१) कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्यकरणा-या व्यक्तीला किवा गटाला किवा संस्थेला पुरस्कार देणेत प्रास्तावीत करण्यात यावे. प्रास्तावीत गटाने किवा संस्थेने केलेले कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.
२) प्रपत्रामध्ये माहिती देताना संबंधित शेतक-यांचे ई-मेल, वेबसाईट इत्यादी बाबींचा समावेश करुन त्याचे कार्य व कार्यक्षेत्र हा मुद्दा विचारात घेणेत यावा.
३) प्रपत्रामध्ये माहिती देताना शेतक-यांचा आधारकार्ड नंबर व बँकेचा खाते क्रमांक यांसह त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण केलेले कार्य त्यामुळे इतर शेतक-यांना झालेला फायदा या तपशिलासह सबंधितांनी शासन / कृषि क्षेत्रात सहभाग घेणे आवश्यक आहे.
४) शासकीय किवा शासन अंगीकृत व सहकार संस्था(उदा.स्थानिक स्वराज्य संस्था, कृषि विद्यापिठे) यांच्या आस्थापनेवर काम करणारे किवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. तसेच केंदशासनाकडन किवा राज्य शासनाकडून किवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी संस्था किवा व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र असणार नाही
५) सबंधिताने पूर्वी घेतलेल्या पुरस्काराचा तपशील, तसेच कृषि विभागाकडून किवा इतर विभागाकडून मिळालेल्या पुरस्काराचा तपशील प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
६) सबंधितानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.
सेंद्रीय शेतीमध्ये उल्लेखनीय काम तसेच आधुनिक तत्रंज्ञानाचा वापर करुन शेतीचे उत्पादन करणारा सातारा जिल्हयातील कोणताही शेतकरी या पुरस्कारासाठी निवडीमध्ये भाग घेऊ शकेल. सदरचा पुरस्कार केवळ सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने देणेत येतो व त्याचे वितरण दरवर्षी १ जुलै या दिवशी केले जाते.
डॉ. जे.के.बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती खालील प्रमाणे
स्त्रोत :
अंतिम सुधारित : 7/13/2020
१९७० साली आयुर्वेद मंडळातर्फे मुंबईत साजऱ्या झालेल...
भारतीय मानवशास्त्रज्ञ. भारतीय सामाजिक- सांस्कृतिक...
शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांना बह...
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप.