অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रयोगशीलतेतून शेती प्रगती केलेल्या बळिराजाचा झाला सन्मान

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दर वर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी, संस्था, पत्रकार यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. सन 2013 या वर्षासाठीचे या पुरस्कारांचे गुरुवारी (ता. 14) नाशिकमध्ये वितरण करण्यात आले. या पुरस्कारार्थींची ही संक्षिप्त माहिती...

जिजामाता कृषिभूषण 2013

1) श्रीमती ज्योती गोपाल पायधुने, मु. गोर्धा, पो. हिंगणी, ता. तेल्हारा, जि. अकोला

  • दीड एकर क्षेत्र, कौटुंबिक अडचणींचा सामना करीत सेंद्रिय शेतीचा अवलंब
  • निंबोळी आधारित कीटकनाशके तयार करून अवलंब व विक्री
  • 30 नवीन महिला बचत गटांची स्थापना, विविध पुरस्कारांनी सन्मान.
2) सौ. वैजयंती विद्याधर वझे, मु. पो. तमदलगे, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
  • 30 दुभत्या मुऱ्हा म्हशींचा आदर्श गोठा व दुग्ध उत्पादन
  • ज्वारी, गहू, सोयाबीन, भुईमूग, ऊस, केळी आदी पिकांचे उत्पादन
  • महिला बचत गटांमार्फत कृषी आधारित प्रक्रिया उद्योगाची सुरवात

3) सौ. मीनाक्षी मदन चौगुले, मु. पो. तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

  • 13 एकरवर सूक्ष्म सिंचनाद्वारा द्राक्ष, ऊस, तेलताड, केळी, भाजीपाला उत्पादन
  • अत्याधुनिक यंत्रसामग्री, अपारंपरिक ऊर्जा उपकरणांचा वापर
  • 10 मुऱ्हा म्हशींद्वारा दुग्धोत्पादन, विविध संस्थांमार्फत गौरव.


4) सौ. सुजाता अविनाश थेटे, मु. पो. निमगाव जाळी, ता. संगमनेर, जि. नगर

  • अभियांत्रिकी पदविकाप्राप्त शेतकरी, गट स्थापन करून 17 पॉलिहाउस उभारणी
  • ग्रीनसन सहकारी विपणन संस्था स्थापन करून द्राक्ष निर्यात
  • सूक्ष्म सिंचनाचा अवलंब, सामाजिक क्षेत्रातही योगदान.

5) सौ. चंद्रकला देविदास वाणी, मु. पो. वणी, ता. जि. धुळे

  • कागदी लिंबू, कापूस, बाजरी, मका, मिरची, भुईमूग, कांदा, हरभरा उत्पादन
  • शेततळे, कंपोस्ट खत, गांडूळखत निर्मिती, बीजप्रक्रिया, मित्रकीड यांचा अवलंब
  • महिला बचत गटामार्फत पापड, लोणचे उत्पादन व विक्री, अंगणवाडीसाठी पोषण आहार

6) सौ. मीलन कृष्णा राणे, मु. पो. खारपाळे, ता. पेन, जि. रायगड

  • काजू, आंबा, आवळा, सीताफळ फळझाडांची लागवड
  • महिला बचत गट स्थापन करून हळद लागवड, कर्ज मिळवून देण्यात पुढाकार
  • स्वयंउद्योगासाठी बचत गटातील महिलांना प्रशिक्षण

वसंतराव नाईक कृषिभूषण 2013

1) श्रीराम सखाराम गाढवे, मु. पो. आर्वी, ता. जुन्नर, जि. पुणे

  • कृषी पदवीधर, भाजीपाला रोपनिर्मिती तंत्र विकसित, मल्चिंगसाठी यंत्राचा वापर
  • अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष
  • जुन्नर तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. स्थापना
  • शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्रीसाठी पुणे, मुंबईत उपक्रम

2) महादेव बापूराव शेंडकर, मु. पो. पिंपरी, ता. पुरंदर, जि. पुणे

  • वडिलोपार्जित 2.38 हेक्‍टर क्षेत्र, मातीपरीक्षण करून खतवापर
  • हरितगृहात कार्नेशन उत्पादन, पॅकहाऊस, शेततळे, बाजारकेंद्रित उत्पादन

3) गो विज्ञान संशोधन व बहुउद्देशिय संस्था, भुसावळ

  • दगडी माळरानावर वृक्ष लागवड, पाणी अडविण्यासाठी चर, सिमेंट बंधारा, गोपालन
  • शिरपूर पॅटर्नचा अवलंब, बायोगॅस प्रकल्पांची उभारणी, 15 हजार वृक्ष लागवड
  • आदिवासींना मोफत जलसेवा, वाचनालय,

