অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृषिविषयक संस्था

कृषिविषयक संस्था

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके हे कार्य चालते.
राज्यात सध्या ४ कृषी विद्यापीठे असून या विद्यापीठांमधून कृषी व संबंधित विषयांमधील पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकवले जातात. या विद्यापीठांमधून कृषी संशोधनही होत असते.

४ कृषी विद्यापीठे पुढीलप्रमाणे

महात्मा फुले कृषी विद्यापीठ

स्थापना : १९६८
स्थान-राहूरी, जि. अहमदनगर.
प्रमुख संशोधन विषय - ऊस, ज्वारी, आणि गहू.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

स्थापन : १९६९      
स्थान -अकोला.
प्रमुख संशोधन विषय - कापूस, गहू, डाळी, व तेलबिया

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

स्थापना : १९७२ 
स्थान-दापोली, जि. रत्नागिरी. प्रमुख संशोधन विषय - फलोत्पादन, खारभूमी, मत्स्यव्यवसाय, तांदूळ व नागली.

मराठवाडा कृषी विद्यापीठ

स्थापना : १९७२  
स्थान - परभणी
प्रमुख संशोधन विषय - कापूस, ऊस, गहू, डाळी, ज्वारी, तेलबिया व रेशीम विकास

या चारही विद्यापीठांच्या कार्यपद्धतीत योग्य समन्वय राहावा आणि शिक्षण व संशोधनविषयक नियोजन योग्यरीत्या व्हावे याकरिता राज्यात महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद ही वैधानिक संस्था पुण्यात स्थापन करण्यात आली आहे.

कृषी संशोधन करणार्‍या इतर महत्त्वाच्या संस्था

पुढे राष्ट्रीय, राज्य व विभागीय स्तरावर महाराष्ट्रातून संशोधन व प्रशिक्षणात्मक कार्य करणार्‍या संस्थांची / केंद्रांची सूची दिलेली आहे.

  1. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे. (डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट) - ऊस संशोधन
  2. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च, नागपूर - कापूस संशोधन
  3. नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर - मृदा परीक्षण व जमिनीचे व्यवस्थापन.
  4. नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे - द्राक्ष संशोधन
  5. नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ओनियन अँड गार्लिक, राजगुरुनगर, पुणे. - कांदा व लसूण संशोधन
  6. जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट- वाल्मी), औरंगाबाद - सिंचन, पाण्याचे व्यवस्थापन या विषयांवरील प्रशिक्षण देणारी संस्था.
  7. राष्ट्र्रीय कृषी संशोधन प्रकल्प, साकोली, जि. भंडारा.
  8. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, तारसा, जि. नागपूर
  9. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, सिंदेवाही, जि. चंद्रपूर

अन्य राज्यस्तरीय व विभागीय संशोधन केंद्रे.

  • कोरडवाहू साळ संशोधन केंद्र, तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
  • पेरसाळ संशोधन केंद्र, परभणी, जि. परभणी.
  • अवर्षणप्रवण क्षेत्र, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर (कोरडवाहू शेतीबाबत संशोधन)
  • कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड.
  • कृषी संशोधन केंद्र, जळगाव (गळित धान्ये, कापूस व  केळी या पिकांबाबत संशोधन)
  • कृषी संशोधन केंद्र, राधानगरी, जि. कोल्हापूर.
  • उपपर्वतीय विभाग, विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडापार्क, कोल्हापूर (जैविक कीडनियंत्रणाबाबत संशोधन)
  • कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक (गहू)
  • पश्चिम घाट विभाग, विभागीय कृषी संशोधन प्रकल्प, इगतपुरी, जि. नाशिक (भात, फलोद्यान व वनशेती यांबाबतचे संशोधन)
  • कृषी संशोधन केंद्र, लोणवळा, जि. पुणे.
  • कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ, जि. पुणे.
  • ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, पो. निरा, जि. पुणे.
  • पश्चिम महाराष्ट्र मैदानी विभाग, विभागीय फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे.

प्रमुख विद्यापीठांच्या अंतर्गत संशोधन करणारी केंद्रे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
१. मध्य विदर्भ विभाग, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ.
२. पूर्व विदर्भ विभाग, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर

मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मध्य महाराष्ट्र पठारी विभाग, विभागीय कृषी संशोधन केंद्र, औरंगाबाद.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

१. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.
२. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड.
३. खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल, जि. रायगड.
४. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी.
५. आंबा संशोधन केंद्र, रामेश्वर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग.
६. तारापोरवाला सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र, बांद्रा, मुंबई.
७. सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन, जि. रायगड.

शेतकरी प्रशिक्षण केंद्रे


प्रगत कृषी तंत्रज्ञान जलदगतीने शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावे यासाठी आणि प्रत्येक विभागातील प्रमुख पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ५६ कृषी प्रशिक्षण केंद्राची स्थापना महाराष्ट्र सरकाराकडून करण्यात आली आहे.
कार्य :
१. शेतकर्‍यांना प्रशिक्षण सुविधांची उपलब्धता.
२. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिक प्रशिक्षणे.
३. मृदा व पाण्याचे पृथ:करण.
४. पिकांवरील कीड व रोग नमुन्याचे निदान व सल्ला सुविधा.

-------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: शेतकरी

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate