भारतीय कार्प माशांच्या जाती
कटला
- डोके मोठे व रुंद असते. शरीराचा मध्य भाग चांगलाच रुंद व फुगीर असतो.
- अंगावरचे खवले मोठे असतात. ओठाच्या ठेवणीवरून इतर कार्प माशांमध्ये हा सहज ओळखला जातो.
- तोंड वरच्या बाजूला वळलेले, खालचा ओठ जाड असतो. मिश्या नसतात.
- खालच्या ओठाचा काठ मऊ दातेरी नसतो. माशाचे प्रमुख खाद्य प्राणी प्लवंग वा वनस्पती प्लवंग आहे.
- तलावाच्या वरच्या थरातील अन्न खातो. कार्पच्या इतर जातींबरोबर खाद्याकरिता स्पर्धा करीत नाही. वाढ जलद असते.
- भारतात सर्वत्र आढळतो. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. पावसाळ्याचा पूर्वार्ध हा प्रजननाचा हंगाम आहे.
रोहू
- या माशाचे शरीर प्रमाणबद्ध वा लांबट असते. अंगावरचे खवले लालसर असतात.
- हा मासाही त्याच्या ओठाच्या ठेवणीवरून ओळखला जातो. खालचा ओठ जाड असून, त्याची किनार मऊ दातेरी असते.
- वरच्या जबड्यास दोन लहान मिश्या असतात. तोंड किंचित खालच्या बाजूला वळलेले वा अरुंद असते.
- हा मासा प्रामुख्याने जलाशयाच्या मधल्या थरात राहतो. प्राणी प्लवंग व सडणारी वनस्पती, त्यावरील जीवजंतू यावर उपजीविका करतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.
मृगळ
- या माशाचे शरीर जास्त लांबट असते. तोंड खालच्या बाजूला वळलेले वा रुंद असते.
- ओठ पातळ वा खालच्या जबड्यावर दोन मिश्या असतात. हा मासा तलावाच्या तळाजवळ राहतो.
- तळावरील कुजणारे वनस्पतिजन्य अन्न, शेवाळे, प्राणिप्लवंग हे अन्न घेतो.
- फक्त तळाजवळील अन्न घेत असल्याने कटला, रोहू माशांशी खाद्याच्या बाबतीत स्पर्धा नसते. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.
संपर्क - 022- 27452775
खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल, जि. रायगड.
-------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.