Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/06/07 04:50:39.979804 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / मराठवाड्यातील तरुणांसाठी कौशल्य वृद्धी कार्यक्रम
शेअर करा

T3 2020/06/07 04:50:39.984721 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/06/07 04:50:40.015473 GMT+0530

मराठवाड्यातील तरुणांसाठी कौशल्य वृद्धी कार्यक्रम

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी क्षेत्रातील शेती व शेतीपूरक असणाऱ्या उद्योग धंद्यासंदर्भातील कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

मागील काही वर्षामध्ये कृषि क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञानामुळे आमुलाग्र बदल झाले आहेत. परिणामी कृषि क्षेत्रामध्ये बदलत्या तंत्रज्ञानानुरुप शेती व शेतीपुरक व्यवसाय, उद्योग यामध्ये कुशल मनुष्य बळाची मागणी वाढू लागली आहे. बदलणाऱ्या या तंत्रज्ञानाचा वापर आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीपूरक उद्योग करुन अर्थार्जनाचे विविध पर्याय उपलब्ध करण्याच्यादृष्टिने शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या मुलांसाठी कृषिक्षेत्रात कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे व त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी क्षेत्रातील शेती व शेतीपूरक असणाऱ्या उद्योग धंद्यासंदर्भातील कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याविषयी माहिती देणारा हा लेख...राज्यातील मराठवाडा विभागाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास 85 टक्के क्षेत्र हे लागवडीखालील क्षेत्र आहे. या लागवडीखालील क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्र हे आवर्षण व प्रवरण क्षेत्र असल्याने या भागातील शेतकरी हा कायमचा कोरडवाहू शेतीवर अवलंबून असतो. येथील शेतकऱ्यांना टंचाई, दुष्काळ, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. लोकसंख्येचा विचार केल्यास औरंगाबाद विभागातील ग्रामीण लोकसंख्या, विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या 72.88 टक्के इतकी आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश लोक शेतीवरच अवलंबून आहेत. मराठवाड्यातील शेतीचा विचार करता कोरडवाहू शेतीमुळे येथील शेतकऱ्यांना वर्षभर रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी अल्प उत्पन्नामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होवून त्यांच्या जीवनमानाचा स्तर खालावला आहे.राज्यात युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने 2 सप्टेंबर 2015 रोजी "प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान" राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था यांना राज्य पातळीवर "नोडल संस्था" म्हणून नियुक्त केले आहे. या निर्णयातील तरतुदीनुसार मराठवाडा विभागातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबासाठी कृषि क्षेत्रातील शेती व शेतीस पूरक उद्योगधंद्याशी संबंधित कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेमार्फत तयार करण्यात आलेले अभ्यासक्रम तसेच शेती व शेती पूरक उद्योगधंद्याशी संबंधित पुढीलप्रमाणे कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी सर्वसाधारणपणे आठ हजार शेतकरी किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी कौशल्यवृद्धीचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कृषी यांत्रिकीकरणाचे कौशल्य विकासाद्वारे प्रशिक्षण

मराठवाड्यात शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन देण्यासाठी व आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी उपयोगी असणाऱ्या शेती यंत्रणाची दुरुस्ती व निगा राखण्याबाबत येथील तरुणांना प्रशिक्षण देऊन कौशल्य बळ निर्माण करण्यात येणार आहे.

कृषी उत्पादन विक्रीसाठी "मोबाईल ॲप" विकसीत करणे

साधारणपणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्तभाव व बाजारपेठ मिळणे अत्यंत आवश्यक असते. ही बाब विचारात घेता शेतमालाला अधिकाधिक भाव कोणत्या बाजारपेठेत मिळू शकेल किंवा विविध बाजारपेठेमधील शेतमालाचा भाव किती आहे, आदीसारख्या गोष्टी शेतकऱ्यांना मोबाईलवर एक चांगले मोबाईल ॲप विकसीत केल्यास त्यांना नक्की फायदा होईल. यासाठी कौशल्य विकासाद्वारे तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मृदा संवर्धन व मृदा तपासणी

शेतीचे उत्पादन मुख्यत: शेत जमिनीतील मृदेवर अवलंबून असते. अधिक शेती उत्पादनासाठी मृदेचा कस व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील, यादृष्टीने या भागातील तरुण व महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून मृदा संवर्धन निर्माण करण्यात येणार आहे.

