Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/07/07 13:42:44.135565 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / रेशीम शेती - विविध योजना
शेअर करा

T3 2020/07/07 13:42:44.140284 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/07/07 13:42:44.164050 GMT+0530

रेशीम शेती - विविध योजना

राज्यातील रेशीम शेती उद्योगासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात.

राज्यातील रेशीम शेती उद्योगासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये रेशीम शेती प्रशिक्षण, अभ्यास दौरा, निरोगी अंडीपुंजांचा पुरवठा यासारख्या सुविधा मिळतात. याचबरोबरीने राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत काही योजना राबविल्या जातात.
संजय फुले

अ) जिल्हास्तरीय योजना

डीपीडीसीअंतर्गत रेशीम लाभार्थ्यास खालील बाबींवर अनुदान उपलब्ध करून दिले जाते-
1) शेतकऱ्यांना पंधरा दिवसांचे रेशीम शेती प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येते. प्रशिक्षण कालावधीत 750 रुपये विद्यावेतन दिले जाते.
2) राज्यातील प्रगतशील रेशीम शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. याशिवाय कर्नाटकसारख्या प्रगतशील राज्यात शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. सदरचा संपूर्ण खर्च डीपीडीसीअंतर्गत केला जातो.
3) रेशीम लाभार्थ्यास निरोगी अंडीपुंजांचा पुरवठा 75 टक्के सवलतीच्या दरात केला जातो.

ब) राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय)

या योजनेअंतर्गत अर्धा एकर ते पाच एकरपर्यंत तुती लागवड करणाऱ्या लाभार्थ्यास प्रति एकरी वीस हजार रुपये अनुदान देण्यात येते. यापैकी पहिल्या वर्षी सहा हजार रोजमजुरी आणि आठ हजार रुपये साहित्य स्वरूपात अनुदान देण्यात येते. दुसऱ्या वर्षी मजुरीपोटी तीन हजार रुपये व तिसऱ्या वर्षी मजुरीपोटी तीन हजार रुपये अनुदान देण्यात येते.

क) कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)

1) याअंतर्गत जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्यांसाठी शेती शाळा, रेशीम चर्चासत्र, रेशीम प्रशिक्षण इत्यादीकरिता लागणारा निधी उपलब्ध होतो.
2) गावात रेशीम गट तयार केल्यास आत्माअंतर्गत विविध सोईसुविधा उपलब्ध आहेत. उदा.- गटासाठी कमी किमतीची यंत्रे/ अवजारे उपलब्ध करून देणे, शैक्षणिक सहलींचे आयोजन करणे, इ. परंतु या लाभासाठी गटांनी आत्माअंतर्गत गटांची नोंदणी करणे बंधनकारक आहे.

ड) केंद्रपुरस्कृत योजना

1) तुती लागवडीपासून रेशीम कापडनिर्मितीपर्यंतच्या विविध टप्प्यांवर या योजनांचा लाभ दिला जातो.
2) यामध्ये केंद्र शासन व राज्य शासन या दोन्हींचा निधी उपलब्ध करून दिला जातो.
संपर्क - संजय फुले - 9823048440
(लेखक जिल्हा रेशीम कार्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत,)

स्त्रोत - अग्रोवन

3.0859375
किशोर दत्ताराम बोरसुतकर Jun 24, 2020 08:19 PM

सर मला रेशीम शेती बद्दल माहिती हवी आहे .
मो.नं.94*****43 ता.संगमेश्वर,जि.रत्नागिरी.

AKASH DONGARE May 25, 2020 01:51 PM

मला रेशीम शेती करायची आहे . तरी मला या बद्दल पूर्ण पने माहिती नसल्याने तरी या बद्दल माहिती देण्यात यावी.
व सरकार कडून किती अनुदान किती मिळू शकते , व रेशीम धागा कसा निर्माण कराव त्या बद्दल माहिती मला देण्यात यावी
संपर्क : ९७३०५१८८५९ / ९९२२१६२९९७

महेश जोगपेटे जि. नांदेड May 19, 2020 06:07 PM

सर मला रेशीम शेति करायचि आहे ह्या पूर्ण योजनेचा लाभ मिळेल का व रेशम।शेति कशि करायची माहिती द्या मो ८३०८२७७६०४

Govind nile Di -: parbhani Apr 08, 2020 08:17 PM

रेशीम शेती परिशिक्षण केंद्र कोठे आहे.

Deva Dhangar Mar 02, 2020 02:07 PM

Please give me some information about reshim form ..i am interested in reshim forme my no 97*****16

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/07/07 13:42:44.784350 GMT+0530

T24 2020/07/07 13:42:44.790734 GMT+0530
Back to top

T12020/07/07 13:42:44.036780 GMT+0530

T612020/07/07 13:42:44.054001 GMT+0530

T622020/07/07 13:42:44.125472 GMT+0530

T632020/07/07 13:42:44.126298 GMT+0530