4) रमेश बाबाजी देशमुख, मु. काराव, पो. वांगणी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे

  • जमिनीची बांधबंदिस्ती करून विविध फळझाडांची लागवड, शेततळे, वनझाडांची लागवड
  • शेतमालावर आधारित गृह उद्योगाचे महिलांना प्रशिक्षण
  • कृषी स्वयंसहायक गटाची स्थापना, उल्हास नदीकिनारी पर्यटन केंद्र

5) शरदराव पुंडलिकराव पा. ढोकरे, मु.पो. खेडगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक

  • फळझाडे, वनझाडांची लागवड, कंपोस्ट खतनिर्मिती
  • आधुनिक पद्धतीची द्राक्षशेती, कुक्‍कुटपालन व दुग्धव्यवसाय
  • विविध देशांचे, विद्यापीठांचे कृषी अभ्यास दौरे

6) पांडुरंग साहेबराव आवाड, मु. पो. शिरपूरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद

  • ठिबक सिंचन, एक डोळा व रुंद सरी पद्धतीने उसाचे एकरी 140 टनांपर्यंत उत्पादन
  • तंटामुक्त अभियानाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यात सहभागी
  • कृषी व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित

7) आनंदराव काकासाहेब देशमुख, मु. पो. ईट, ता. भूम, जि. उस्मानाबाद

  • कृषी पदवीधर, 51.76 हेक्‍टर शेतजमीन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
  • ऊस, तूर, पपईचे विक्रमी उत्पादन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन
  • 21 एकर उसासाठी ठिबक सिंचन, पाचट मल्चिंग

8) अशोक राजेसाहेब देशमुख, मु. पो. नांदुरा (बु.), ता. अहमदपूर, जि. लातूर

  • ऊसशेती, द्राक्ष लागवड, कुक्‍टुटपालन, दुग्धव्यवसाय
  • वैयक्तिक व सामुदायिक शेततळे, सिमेंटचे तळे
  • तलावातील गाळ काढून 10 एकर पडीक जमीन विकास व विक्रमी उत्पादन

9) विजय अण्णाराव नरवाडे, मु. पो. पार्डी, ता. वसमत, जि. हिंगोली

  • एकात्मिक शेती पद्धतीने पिके, फळपिके, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन
  • टिश्‍यू कल्चर रोपांचा वापर, सुसज्ज गोठा व गावरान कोंबड्यांचे संगोपन
  • गांडूळ खतनिर्मिती, सहकारी पाणीवापर संस्थेची स्थापना, शेतकरी संघामार्फत पपईविक्री

10) पोपटराव बाबुराव दापके, मु. पो. बहिरगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद

  • टोमॅटो, कांदा, आले, कापूस यांत विक्रमी उत्पादन, अनेक प्रयोग
  • उत्पादक गटांच्या शेतमालाची ग्रुप मार्केटिंग पद्धतीने विक्री
  • बाजार माहिती केंद्र, कृषी विज्ञान मंडळ स्थापन

11) राजेंद्र सातप्पा हांडे, मु. पो. आरग, ता. मिरज, जि. सांगली

  • शेतातील नऊ विहिरी पाइपलाइनने जोडून विहीरजोड प्रकल्प
  • ऊस, केळी पिकांचे उत्पादन, वनझाडे, गवताची लागवड
  • विविध वर्तमानपत्रे, मासिकांमधून लेख प्रसिद्ध

12) डॉ. संजय ज्ञानदेव पाटील, मु. पो. तळसंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

  • 210 एकर जमीन खरेदी करून नापीक माळरानावर फळझाडे, ऊसलागवड
  • कृषी तंत्रनिकेतन, मुक्त शिक्षण केंद्र, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापना
  • गरीब रुग्णांसाठी कोल्हापुरात पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल सुरू

13) रामनाथ बापूराव वाकचौरे, मु. पो. वीरगाव, ता. अकोले, जि. नगर

  • द्राक्षशेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर, बागेतील 80 टक्के द्राक्षे निर्यात
  • गावात दुग्धसंस्था स्थापन करून दुग्धव्यवसायाला चालना
  • मत्स्यपालन, पत संस्था, बचत गट स्थापना, बोअरवेलबंदी, दारूबंदी उपक्रमात सहभाग

14) विजय पंडितराव जाधव, मु. पो. सांगवीभुसार, ता. कोपरगाव, जि. नगर

  • कृषी पदवीधर, हॉकी खेळातील राष्ट्रीय खेळाडू, महाराष्ट्र संघाचे नेतृत्व
  • शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन हे व्यवसाय
  • कमी खर्चात अधिक उत्पादनावर भर, पशुपालनात अनेक पुरस्कार

