অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुरे व महिष विकास प्रकल्प

राष्ट्रीय गुरे व महिष पैदास प्रकल्प लघु योजना


(२००७-०८ ते २०१२-१३)

राष्ट्रीय गुरे व महिष पैदास प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत खालील महत्वाच्या योजना राबविण्याचा संकल्प आहे.

१. राज्यातील पशुपेदास प्रक्षेत्रांना पायाभूत सुविधा पुरवून त्यांचे बळकटीकरण करणे व त्याद्वारे उच्च अनुवंशिकतेच्या वळूंची निर्मिती करणे.

२. गोठीत रेतमात्रांची निर्मिती जतन व पुरवठा करणे या योजने अंतर्गत गोठीत रेत प्रयोगशाळा पुणे, नागपूर व औरंगाबाद चे आधुनिकीकरण करणे.

३. द्गवनत्र साठवणूक व पुरवठा यंत्रणेचे बळकटिकरण करणे या अंतर्गत स्टोरेज टँक/मोबाईल टॅंकर्स खरेदी व कार्यान्वित करणे.

४. माहीती व तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (मॅनेजमेंट, इन्फरमेशन सिस्टिम) विकसीत करणे, ज्याद्वारे शेतकरी / पशुपालकांना पशुपैदास व पशुसंगोपना बाबत अद्यावत माहितीतात्काळ उपलब्ध होईल.

५. तांत्रिक बेरोजगार पशुवैद्यकामार्फत कृत्रिम रेतनांच्या सुविधा पुरविणे व पशुपैदास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे.

६. कृत्रिम रेतन सुविधा शेतकज्यांच्या दारापर्यंत उपलब्ध होण्यासाठी कृत्रिम रेतन केंद्गांना दुचाकी वाहने पुरविणे.

७. कृत्रिम रेतनाचे कार्य करणाज्या अधिकारी / कर्मचारी यांना अद्यावत शास्त्रोक्तपद्धतीने प्रशिक्षण देणे ज्याद्वारे अद्यावत व प्रगत कृत्रिम रेतन तंत्रज्ञानांचा वापर करून गायी म्हशीमधील गर्भधारणेचे प्रमाण वाढविणे.

८. स्वयंसेवी संस्थांना पशुपैदास / गोठीत रेतमात्रांची निर्मिती / प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी अर्थसहाय्य देणे.

९. भारतीय कृषि औद्योगिक प्रतिष्ठाण, पुणे, गोशाळा, पांजरपोळ इत्यादी संस्थाना त्यांचे कडील गोठीत रेत प्रयोगशाळा / प्रशिक्षक सुविधांचे बळकटीकरण, पशुधन खरेदी इत्यादी योजना करीता निधी उपलब्ध करून देणे.

१०. सहकारी दुध संस्थांना अर्थसहाय्य देवून पशुपैदास सुविधा शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी मध्ये वाढ करणे

लघु योजना (Micro Plan)

राष्ट्रीय गुरे व महिष विकास प्रकल्प. भारत सरकार शासन निर्णय क्रमांक ३-२२/२००३ एएचटी (एनपीसीबीबी) कृषि मंत्रालय, कृषि भवन, नविदिल्ली दिनांक १०.६.२००४ अन्वये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला यांना लघुयोजनेच्या अंमलबजावणी साठी रू १७.२० कोटीचे प्रकल्पास मान्यता दिली होती. 
फेज-१: त यापैकी रू १३.६० कोटीचा प्रथम हप्ज्ञा फेज-१ अंत र्गत मंडळास दि.२४.१०.२००३ व ५-३-२००६ रोजी प्राप्त झाला होता . केंद्र शासनाच्या मंजुर योजनेनुसार रु. १३.६० कोटी खर्च 
झालेले आहेत . 
फेज- २: लघुयोजना फेज-२ अंतर्गत सन २००८-०९ मध्ये रु.२.५० कोटी केंद्र शासनाच्या मंजुर बाबी नुसार खर्च झालेला आहे. त्याच प्रमाणे सन २००९-१० मध्ये प्राप्त रु. १६१.४० लक्ष्य केंद्र शासनाची तरतूद प्राप्त झाली. माहे ऑक्टोबर २००९ अखेर मंजुर योजनेनुसार खर्च करण्यात आले.

उद्देश

१) ८० टक्के पैदासक्षम गाई म्हशींधा संघटीत पैदास कृति आराखडयामध्ये समाविष्ट करणे.

२) ग्रामिण भागात स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे.

३) शुध्द जातीवंत देशी गाइ म्हशी व संकरीत पशुधधाच्या उत्पादध क्षमतेत वाढ करणे.

आर्थिक

१) मंडळास स्वयंपुर्ण करणे.

२) राष्ट्रीय गुरे व महिष विकास प्रकल्प अंतर्गत उपलब्ध तरतूद .

३) मंडळाच्या महसुली जमेत वाढ करणे.

४) राज्य शासधाचे आर्थिक सहाय्य.

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate