অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जंबो कोळंबी संवर्धन

जंबो कोळंबी संवर्धन

मॅक्रोब्रॅकीयम रोझनबर्गी या कोळंबीला जंबो कोळंबी, महाझिंगा, पोचा, खटवी इत्यादी विविध नावांनी ओळखतात. या जातीच्या बीजाच्या कॅरापेसवर (डोक्‍यावरील कवचावर) आडवे तीन ते सहा पट्टे असतात. रोस्ट्रम लांब व पुढच्या बाजूला वर झुकलेले असते. त्याच्या वरच्या बाजूस 10 ते 11 आणि खालच्या बाजूस आठ ते नऊ दात असतात. डेंग्यांवर निळसर झाक असते.
1) इतर सर्व जातींच्या कोळंबीपेक्षा जलद वाढते. वर्षभरात या जातीचा नर साधारणपणे 70-100 ग्रॅमपर्यंत वाढतो, तर मादी 35 ते 70 ग्रॅमपर्यंत वाढते. काही नगात विशेषतः नर कोळंबीमध्ये वाढीचा वेग दुप्पट असतो. अशी कोळंबी सात ते आठ महिन्यांत 100 ते 120 ग्रॅम वजनाची होते.
2) ही कोळंबी अत्यंत चविष्ट आहे, त्यामुळे या कोळंबीला देशात तसेच परदेशात प्रचंड मागणी आहे, दरही भरपूर मिळतो.
3) या कोळंबीचे अन्न म्हणजे पाण्यातील कीटक, कृमी, वनस्पती, बी-बियाणे, छोटे कवचधारी प्राणी, मासळीचे विसर्जित पदार्थ इ. ही कोळंबी सर्वभक्षी आहे.
4) कृत्रिम खाद्याबरोबरच कोळंबीला कणी, कोंडा, पेंड, मासे, खाटीकखान्यातले टाकाऊ मांस, धान्यकण इ. पूरक खाद्य देता येते.
5) कटला, रोहू, गवत्या इ. प्लवंगभक्षी माशांबरोबर हिचे संवर्धन करता येते. हे मासे पाण्याच्या वरच्या थरात राहतात, तर कोळंबी तळाशी वास्तव्य करते.
7) ही कोळंबी गोड्या पाण्यात तसेच पाच क्षारतेपर्यंतच्या मचूळ पाण्यात वाढते. तसेच 18 ते 34 अंश सें. या दरम्यान तापमान असले तरीही जगते.
8) जंबो कोळंबी रोगाला सहजासहजी बळी पडत नाही.

कोळंबी शेती करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी

1) जंबो कोळंबी सोबत मृगल, सायप्रीन्स तसेच इतर मांसाहारी माशाचे बीज तलावात सोडू नये.
2) तलावात माशांबरोबर कोळंबीही वाढवायची असेल तर कोळंबीला लपण्यासाठी तलावात नळे, पाइपचे तुकडे, बांबूच्या फ्रेम, टायरचे मोठे तुकडे तळाशी सोडावेत, त्यामुळे कोळंबीचे एकमेकांना खाणे कमी होते.
3) मत्स्यशेतीला सुरवात करण्यापूर्वी तलावाचा तळ भेगा पडेपर्यंत उन्हात आठवडाभर तापवावा. तलावाचा तळ नांगरून घ्यावा, त्यामुळे तळातील दूषित वायू बाहेर निघून जातात. मातीचा सामू जर 7.5 पेक्षा कमी असेल, तर योग्य प्रमाणात चुन्याची मात्रा द्यावी, जेणेकरून सामू 8 ते 8.5 पर्यंत वाढेल. साधारणतः आठच्या आसपास सामू असेल तर तलावात माशांची वाढ चांगली होते.
4) काही वेळेला तलावातील सगळे पाणी काढून तलाव रिकामा करणे शक्‍य नसते. अशा वेळी तलावातील पाणवनस्पती काढून टाकावी लागतात. बांधाच्या उतारावरील वनस्पती पावसाळ्यापूर्वी किंवा त्या पाण्यात बुडण्यापूर्वी काढाव्यात. बांधाला बळकटी आणणाऱ्या वनस्पती उदा. हरळी, बांधावर ठेवावी. पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या वनस्पती तलावात जाळे फिरवून काढून घ्याव्यात. पाण्यात पूर्णपणे बुडालेल्या वनस्पती काढण्याकरिता वडाप जाळे तळातून फिरवावे.
7) तलावातील उपद्रवी मासे नष्ट करावेतच. याकरिता वारंवार जाळी फिरवून असे मासे काढून नष्ट करावेत.
8) तलावात माशांचे नैसर्गिक खाद्य म्हणजे प्लवंग निर्मिती करावी.
9) तलावाच्या बांधावर बांधाच्या उंचवट्यापासून साधारण 25 ते 30 सें.मी. खाली योग्य त्या व्यासाची ओव्हर फ्लो पाइप बसवावा, जेणेकरून पावसाळ्यात तलावात जमा होणारे जादा पाणी या पाइपमधून बाहेर जाईल, पाणी बांधावरून जाणार नाही. या पाइपला आतून जाळी लावणे आवश्‍यक आहे. कारण त्यामुळे तलावातील मासळी बाहेर जाणार नाही.

संपर्क - सचिन साटम - 9552875067
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, पेठ किल्ला, रत्नागिरी

-------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

जंबो कोळंबी संवर्धन

अंतिम सुधारित : 10/7/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate