हा शंबुकाच्या (शिंपल्याच्या) आतील चमकदार आवरणासारखाच असतो. या आवरणास ‘मातृआवरण’ असे म्हणतात. हे आवरण कॅल्शियम कार्बोनेट, जैविक पदार्थ आणि पाणी यापासून तयार झालेले असते. बाजारात उपलब्ध असणारे मोती कृत्रिम, नैसर्गिक किंवा संस्करीत असू शकतात. कृत्रिम मोती हे प्रत्यक्षात मोती नसून मोत्यासारख्या दिसणार्या पदार्थाचे टणक, गोलाकार आणि मोत्यासारखे बाह्यावरण असणारे मणी असतात. नैसर्गिक मोत्यांमध्ये केंद्रक अतिशय सूक्ष्म असते आणि त्याच्या सभोवताली मोत्याचे जाड आवरण असते. सामान्यतः नैसर्गिक मोती आकाराने लहान आणि वेडावाकडा असतो. संस्करीत मोतीसुध्दा नैसर्गिक मोतीच असतो फक्त तो मानवी हस्तक्षेप करून तयार करण्यात आलेला असतो. यामध्ये सजीव आवरण आणि केंद्रक मानवी हस्तक्षेपाद्वारे तयार करण्यात येते ज्यामुळे मौक्तिक निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगवान होते आणि मोतीसुध्दा हवा त्या आकाराचा, रंगाचा बनविता येतो. भारतात, गोड्या पाण्यातील शंबुकाच्या तीन प्रजाती उपलब्ध आहेत त्या म्हणजे: लॅमेलिडेंस् मार्जिनालिस, एल. कोरिआनस आणि पारेसिआ कोरुगाटा. यापासून चांगल्या दर्जाचे मोती तयार होतात.
गोड्या पाण्यातील मौक्तिक संवर्धनामध्ये सहा मुख्य पायर्यांचा समावेश असतो. उदा.: शंबुके (शिंपले) एकत्र करणे, संचलनपूर्व काळजी, शस्त्रक्रिया, संचलनोत्तर काळजी, तलाव संस्करण आणि मोती जमा करणे.
तलाव, नद्या यांसारख्या गोड्या पाण्याच्या स्त्रोतांमधून चांगल्या प्रकृतीचे शिंपले निवडतात. हे शिंपले माणसांद्वारेच गोळा करतात आणि पाण्याने भरलेल्या बादलीत किंवा भांड्यात ठेवतात. मोत्यांच्या शेतीसाठी वापरण्यात येणार्या आदर्श शिंपल्यांचा आकार आतून बाहेरुन 8 सेमी.पेक्षा मोठा असावा.
गोळा केलेले शिंपले प्रक्रियापूर्व काळजी घेण्यासाठी 2-3 दिवस नळाच्या जुन्या पाण्यात 1 शिंपले/ली. या घनतेने साठवतात. यामुळे शिंपल्यांना जोडणारे स्नायू कमकुवत होतात आणि शस्त्रक्रियेच्यादरम्यान त्या हाताळणे सोपे जाते.
शस्त्रक्रिया कोणत्या भागात केली जाणार आहे यावरून रोपणाचे तीन प्रकार पडतात: आवरणातील खड्डा, आवरणातील ऊती आणि गोनाडल रोपण. शस्त्रक्रियेच्या दरम्यान सर्वात महत्त्वाचे गोष्ट म्हणजे ती कॅलशियम पदार्थापासून किंवा शिंपल्यापासून बनवलेले मणी किंवा केंद्रक.
