Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/07/12 11:45:55.563474 GMT+0530
शेअर करा

T3 2020/07/12 11:45:55.568407 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/07/12 11:45:55.593490 GMT+0530

पिक विमा

शेतकऱ्यांनी शेतातील नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा.

शेती आणि विमा

भारत हा कृषी प्रधान देश असून शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. कृषी उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रकारच्या योजना आणि धोरणे महाराष्ट्र शासन पातळीवर राबविली जात आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलांमुळे शेतीपुढे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत.

विमा योजना शेतकरीप्रिय होण्यासाठी सध्याच्या राष्ट्रीय पीक विमा योजनेत मोठे परिवर्तन आवश्‍यक होते व आहे. राज्याच्या आठही भागातील पीकपद्धती, हवामान आणि उत्पन्नावर आधारित नवी "सर्वंकष पीक विमा योजना' त्रुटीविरहित असेल याची दक्षता घेण्यात आली आहे. पीक कापणी प्रयोगासारख्या पारंपरिक पद्धतींवर नुकसानभरपाईचे निकष ठरविण्याऐवजी हवामान आणि प्रत्यक्ष उत्पन्नावर आधारित नव्या पीक विमा योजना आता काळाची गरज झाली आहे.

गावनिहाय पर्जन्यमापक यंत्रे शक्‍य नाहीत, परंतु मंडलनिहाय पर्जन्यमापक यंत्रे सर्वप्रथम बसविण्यास शाशनाचे प्राधान्य यापुढील काळात राहील. यासाठी नवी "ऍग्रिकल्चर वेदर फोरकास्टिंग मशिन' बसविली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ही सर्व यंत्रणा उपग्रहाशी जोडण्यात येणार आहे, यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन आणि आठवड्याचा आगाऊ (ऍडव्हान्स) हवामानाचा अंदाज मिळेल. पीक विम्याबरोबरच शेतीच्या नियोजनासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. विमा हप्त्यापोटीची अनुदानाची रक्कम अर्थसंकल्पित झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खासगी विमा कंपन्यांच्या प्रवेशामुळे विमा क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. राज्य पातळीवरून प्रस्ताव देताना पीक विमा सुटसुटीत आणि अत्यंत सोपा करण्यावर भर देण्यात येईल. नुकसानभरपाईसाठी दुष्काळ आणि अतिवृष्टी हेच निकषांवर पुढील काळात अवलंबून राहता येणार नाही. भारनियमन, शेतीमालाचा पडणारा भाव, वातावरणातील बदलांमुळे शेतीचे होणारे आकस्मिक नुकसान या बाबींचादेखील आता विचार करावा लागणार आहे.'' फळपिकांसाठी हवामान आणि उत्पन्नावर आधारितच पीक विमा आवश्‍यक आहे. तसेच शेतकऱ्यांनीही वेळोवेळी आवश्यक पिक विमा काढून होणाऱ्या नुकसानीस प्रतिबंध घालून हवामानवर आधारित पिक नियोजन करावे.

 

3.11320754717
akash chakranarayan Aug 01, 2017 09:20 AM

पिक विमा कोना कडे भरावा

लक्ष्मण धनपावले Jul 30, 2017 11:26 PM

पिक विमा कसा भरावा

vijay Jul 30, 2017 02:15 PM

पीक विमा योजना चालू आहे का असेलतर फॉर्म कसा पाहावा

आडकेकर सी एस. Jul 30, 2017 11:45 AM

मी नांदेड येथील तरोडा खुर्द पाटी जवळील सेतु केंद्रांत पिक विमा भरला परंतु मला पेमेंट रिझल्ट अशी पावती मिळाली आहे. त्याचा सी.एस.सी.आय .डी. ४५९५१०८९००१९ , पी.जी.ट्रँजक्शन आय.डी. ७२०६१६०२१५५१६७६१ , मर्चँट ट्रँजक्शन आय.डी. ६५१६९२०१७०७२६१६०२४००७२१, तसेंच क्राँप आय.डी. ५४५७३४२०४५ पेमेंट अमाऊंट १०६२.८० दि.२६/०७/२०१७ भरला आहे. ही रक्कम विमा कंपनी कडे जमा झाली का नाही ही माहिती कळविणे. - आडकेकर सी.एस.

सोमनाथ कौलगे Jul 30, 2017 08:08 AM

पिक विमा अर्ज कसा पहावा

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/07/12 11:45:56.194150 GMT+0530

T24 2020/07/12 11:45:56.200647 GMT+0530
Back to top

T12020/07/12 11:45:55.426654 GMT+0530

T612020/07/12 11:45:55.445239 GMT+0530

T622020/07/12 11:45:55.552393 GMT+0530

T632020/07/12 11:45:55.553504 GMT+0530