Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/07/12 13:16:56.218996 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / औषधी वनस्पती लागवड
शेअर करा

T3 2020/07/12 13:16:56.225409 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/07/12 13:16:56.255252 GMT+0530

औषधी वनस्पती लागवड

औषधी वनस्पतीची लागवड या घटक योजनेअंतर्गत समूह पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीकरिता प्रजातीनिहाय प्रकल्प खर्चाच्या २० टक्के, ५० टक्के व ७५ टक्के एवढे वित्तीय साह्य देय आहे.

औषधी वनस्पती लागवड

 • औषधी वनस्पतीची लागवड या घटक योजनेअंतर्गत समूह पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीकरिता प्रजातीनिहाय प्रकल्प खर्चाच्या २० टक्के, ५० टक्के व ७५ टक्के एवढे वित्तीय साह्य देय आहे.
 • औषधी वनस्पती पिकांची लागवड प्राधान्याने समूह पद्धतीने करण्यात यावी. समूह निश्चिअती करण्याकरिता औषधी वनस्पती पिकांचे किमान दोन हेक्टार क्षेत्र असावे. यामध्ये साधारणपणे कमीत कमी पाच शेतकऱ्यांचा व जास्तीत जास्त तीन गावांचा समावेश असावा.
 • वैयक्तिक शेतकरी सदर घटक योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास त्याचे लागवडीसाठीचे प्रस्तावित क्षेत्र कमीत कमी ०.२० हेक्टतर असणे आवश्यवक आहे. समूह हा शक्यधतो औषधी वनस्पती प्रजातीनिहाय असावा. प्रजातीनिहाय समूह शक्य् नसल्यास २ ते ३ प्रजातींचा समावेश असलेल्या एकत्रित लागवडीचा समूह करावा व त्याचे क्षेत्र सलग असावे. आंतरपीक व मिश्र पद्धतीने औषधी वनस्पतीची लागवड अर्थसाह्यासाठी पात्र आहे.
 • या घटक योजनेअंतर्गत औषधी वनस्पती उत्पादक, शेतकरी लागवडदार इ., तसेच औषधी वनस्पती उत्पादक संघ, फेडरेशन, स्वयंसहायता गट, कंपनी, उत्पादक सहकारी संस्था इ. यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
 • लागवडपश्चायत व्यवस्थापन

  वाळवणी गृह

 • वाळवणी गृह घटकअंतर्गत औषधी वनस्पती काढणी केलेल्या कच्चा माल वाळविणे, याशिवाय उत्पादित मालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी मालाची स्वच्छता व प्रतवारी करणे शक्यळ होणार आहे.
 • स्वयंसहायता गट/ सहकारी संस्था/ सार्वजनिक संस्था यांच्यासाठी या योजनेअंतर्गत १०० टक्के व कमाल पाच लाख रुपये अर्थसाह्य उपलब्ध होणार आहे. तसेच खासगी क्षेत्रासाठी सदरची योजना बॅंक कर्जाशी निगडित असून, वैयक्तिक लाभार्थीकरिता ५० टक्के व कमाल २.५० लाख रुपये अर्थसाह्य देण्यात येईल.
 • साठवण गृह

 • राज्यातील औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने साठवण गृह घटक योजना अत्यंत महत्त्वाची आहे. औषधी वनस्पतींच्या समूह क्षेत्रांमध्ये वाळवणी गृहांची, तसेच साठवण गृहांची योजना राबविली जाते. सदर साठवण गृह हे वाळवणी गृह व प्रक्रिया केंद्र यामध्ये दुवा साधण्याचे काम करणार आहे.
 • या योजनेअंतर्गत स्वयंसहायता गट/ सहकारी संस्था यांच्यासाठी १०० टक्के व कमाल पाच लाख रुपये अर्थसाह्य मिळते.
 •  


   

  3.0
  घटे संगिता Aug 22, 2015 11:11 AM

  घराच्या छतावरील शेती कशी करायची या बदल सविस्तर माहिती सांगा

  InDG.SNA Aug 13, 2014 03:59 PM

  मा. श्री सोनवणे
  आपल्या जवळचे कृषी विद्यापीठ किवा कृषी विज्ञान केंद्र शी संपर्क साधावा. ते आपणास योग्य सल्ला व माहिती मिळू शकेल

  धन्यवाद
  अनिरुद्ध मिरीकर

  नंदु सोनवाने Aug 07, 2014 09:00 AM

  मला एलोवेरा लागवड करणे आहे त्याबद्दल रोप उपलब्ध आणि विक्री थळे याबद्दल संपुण माहिती हवी

  DNYANESHWAR Jul 20, 2014 03:18 PM

  हळद लागवड करावयाची असल्यास त्याविषयीची माहिती कोठून व कशी मिळेल योजनेतून कागी अर्थ साहाय्य मिळेल का

  manoj Jul 08, 2014 07:05 PM

  छान माहिती आहे . मसाला उत्पादासाठी शेत काय्रात बदल पाहिजे .
  आणि टोल फ्री नंबर पाहिजे

  आपल्या सूचना पोस्ट करा

  (वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

  Enter the word
  नेवीगेशन

  T5 2020/07/12 13:16:57.080386 GMT+0530

  T24 2020/07/12 13:16:57.087078 GMT+0530
  Back to top

  T12020/07/12 13:16:56.104172 GMT+0530

  T612020/07/12 13:16:56.123115 GMT+0530

  T622020/07/12 13:16:56.204921 GMT+0530

  T632020/07/12 13:16:56.205821 GMT+0530