15) सबाजीराव महादू गायकवाड, मु. वाळुंज, पो. बाबुर्डी घुमट, ता. जि. नगर

  • पडीक, कोरडवाहू जमिनीवर विविध पिकांचे उत्पादकतावाढ प्रयोग
  • सिंचनाची नवी पद्धत विकसित, मिठाच्या द्रावणाचा कीटकनाशक, तणनाशक म्हणून वापराचा प्रयोग
  • इस्राईल व इतर अभ्यासदौरे, शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन, शेतकरी मेळावे.

16) परमेश्‍वर दगडू राऊत, मु. पो. पेनूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर

  • आधुनिक तंत्राने डाळिंबाचे विक्रमी उत्पादन, व्यसनमुक्ती, बेरोजगारांसाठी कार्य
  • केळीसाठी न्युट्रिशन गार्डन संकल्पना, एकरी 40 टन विक्रमी उत्पादन
  • शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन, सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन, पूरक दुग्धव्यवसाय

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न 2013

1) प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड एज्युकेशन इन नॅचरल अँड सोशल सायन्सेस (पायरेन्स) लोणी, ता. राहाता, जि. नगर

  • संस्थेची 1983 मध्ये स्थापना, 24 हेक्‍टर जमीन
  • रेनवॉटर हार्वेस्टिंग, 2 शेततळी, कृषीविषयक प्रशिक्षण कार्यक्रम
  • 561 स्वयंसहायता बचत गट, 153 फार्मर्स क्‍लब व 217 पीकनिहाय गट स्थापना
  • बाभळेश्‍वर येथे कृषी विज्ञान केंद्राची स्थापना, त्यामार्फत उल्लेखनीय कार्य.

2) अनिल घमाजी मेहेर, मु. वारुळवाडी, पो. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे

  • कृषी पदवीधर शेतकरी, द्राक्षाचे सीडलेस सिलेक्‍शन 1, 2 व मोनिका हे तीन वाण विकसित केले.
  • सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेडनेट व पॉलिहाऊसमध्ये विक्रमी उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन.
  • विघ्नहर द्राक्ष उत्पादक सहकारी संस्था, कृषी विद्यालय व कृषी विज्ञान केंद्राची स्थापना
  • -अनेक देशांचे अभ्यासदौरे, कृषीतील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित

वसंतराव नाईक शेतीमित्र 2013

1) अमोल जयवंत जाधव, मु. गोंदी, पो. शेरे, ता. कराड, जि. सातारा

सकाळ-ऍग्रोवनमध्ये वार्ताहर म्हणून कार्यरत, विपुल लेखन
2) ज्ञानेश्‍वर श्रीरंग रायते, मु. पो. भवानीपूर, ता. इंदापूर, जि. पुणे
दै. सकाळ, ऍग्रोवनमध्ये कृषी विषयक विपुल लेखन
कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्राच्या योजना, अभियानांबाबत लेखन
3) सयाजीराव गोपाळराव पोखरकर, मु. पो. कोतुळ, ता. अकोले, जि. नगर
दै. सकाळ, ऍग्रोवन इ. वृत्तपत्रातून शेतीविषयक लेखन प्रसिद्ध
इस्राईल व जॉर्डन देशांचा कृषी विषयक अभ्यासदौरा
4) बाळकृष्ण पौलाद पाटील, मु. पो. गणपूर, ता. चोपडा, जि. जळगाव
गेल्या पाच वर्षांपासून ऊस विस्तारक म्हणून कार्यरत, शेती व दुग्ध व्यवसाय.
दै. सकाळमध्ये बातमीदार म्हणून कार्य, या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसार
5) हेमंत अंकुश सावंत, मु. पो. हुंबरट, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग
कृषी पदवीधर, काजू लागवड, ऍग्रोवनचे नियमित वाचक
वृत्तपत्रांमधून शेतीविषयक लेखन, व्हॅनिला मार्गदर्शिका प्रसिद्ध
6) अशोक दगडू तुपे, मु. पो. कान्हेगाव, ता. श्रीरामपूर, जि. नगर
लोकसत्ता दैनिकाचे वार्ताहर व सार्वमत दैनिकाचे उपसंपादक म्हणून कार्यरत
वृत्तपत्रातून शेती, सहकार, जलसंधारणावर विशेष लिखाण
7) चेतन मुकुंदराव भैरम, न्यू गुजराती कॉलनी, भंडारा
दै. देशोन्नतीमधून शेती विषयक लेखन प्रसिद्ध