आवरणातील खड्ड्यातील रोपण: यामध्ये गोलाकार (4-6 मि.मी. व्यासाचा) किंवा कलात्मक (गणपती, बुद्ध, इ.च्या आकृत्या) मणी शिंपल्याच्या आवरणाच्या खड्ड्यामध्ये ठेवले जातात. ही प्रक्रिया करताना शस्त्रक्रियेचा संच वापरून शिंपल्याचे दोन वॉल्व्ह त्याला धक्का न पोहोचवता अत्यंत नाजुकपणे उघडावे लागतात आणि आतील बाजूचे आवरण शिंपल्यापासून अलगद बाजूला करावे लागते. दोन्ही वॉल्व्हच्या आवरणातील खड्ड्यांत रोपण केले जाऊ शकते. कलात्मक मण्यांचे रोपण करतांना त्यांची कलाकुसर केलेली बाजू आवरणाच्या दिशेला असेल याची काळजी घ्यावी. इच्छित ठिकाणी मणी ठेवल्यावर रोपणाच्यावेळी तयार झालेली फट ते आवरण शिंपल्यावर ओढून बंद करतात.
आवरणाच्या ऊतींतील रोपण: मध्ये शिंपल्याची दोन भागांत विभागणी केली जाते: दाता आणि प्राप्तकर्ता. पहिल्या पायरीमध्ये एक ग्राफ्ट (आवरणाच्या ऊतींचे छोटे तुकडे) तयार करतात. दाता शिंपल्यामधून आवरणाची फीत (शिंपल्याच्या पोटाच्या भागांतील आवरणाची पट्टी) तयार करून ती 2x2 मि.मी.च्या आकारात कापून हे करतात. प्राप्तकर्ता शिंपल्यावर याचे रोपण केले जाते. हे रोपण दोन प्रकारचे असू शकते: केंद्रकमुक्त किंवा केंद्रकयुक्त. पहिल्या बाबतीत केवळ ग्राफ्टचे तुकडे शिंपल्याच्या पोटाकडील भागात असणार्या पॅलिअल आवरणाच्या बाहेरील बाजूस आतील भागात केलेल्या पॉकेट्समध्ये सरकवले जातात. दुसर्या पद्धतीत, ग्राफ्टचा तुकडा आणि छोटेसे केंद्रक (2मि.मी. व्यास) पॉकेट्समध्ये घातले जाते. दोन्ही बाबतींत ग्राफ्ट किंवा केंद्रक पॉकेटच्या बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. दोन्ही वॉल्व्हच्या आवरण फितींमध्ये रोपण केले जाऊ शकते.
रोपण केलेले शिंपले नायलॉन पिशव्यांत भरुन 10 दिवस प्रक्रियोत्तर काळजी केंद्रात ठेवतात. त्यांना ऍन्टिबायोटिक उपचार आणि नैसर्गिक खाद्याचा पुरवठा केला जातो. केंद्राला नित्य भेट देऊन मृत आणि केंद्रक अस्वीकृत शिंपले काढून टाकतात.
गोड्या पाण्यातील शंबुकाचे (शिंपल्याचे) संस्करण
संचलनोत्तर काळजीनंतर रोपण केलेले शिंपले तलावात साठवतात. एका नायलॉनच्या पिशवीत दोन शिंपले भरुन त्या तलावात 1 मी. खोल पाण्यात बांबू किंवा पीव्हीसी पाईपच्या साहाय्याने लोंबत ठेवतात. शिंपल्यांचे संस्करण 20-30 हजार/हे या साठवण घनतेनुसार केले जाते. तलावांना नियमितपणे जैविक आणि अजैविक खतांचा पुरवठा करून सुपीक बनविले जाते. त्यामुळे प्लँक्टनची उत्पादनक्षमता कायम राहते. 12-18 महिन्यांच्या संस्करण कालावधीत शिंपल्यांची नियमित तपासणी करणे आणि मृत शिंपले काढून टाकून पिशव्या स्वच्छ करणेसुध्दा महत्त्वाचे असते.
