Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/06/07 03:23:50.588592 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / चारा विकास योजना
शेअर करा

T3 2020/06/07 03:23:50.593213 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/06/07 03:23:50.618638 GMT+0530

चारा विकास योजना

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग एक योजना राबवीत आहे जिचे नाव आहे केंद्र पुरस्कृत चारा विकास योजना.

चारा विकास योजना

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग एक योजना राबवीत आहे जिचे नाव आहे केंद्र पुरस्कृत चारा विकास योजना. चारा व अन्नपदार्थ (फीड) संवर्धनासाठी राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देणारी ही योजना आहे. सन 2005-06 पासून ही योजना, तिच्या खालील चार घटकांसह, राबवली जात आहे -

 1. चार्‍याचे ठोकळे (फॉडर ब्लॉक्स) बनवणारी यंत्रे उभारणे
 2. चराऊ कुरणे विकसित करणे, काही कुरणे राखीव ठेवणे
 3. चराऊ गवताच्या बियाण्याचे उत्पादन व वितरण
 4. जैवतंत्रज्ञानात्मक संशोधन प्रकल्प

२०१० पासून केंद्र पुरस्कृत चारा विकास योजनेत थोडेफार बदल केले गेले आहेत ज्यायोगे उपलब्ध असलेल्या चार्‍याचा जास्त कार्यक्षमतेने वापर करून घेता येईल. ह्यासाठी १४१.४० कोटी रूपयांची खर्चास मान्यता मिळाली आहे व ह्या योजनेमध्ये खालील नवीन घटक व तंत्रज्ञानाचा समावेश केला गेला आहे -

 • चारा चाचणी करणार्‍या प्रयोगशाळांचे जाळे बळकट करणे
 • तूस कापणी यंत्रांचा वापर करणे व वाढवणे
 • मुरलेला चारा बनवणार्‍या यंत्रणेची स्थापना
 • अझोला प्रकारच्या जोपासना व उत्पादन यंत्रणेचे प्रात्यक्षिक
 • बायपास प्रथिने बनवणार्‍या यंत्रणेची स्थापना
 • एरिया स्पेसिफिक मिनरल मिक्स्चर (एएसएमएम) / चार्‍याच्या गोळ्या / चारा उत्पादक यंत्रणांची स्थापना
 • शिवाय, चालू घटक योजनेवरील अनुदाना खेरीज, चार्‍याचे ठोकळे बनवण्याच्या यंत्रणेस दिले जाणारे अनुदान ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे ज्यायोगे ह्या योजनेतील सहभाग वाढेल. तसेच कुरण-विकास योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठीची जमिनीची मर्यादा, राखीव कुरणां सहित, ५-१० हेक्टर करण्यात आली आहे.

  विविध घटक, कार्यपद्धती, यंत्रणेची किंमत व ११ व्या पंचवार्षिक योजनेतील बाकी असलेल्या २ वर्षां मध्ये गाठण्याच्या उद्दिष्टांचा तपशील ह्याप्रमाणे

  परिवर्तित / नवीन घटकाचे नाव

  लाभार्थी

  मदतीचा प्रकार

  प्रत्येकी किंमत (लाख रूपयांत)

  चार्‍याचे ठोकळे बनवणार्‍या यंत्रणेची स्थापना

  सार्वजनिक / खाजगी उद्योजक,  सहकारी संस्था व स्व-मदत गटांसहित

  50:50

  85.00

  चराऊ कुरणे विकसित करणे, राखीव कुरणां सहित

  शेतकरी, जंगले व पशुसंवर्धन विभाग. पंचायतीच्या जमिनींवर तसेच अन्य सामाईक स्रोतांच्या वापराने चराऊ कुरणे विकसित करण्यासाठी स्वयं सेवी संस्था व ग्राम पंचायतीच्या यंत्रणेस सामील करून घेतले जाईल

  100:00

  0.70

  चराऊ गवताच्या बियाण्याचे उत्पादन व वितरण

  शेतकरी. राज्य सरकार SIA/सहकारी दुग्धविकास संस्था/स्वयंसेवी संस्थांना प्रकल्पाच्या अंमल बजावणी मध्ये सामील करून घेऊ शकतात. राज्य शासनाद्वारे, दर क्विंटलला रु. ५००० प्रमाणे, एकूण ३७,००० क्विंटल चारा-बियाणांचे उत्पादन केले जाईल व ते शेतकर्‍यांना वाटले जाईल.

  75:25

  0.05

  चारा चाचणी करणार्‍या प्रयोगशाळांचे जाळे बळकट करणे

  सध्या अस्तित्वात असलेली  पशु वैद्यकीय कॉलेजे/ कृषी महाविद्यालयाच्या पशु-पोषण प्रयोगशाळा. चार्‍याच्या विश्लेषणासाठी लागणारी यंत्रणा / उपकरणांच्या खरेदीसाठी पैशाची तरतूद केली जाईल. मान्यताप्राप्त उपकरणांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

  50:50

  200.00

  हाताने चालवण्याच्या तूस-कापणी यंत्राचा परिचय

  शेतकरी व सहकारी दुग्धसंघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य

  75:25

  0.05

  विजेवर चालविण्याच्या तूस-कापणी यंत्राचा परिचय

  शेतकरी व सहकारी दुग्ध संघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य

  75:25

  0.20

  मुरलेला चारा बनवणार्‍या यंत्रणेची स्थापना

  शेतकरी व सहकारी दुग्धसंघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य

  100:00

  1.05

  अझोला प्रकारच्या जोपासना व उत्पादन यंत्रणेचे प्रात्यक्षिक

  शेतकरी व सहकारी दुग्धसंघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य

  50:50

  0.10

  बायपास प्रथिने बनवणार्‍या यंत्रणेची स्थापना

  दुग्ध विकास संघ /  ज्यांच्या प्रकल्पास कोणत्याही व्यापारी बँकेची परवानगी आहे असे खाजगी क्षेत्रातील उद्योजक

  25:75

  145.00

  एरिया स्पेसिफिक मिनरल मिक्स्चर (एएसएमएम) / चार्‍याच्या गोळ्या / चारा उत्पादक यंत्रणांची स्थापना

  सार्वजनिक / खाजगी उद्योजक,  सहकारी दुग्धसंस्था व ज्यांच्या प्रकल्पास कोणत्याही व्यापारी बँकेची परवानगी आहे असे स्व-मदत गट. फक्त यंत्रणा अथवा उपकरणांच्या खरेदीसाठी पैशाची तरतूद केली जाईल.

  25:75

  100.

  स्रोत : destatalk

  2.95901639344
  विशाल भुसारा Nov 04, 2015 05:55 PM

  मला मत्स व्यवसाय साठी तलावाच्या योजने विषयावर माहिती हवी आहे.

  आपल्या सूचना पोस्ट करा

  (वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

  Enter the word
  नेवीगेशन

  T5 2020/06/07 03:23:51.024320 GMT+0530

  T24 2020/06/07 03:23:51.030117 GMT+0530
  Back to top

  T12020/06/07 03:23:50.458228 GMT+0530

  T612020/06/07 03:23:50.477055 GMT+0530

  T622020/06/07 03:23:50.578465 GMT+0530

  T632020/06/07 03:23:50.579375 GMT+0530