Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/06/07 11:13:31.518726 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
शेअर करा

T3 2020/06/07 11:13:31.523847 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/06/07 11:13:31.549558 GMT+0530

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2017-18 विविध योजना.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2017-18 विविध योजना अनुदान लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

या अभियानांतर्गत सामुहिक शेततळे/हरितगृह/शेडनेट हाऊस, हरितगृहातील उच्च दर्जाचे लागवड साहित्य, फलोत्पादन यांत्रिकीकरण व पुष्पोत्पादन इ. बाबींचा लाभ देण्यात येणार आहे. या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने हॉर्टनेट www.hortnet.gov.in या संगणक प्रणालीवर आपला अर्ज भरुन योजनेचा लाभ घ्यावा.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील लाभासाठी लाभार्थी पात्रता

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील विविध लाभासाठीची लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे आहे.

सामुहिक शेततळे

दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाभार्थी आवश्यक, आकारमानानुसार फलोत्पादन क्षेत्र 0.5 हेक्टर. ते 10.00 हेक्टर त्यापैकी 50 टक्के फळबाग आवश्यक राहील.

हरितगृह /शेडनेट हाऊस, पॉलीहाऊसमधील उच्च दर्जाच्या भाजीपाला/ फुलपिके लागवड साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान

स्वत: च्या मालकीची जमीन किंवा दीर्घ मुदतीचा (किमान 10 वर्षे) दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत भाडेपट्टा करार

रायपनिंग चेंबर

वैयक्तिक लाभार्थी, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी महिला गट, नोंदणीकृत कंपनी.

फलोत्पादन यांत्रिकीकरण

वैयक्तिक लाभार्थी, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी महिला गट, नोंदणीकृत कंपनी, फळबागेचे क्षेत्र आवश्यक आहे.

इच्छुकांनी वरील प्रत्येक बाबीकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज करावा. भरलेल्या अर्जाची मूळ प्रत, 7/12, 8- अ व आवश्यक कागदपत्रांच्या प्रतीसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावेत. ज्यांना ऑनलाईन अर्ज करण्याबाबत आवश्यक माहिती नसेल त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत करण्यात येईल.

ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या अर्जातुन अध्यक्ष, जिल्हा अभियान समिती तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लक्षांकानुसार लॉटरी पद्धतीने लाभार्थींची निवड करण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम मुदत

दिनांक 08 ऑगस्ट 2017.

अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी संकेतस्थळ

www.hortnet.gov.in

योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

लेखक: दत्तात्रय कोकरे

माहिती स्रोत: महान्युज

3.03571428571
डुडीश्वर कळंगुजी लांजेवार Apr 02, 2019 12:36 PM

गुलाब फुलाची शेती करायची आहे

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/06/07 11:13:31.970600 GMT+0530

T24 2020/06/07 11:13:31.976950 GMT+0530
Back to top

T12020/06/07 11:13:31.377377 GMT+0530

T612020/06/07 11:13:31.396010 GMT+0530

T622020/06/07 11:13:31.507321 GMT+0530

T632020/06/07 11:13:31.508305 GMT+0530