कृषिभूषण (सेंद्रिय शेती) 2013

1) शिवदास दाजी कोरे, मु. पो. किरमिटी मेंढा, ता. नागभीड, जि. चंद्रपूर

  • 1.76 हेक्‍टर शेतजमीन, सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादन
  • आकाशवाणी, विविध संघटना, कार्यक्रमांतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
  • बांधावर विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड

2) केदार मारोतराव जाधव, मु. निरखेडा, पो. मौजपुरी, ता. जि. जालना

  • 1.21 पैकी एक हेक्‍टर क्षेत्र सेंद्रिय प्रमाणीकरण
  • ठिबक, तुषार सिंचन, जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर, शेतीशाळा
  • शतकोटी वृक्षलागवडीसाठी एक लाख रोपे तयार करून मोफत वाटप

3) डॉ. प्रताप बाजीराव पाटील, मु. पो. ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, जि. सांगली

  • संपूर्ण क्षेत्र सेंद्रिय प्रमाणीकरण, सेंद्रिय शेती गट, शेतकऱ्यांना प्रशिक्षण
  • सेंद्रिय गूळ, गूळ पावडर, औषधी वनस्पती, सोयाबीन, मोहरी आदींची स्थानिक व परदेशी बाजारपेठेत विक्री
  • नाबार्डमार्फत शेतकरी मंडळाची स्थापना

4) सौ. शैलजा पोपटलाल नावंदर, मु. उंबरीबाळापूर, पो. आश्‍वीबुद्रुक, ता. संगमनेर, जि. नगर

  • कृषी विज्ञान केंद्राच्या कम्युनिटी रेडिओ समितीच्या संचालिका म्हणून कार्यरत.
  • शेतातील कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती, जैविक कीड, बुरशीनाशकांचा वापर
  • महिला बचत गट स्थापना व सेंद्रिय शेती प्रसाराचे कार्य

5) नामदेव मारुती साबळे, मु. भालेवाडी, पो. करंजे, ता. करमाळा, जि. सोलापूर

  • जिवामृत, गांडूळ खतनिर्मिती व वापर, कीडनियंत्रणासाठी निंबोळी, दशपर्णी अर्क वापर
  • सेंद्रिय ऊस व गूळ उत्पादन, बांधावर पशुखाद्यासाठी विविध झाडांची लागवड
  • बंदिस्त शेळीपालन, खिलार गायी, म्हैसपालन, परसातील कोंबडीपालन व्यवसाय
6) सदाशिव वामनराव शेळके, मु. मानोरी बु., पो. देशमाने, ता. येवला, जि. नाशिक
  • टोमॅटो, कांदा, लसूण, पपई, ज्वारी कापूस आदी पिकांचे उत्पादन
  • शेततळे, विहीर पुर्नभरण, जैविक खतांचा वापर, बीजप्रक्रिया
  • सेंद्रिय शेतीच्या प्रचारासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

7) भीमराव बारकू बोरसे, मु. पो. आमळी, ता. साक्री, जि. धुळे

  • 2.25 हेक्‍टर सेंद्रिय शेती, सेंद्रिय निविष्ठांचा वापर
  • जैविक कीडनाशकांचा वापर
  • कन्हैयालाल कृषक मंडळाची स्थापना, भात व नागली विक्री

8) आनंद विष्णू गायकवाड, मु. दहागाव, पो. वाहोली, ता. कल्याण, जि. ठाणे

  • नाळ, चिकू, आंबा, पेरू, पपनस, तेजपत्ता इ. फळपिके, भाजीपाला पिकांचे उत्पादन
  • बायोडायनॅमिक कंपोस्ट, गाईचे मलमूत्र, वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर
  • कृषी पर्यटन, कृषी सल्लागार, सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे काम

कृषिभूषण (सेंद्रिय शेती संस्था) 2013
1) श्री छत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठान, नवीन बी.जे. मार्केट, जळगाव.

  • अध्यक्ष ः सोन्याबापू मुरलीधर धनाड, कृषी विभागाच्या शेतीशाळा, प्रदर्शने इ. सहभाग
  • गेल्या 12 वर्षांपासून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी जनजागृती व प्रबोधन
  • परधाडे गाव दत्तक घेऊन 3000 ट्रॅक्‍टर गाळ काढून पाणीसाठा वाढवला
  • जिल्ह्यात शेतकरी व महिला बचत गटांची स्थापना, सेंद्रिय शेतमाल विक्री साखळी तयार केली.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate