অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मस्त्यशेती - सांडपाणी शुद्धीकरण

जलसंवर्धनाद्वारे सांडपाण्याचे शुद्धीकरण

देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या काही वर्षांत कारखान्यात तयार होणार्‍या प्रदूषके आणि घनकचर्‍या बरोबर तयार होणार्‍या सांडपाण्याचे प्रमाण शुद्धीकरणाच्या क्षमतेबाहेर वाढलेले आहे. घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातील दूषित घटकांना नैसर्गिक पाण्यात सोडण्यायोग्य करण्यासाठी पराकाष्‍ठेचे प्रयत्न चालू आहेत.

जैविक प्रक्रियेची संकल्पना

  • जैविक प्रक्रियेमध्ये जैवरासायनिक अभिक्रियांसाठी जीवाणूंची नैसर्गिक कार्यशीलता पद्धतशीररित्या वापरण्‍यात येते ज्यामुळे जैविक पदार्थांचा CO2, H2O, N2 आणि SO4 मध्ये प्राणवायूशी संयोग (ऑक्सिडेशन) होतो.
  • घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ज्या प्रक्रियांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्‍यात येतो त्यामध्ये ऍक्टिवेटेड स्लज ऍण्ड ट्रिकलिंग फिल्टर पद्धत, ऑक्सिडेशन/वेस्ट स्टॅबिलाझेशन पॉण्ड्स, एरेटेड लॅगून्स आणि विविध अनऍरोबिक प्रक्रिया पद्धतींचा समावेश आहे.
  • सर्वात आधुनिक पद्धत आहे अपफ्लो अनऍरोबिक स्लज ब्लॅंकेट (यूएएसबी) पद्धत. अनेक देशांमध्ये शेती, बागकाम आणि जलसंवर्धन यांच्याद्वारे सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्याच्या पारंपारिक पद्धती लोकप्रिय आहेत. कोलकाता येथील भेरींमधील सांडपाण्यावर केली जाणारी माशांची शेती जगप्रसिद्ध आहे. या पद्धतींमध्ये प्रामुख्याने सांडपाण्यातील पोषकतत्त्वे परत मिळवण्यावर भर दिला जातो.
  • या सर्व पद्धतींपासून प्रेरित होऊन आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या विविध शाखांद्वारा मिळालेल्या नवनव्या माहितीचा आधार घेऊन घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी “जलसंवर्धन” ही संकल्पना तयार आणि प्रमाणित करण्यात आली आहे.

प्रक्रियेची पद्धत

 

 

 

 

पानवनस्पतीच्या तलावाचे अवलोकन

जलसंवर्धनाद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या पद्धतीमध्ये सांडपाणी जमा करणारी यंत्रणा, पाणवनस्पतीचे संस्करीत समूह, सांडपाण्यावर जगणार्‍या माशांचा तलाव, शुद्धीकरण तलाव आणि उर्वरीत घटक बाहेर जाण्यासाठी यंत्रणा यांचा समावेश असतो.