गोल संस्करीत मोती जमा करणे
संस्करण कालावधीच्या शेवटी शिंपले गोळा करतात. शिंपल्याच्या आवरण ऊती किंवा गोनाडमधून स्वतंत्र मोती काढता येतात तर आवरण खड्डा पद्धत वापरलेल्या शिंपल्यांतून मोती काढताना मात्र शिंपल्याचा त्याग करावा लागतो. यातील मोती शिंपल्याला अर्धा जोडलेला असतो. आवरण ऊतीमध्ये मोती जोडलेला नसतो, लहान असतो आणि अनियमित किंव गोल असतो तर गोंडल पद्धतीत मोती मोठा असतो, गोल किंवा अनियमित असतो.
i.क्षेत्रफळ: 0.4 हेक्टर
ii.उत्पादन: दुहेरी रोपणाद्वारे कलात्मक मोती
iii.साठवण घनता: 25,000 शिंपले/0.4 हेक्टर
iv.संस्करण कालावधी: दीड वर्षे
अनु.क्र. |
विषयवस्तु |
किंमत |
I. |
खर्च |
|
A. |
स्थिर भांडवल |
|
1. |
शेड (12 m x 5 m) |
1.00 |
2. |
शिंपल्यांच्या टाक्या (20 फेरो सिमेंट/एफआरपी; क्षमता 200 लि; रु. 1,500/टाकी) |
0.30 |
3. |
संस्करण संच (पीवीसी पाईप आणि फ्लोट्स) |
1.50 |
4. |
शस्त्रक्रिया संच (4 संच; रु 5,000/संच) |
0.20 |
5. |
शस्त्रक्रियेसाठी फर्निचर (4 संच) |
0.10 |
6. |
एकूण |
3.10 |
|
|
|
B. |
अस्थिर किंमत |
|
1. |
तलाव लीज किंमत (1 1/2 वर्षासाठी) |
0.15 |
2. |
शिंपले (25,000 नग; रु. 0.5/नग) |
0.125 |
3. |
कलात्मक मोत्यांची केंद्रके (50,000 नग दुहेरी रोपणासाठी;रु. 4/केंद्रक) |
2.00 |
4. |
रोपणासाठी कुशल कामगार (3 माणसे 3 महिन्यासाठी रु. 6,000/व्यक्ती/महिना) |
0.54 |
5. |
पगार (2 माणसे 1½ वर्षांसाठी रु.3,000/व्यक्ती/महिना शेत व्यवस्थापनासाठी आणि देखरेखीसाठी) |
1.08 |
6. |
खते, चुना आणि इतर खर्च |
0.30 |
7. |
गोळा केल्यानंतर मोत्यांवरील प्रक्रिया (9,000 कलात्मक मोती, रु.5/मोती) |
0.45 |
|
एकूण |
4.645 |
|
|
|
C. |
एकूण किंमत |
|
1. |
एकूण अस्थिर किंमत |
4.645 |
2. |
अस्थिर किंमतीवर व्याज (15% सहा महिन्यांनी) |
0.348 |
3. |
स्थिर भांडवलावर घसारा (1 ½ वर्षांसाठी 10% वार्षिक दराने) |
0.465 |
4. |
स्थिर भांडवलावर व्याज (1 ½ वर्षांसाठी 15% वार्षिक दराने) |
0.465 |
|
सर्व बेरीज |
5.923 |
|
|
|
II. |
निव्वळ उत्पन्न |
|
1. |
मोत्यांच्या विक्रीवर परतावा (30,000 मोती; गोळा केलेल्या 15,000 शिंपल्यांमधून, उत्तरजीवन दर 60%) |
|
|
कलात्मक मोती (श्रेणी अ) एकूणच्या 10% ) 3,000, रु.150/मोती |
4.50 |
|
कलात्मक मोती (श्रेणी ब) (एकूणच्या 20% ) 6,000, रु. 60/मोती |
3.60 |
|
निव्वळ परतावा |
8.10 |
|
|
|
III. |
एकूण उत्पन्न (निव्वळ उत्पन्न- एकूण खर्च) |
2.177 |
स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम
अंतिम सुधारित : 10/7/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...