शेतीस पूरक जोड व्यवसायांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रोत्साहन

कौशल्य विकासाचा वापर करुन या भागात समृद्धी आणण्यासाठी शेतीला पूरक असे व्यवसाय जसे फुलांची शेती, रेशीम उत्पादन आणि प्रक्रिया, मधुमक्षिका पालन, डेअरी पदार्थाची निर्मिती व विक्री, कुक्कट पालन व शेळीपालन असे जोड व्यवसाय सुरु करण्याचे प्रशिक्षण कौशल्य विकासाच्या माध्यमातून देता येईल. यासाठी तरुणांना व महिलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्यामार्फत बीज भांडवल योजनेतून कर्ज देऊन लहान-लहान उद्योग उभे करता येणार आहेत.

शेत मालावर प्रक्रिया व पॅकेजिंगसाठी कौशल्य विकास विकसीत करणे

बहुतांश वेळा उत्पादित केलेला शेतमाल हा जास्त काळ टिकवून ठेवता येत नाही. त्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण आणि महिलांना कोल्ड स्टोरेज टेक्निशियन व ग्रीन हाऊस टेक्निशियचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच उत्पादित केलेला शेतमाल हा अधिकाधिक आकर्षित पद्धतीने पॅकेजिंग करुन तो बाजारपेठेत कसा उपलब्ध करुन देता येईल, याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. उसापासून साखर अथवा गुळ तयार करताना उसाच्या टाकावू भागापासून तसेच कापसापासून सूत बनविण्याच्या प्रक्रियेदरम्यान गोवऱ्या बनविण्याचे प्रशिक्षण शेतकरी कुटुंबियांना देऊन स्वस्त इंधनाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याशिवाय बेरोजगारांनाही रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.

कृषी विद्यापिठांशी करार

राज्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे कृषी विद्यापीठ काम करीत असून त्यांच्यासोबत करार (एम.ओ.यु.) करुन त्या विद्यापीठामध्ये मराठवाड्याचे तरुण युवक व महिला शेती व शेतीस पूरक असणाऱ्या उद्योगधंद्याच्या अनुषंगाने कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी कृषी विद्यापिठामध्ये कौशल्य विकास केंद्र उपलब्ध करण्यात येणार आहे.

"व्हॅल्यू चेन" उभी करणे

मराठवाड्याच्या काही भागामध्ये कापूस आणि रेशीमचे काम परंपरागत पद्धतीने मोठ्या प्रमाणावर केले जाते. विशेषत: पैठणी साडी जी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. अशा व्यवसायाचे कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिला व तरुणींना नवीन डिझाईन व टेक्नोलॉजीचे प्रशिक्षण देऊन परंपरागत व्यवसायामधून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियमित "जॉब फेअर" आयोजित करणे

मराठवाड्यात हळू-हळू उद्योगाचा विकास होत असून याविषयाच्या संदर्भाने औरंगाबाद येथे औद्योगिक संस्था यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांच्या सहकार्याने मराठवाड्यामध्ये स्मॉल स्कील उद्योगामध्ये तरुणांना रोजगार मिळण्यासाठी उद्योग संस्थांसोबत करार (एम.ओ.यु.) करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरुन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.


मराठवाड्यामध्ये महिला आणि मुलींना "स्कील सखी"च्या माध्यमातून प्रशिक्षण

"स्कील सखी"चा प्रयोग कौशल्य विभागाने यु.एन.डी.पी. यांच्या सहकार्याने नागपूरमध्ये केला असून तेथे जवळपास 500 स्कील सखी या नव्याने तरुण मुलींना प्रशिक्षण देऊन ही स्कील सखी त्या गावाच्या महिला व युवतीला त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये कौशल्य प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देतात. हा प्रयोग मराठवाड्यामध्ये केल्यास येथे सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्कील सखी या नव्याने तरुण महिला व मुलींना प्रशिक्षण देऊन प्रत्येक गावामध्ये स्कील सखी पाठवून महिलांना शेती किंवा शेतीपूरक असणाऱ्या उद्योग धंद्याच्या अनुषंगाने कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

लेखक- काशिनाथ र. आरेवार
स्त्रोत - महान्युज

 

3.03614457831
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/06/07 04:50:40.564860 GMT+0530

T24 2020/06/07 04:50:40.571455 GMT+0530
Back to top

T12020/06/07 04:50:39.838827 GMT+0530

T612020/06/07 04:50:39.856392 GMT+0530

T622020/06/07 04:50:39.962970 GMT+0530

T632020/06/07 04:50:39.963896 GMT+0530