Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/04/06 19:28:29.276226 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार
शेअर करा

T3 2020/04/06 19:28:29.280712 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/04/06 19:28:29.305332 GMT+0530

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार

शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्‍या शेतकर्‍यांना बहूमान मिळावा या उद्देशाने दिला जाणारा पुरस्कार

निकष१) प्रस्तावासोबत सर्व कागदपत्रे जसे ७/१२, उतारा,जिल्हा पोलीस, अधिक्षक यांचेकडुन चारित्र्य निर्दोष दाखल्याची मुळप्रत इत्यादी सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अन्यथा प्रस्ताव विचारात घेतला जाणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हास्तरीय समितीची राहील.२) एकापेक्षा जास्तवेळा शेतीनिष्ठ म्हणून शेतक-याची निवड केली जाणार नाही याची खात्री करुन घ्यावी. तसेच सदर शेतकरी एखादया संस्थेकडुन अगर शासनाकडून मानधन किवा निवृत्ती वेतन घेत नाही याची खात्री करुन तसे अभिप्राय दयावेत.

३) दोन्ही गटाचे बाबतीत ५ किवा त्याहून जास्त सालदार ठेवलेल्या शेतक-यांची शिफारस करु नये.

४) प्रत्येक गटास ज्या तीन शेतक-यांचा प्रस्ताव पाठविला जाईल त्या शेतक-यांचे तीन पासपोर्ट साईज तीन छाया चित्रे टाचणी न लावता पाकीटात घालुन छायाचित्राच्या मागे सुवाच्छ अक्षरात नाव, गाव, तालुका, जिल्हा व गटाचा (सर्वसाधारण/अदिवासी)उल्लेख करुन पाठवावेत.

५) प्रस्तावित शेतक-यांचे संपुर्ण नाव पत्ता प्रस्तावामध्ये प्रथम दर्शनी सुवाच्छ अक्षरात लिहावा. प्रस्तावात अचुक/संपुर्ण नाव न लिहले गेल्यास सन्मानपत्र,परिचयपुस्तिका ,ओळखपत्र यामध्ये चुकीचे नाव लिहले जाऊ शकेल. ही बाब कृपया लक्षात घ्यावी.

६) पहिल्या तीन क्रमांकाच्या परिचय लेख (थोडक्यात)स्वतंत्रपणे तयार करुन स्वताः पाठवावेत.त्या शेतक-यांनी केलेली पीकविषयक कामगिरी,जमिन सुधारणा, सुधारीत बियाणे,किटकनाशके यांचा वापर जोडधंदा, कंपोस्ट व रासायनिक खताचा वापर/गोबर गॅस प्लॅन्ट तसेच त्यांनी मागील तीन वर्षा मध्ये काढलेले पिकनिहाय हेक्टरी उत्पादन झालेला फायदा इ. मुद्याचा समावेश असावा.

७) शासनाकडून दिल्या जाणा-या दोन पुरस्कारामधील अंतर किमान ५ वर्षा इतके असावे.

स्त्रोत : जिल्हा परिषद, सातारा

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/04/06 19:28:29.674766 GMT+0530

T24 2020/04/06 19:28:29.680957 GMT+0530
Back to top

T12020/04/06 19:28:29.177896 GMT+0530

T612020/04/06 19:28:29.196495 GMT+0530

T622020/04/06 19:28:29.266177 GMT+0530

T632020/04/06 19:28:29.266995 GMT+0530