  • पाणवनस्पतीच्या संस्करीत समूहात पाणवनस्पतींचे विविध तलाव असतात ज्यामध्ये स्पायरोडेला, वोल्फिया आणि लेम्ना यांसारख्या जलीय सूक्ष्मवनस्पती असतात. सांडपाणी गुरूत्वाकर्षणाच्या साहाय्याने किंवा ते एकत्रित करणार्‍या यंत्रणेच्या साहाय्याने पाणवनस्पतींच्या संस्करीत समूहात सोडले जाते आणि ते नंतर माशांच्या तलावात सोडण्यापूर्वी 2 दिवस तेथेच साठविले जाते.
  • दर रोज 10 लाख लीटर्स सांडपाण्यासाठी तयार केलेल्या प्रतिमानात 25 मी. X 8 मी. X 1 मी. आकाराचे 3 रांगांमध्ये बांधलेले एकूण 18 पाणवनस्पतींचे तलाव असतात. त्यांच्या अशा रचनेमुळे पाणी पाणवनस्पतींच्या तीन तलावांच्या मालिकेतून पास होत चढत्या स्तराने माशांच्या तलावात जाते.
  • यामध्ये 50 मी. X 20 मी. X 2 मी. आकारांचे माशांचे 2 तलाव आणि 40 मी. X 20 मी. X 2 मी. आकाराचे 2 शुद्धीकरण तलाव यांचाही समावेश असतो. या यंत्रणेमध्ये घनपदार्थ काढून टाकलेले प्राथमिकरित्या प्रक्रिया केलेले पाणी मिळते.
  • दुसरीकडे भुवनेश्वरमध्ये दोन ठिकाणी बसवलेली दर रोज 80 लाख लिटर्स सांडपाणी शुद्ध करणारी  यंत्रणा प्रचंड प्रमाणातील सांडपाणी हाताळण्यासाठी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनविण्‍यात आली आहे.
  • प्रभावशाली प्रक्रियेसाठी जैविक ऑक्सीजनच्या कमाल मागणीची पातळी 100-150 मि.ग्रा./ली. एवढा असतो त्यामुळेच जेथे जैविक भार आणि जैविक ऑक्सीजनच्या मागणीची (बीओडी) पातळी उच्च असते तेथे ऍनारोबिक युनिट कार्यान्वित करणे आवश्यक असते.
  • पाणवनस्पतींचे संस्करीत युनिट जड धातू आणि इतर रासायनिक अवशेषांना काढून टाकण्यास मदत करते. तसे न केल्यास हे पदार्थ संस्करीत माशांद्वारे मानवी अन्नसाखळीत प्रवेश करतील. हे युनिट पोषण पंप म्हणूनही कार्य करतात आणि युट्रोफिकेशन प्रभाव कमी करून त्यांच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे ऑक्सीजनचा पुरवठा करतात. साधारणतः 100 मि.ग्रा./ली. चे बीओडी 5 पातळीमधील सांडपाणी एकूण 6 दिवस साठवून त्याची बीओडी 5 पातळी 15-20 मि.ग्रा./ली. वर आणता येते ज्यामुळे ते नैसर्गिक पाण्यात सोडण्यास आवश्यक असलेल्या बाबींपैकी काही बाबींची पूर्तता करते.
  • सांडपाण्यावर पोसल्या जाणार्‍या यंत्रणेची उच्च उत्पादनक्षमता आणि वहनक्षमता यांचा फायदा घेऊन माशांच्या संस्करीत तलावातून दर हेक्टरी 3-4 टन गोड्या पाण्यातील माशांचे उत्पादन घेता येऊ शकते. ही यंत्रणा म्हणजे पाणवनस्पती आणि माशांच्या स्वरूपात उच्च प्रमाणामध्ये स्त्रोतांची भरपाई करून देणारी जैविक प्रक्रिया यंत्रणा आहे. मात्र थंडीच्या मोसमामध्ये आणि सौम्य तापमान असणार्‍या प्रदेशांत या प्रक्रियेची कार्यक्षमता थोडीशी खालावते हा या यंत्रणेचा मुख्य तोटा आहे. दर रोज 10 लाख लिटर्स पाण्याच्या शुद्धीकरणासाठी लागणारी कमी म्हणजेच साधारण 1 हेक्टर जागा आणि उत्पादनाचा खर्च भागवून होणारा फायदा यामुळे ही यंत्रणा नैसर्गिक पाण्यात सोडण्यासाठी केल्या जाणा-या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेतील आदर्श यंत्रणा आहे.

दर रोज १० लाख लिटर्स शुद्धीकरण क्षमतेचे अर्थशास्त्र

अनु.क्र.

विषयवस्तु

किंमत
(लाखांमध्ये)

I.

खर्च

स्थिर भांडवल

पाणवनस्पतींचे तलाव बांधणे (0.4 हेक्टर)

3.00

माशांचे तलाव बांधणे (0.2 हेक्टर)

1.20

शुद्धीकरण तलाव बांधणे (0.1 हेक्टर)

0.60

पाईपलाईन्स, दारे, प्रदूषक वाहिन्या, इ.

5.00

पंप आणि इतर सामुग्री, तलावांची आतील बांधणी, इ.

5.00

पाण्याचे विश्लेषण करण्यासाठी साहित्य

1.00

 

एकूण ()

15.80

अस्थिर खर्च

 

पगार (दरमहा रु. 2000 दराने 2 जण)

0.48

वीज आणि इंधन

0.24

माशांचे खाद्य

0.02

इतर खर्च

0.10

 

एकूण ()

0.84

II.

उत्पन्न

1

रु. 30/किलो दराने 1000 किलो माशांची विक्री

0.30

 

अस्थिर खर्चाचा परतावा

35%

स्त्रोत: सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर ऍक्वाकल्चर, भुवनेश्वर, ओरिसा

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate