অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण

शेळी-मेंढीपालन प्रशिक्षण


राज्यामध्ये शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा प्रमुख ग्रामिण व्यवसाय आहे. शेळया-मेंढयांच्या मांसाचे वाढते भाव, त्यामुळे खात्रीची बाजारपेठ एकापेक्षां अधिक करडे देण्याची क्षमता, इतर रवंथ करण्या-या जनावरांपेक्षा तुलनात्मक दृष्टया लवकर वयांत आणि वजनांस येण्याची क्षमता इ. बाबींमुळे, सुशिक्षीत बेरोजगार युवक, प्रगतशील शेतकरी ह्या व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. शासन, बँका, विविध समाज विकास महामंडळ, विविध शासकीय विभाग दारिद्रय निर्मुलन, स्वयंरोजगार निर्मिती, पैदास- सुधारणा इ. विविध कार्यक्रमांतर्गत कर्ज आणि अर्थ सहाय्य देत असतात. लाभार्थ्याला व्यवसाय सुरु करतांना शास्त्रीय पायावर उभा रहावा तसेच फायदेशीर व्हावा, ह्या करिता विविध वित्तिय संस्था ह्या व्यवसायला कर्ज देतांना “शेळी-मेंढीपालन प्रशिक्षण” प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालतात. ह्या सर्व बाबींचा विचार करुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवर शेळी- मेंढीपालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करयात येते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यांत येते.

प्रशिक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे

शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण अभ्यासक्रम
१.महाराष्ट्रातील शेळी व मेंढी पालन व्यवसाय :- महाराष्ट्रातील शेळया व मेंढयांची संख्या, मांसाचे उत्पादन, महाराष्ट्र राज्यातील वधगृहे, मांसाची निर्यात, लोकर उत्पादन, दुध उत्पादन, मेंढपाळांच्या समस्या.
२. शेळया व मेंढयांच्या जाती :- शेळया मेंढयांच्या विभागनिहाय जाती, गुणवैशिष्टये, महाराष्ट्रातील उस्मानाबादी व संगमने री शेळया तसेच दख्खनी व माडग्याळ मेंढयांची गुणवैशिष्टये.
३. शेळीपालनाच्या पध्दती :- मुक्त व्यवस्थापन, मिश्र व्यवस्थापन, ठाणबंद पध्दतीने शेळी पालन या विषयी विस्तृत माहिती.
४. शेळयांसाठी निवारा :- शेळयांच्या वाडेबांधकामासाठी जागेची निवड करणे, गोठयांचे प्रकार, वाडेबांधकामासाठी दिशा व वायु विजन.
५. शेळयांचा आहार:- शेळयांच्या आहारात अन्न द्रव्याची गरज (प्रथिने , कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, पाणी, क्षार व जीवनसत्वे) शेळयांच्या आहारातील चारा व पशुखाद्य, करडांचा आहार, प्रजननासाठी वापरण्यात येणा-या बोकडांचा आहार, गाभण शेळीचा आहार, मुरघास तयार करण्यांच्या पध्दती व फायदे.
६. शेळया-मेंढयामधील प्रजनन :- शेळया मेंढयामधील प्रजनन पध्दती (बाह्य प्रजनन, अंर्तगत प्रजनन, उत्तरोत्तर प्रगती पध्दती, संकरीत प्रजनन), प्रजननाची मुक्त पध्दत, मर्यादित मुक्त पध्दत, नियंत्रित प्रजनन पध्दत, प्रजनन हंगामातील पुर्व तयारी, पैदासीसाठी शेळयांची व बोकडाची निवड, ऋतुकालावधी, कृत्रीम रेतनाद्वारे शेळी सुधारणा, एकाच वेळी शेळया माजावर आणावयाच्या पध्दती, प्रजनन हंगाम, गाभण शेळयांची काळजी
७. करडे व कोकरांचे संगोपन :- नवजात करडांचे संगोपन, चिकाचे महत्व, अनाथ करडांचे संगोपन, करडांचे दुध तोडणे, करडांमधील मरतुक, वाढत्या करडांचा आहार.
८. शेळया मेंढयांचे आजार :- अजारी शेळयांची लक्षणे, विषाणुमुळे होणारे रोग, जिवांणुमुळे होणारे रोग, बाह्य किटक तसेच परजिवी पासून होणारे आजार.
९. प्रतिबंधक उपाय:- जंतनाशके, किटकनाशके यांचा वापर, लसीकरण, प्रथमोपचार.
१० . शेळया-मेंढयाचा विमा :- विम्याची वयोमर्यादा, विमा हमी रक्कम, विमा दर नुकसान भरपाई, विमादावा पध्दती.
११. शेळया-मेंढयांची वाहतुक व विक्री :- शेळयां-मेंढयांची विक्री किंमत ठरविणे, वाहतुकीमध्ये घ्यावयाची काळजी.
१२. शेळी पालन प्रकल्प अहवाल :- प्रकल्प अहवालासोबत करावयाच्या कागद प्रत्राची पुर्तता, करडांचे उत्पादन, मृत्युचे प्रमाण, लेंडी खताचे उत्पादन, दुध उत्पादन, विमा, शेळयांचे औषधउपचार, अनावर्ती खर्च, आवर्ती खर्च, वार्षिक नफा.
१३. प्रक्षेत्रांवर ठेवावयाच्या नोंदी:- वंशावळ नोंदी, वजन वाढी संबंधी नोंदी, प्रजनन व जनन नोंदी इ.

प्रशिक्षणाचा कालावधी, प्रशिक्षण शुल्क, वेळापत्रक इ. तपशिल खालीलप्रमाणे आहे

अ. क्र.

प्रशिक्षण स्थळ

प्रशिक्षणाचा कालावधी

प्रशिक्षण
वेळापत्रक

प्रशिक्षण शुल्क

संपर्क व्यक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, रांजणी 
ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली

तीन दिवस

दर महि­याचा 
दुसरा सोमवार ते शुक्रवार

रू. २५० /-

प्रक्षेत्र व्यवस्थापक 
(० २३४१-२४४२२२)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, महुद 
ता. सांगोला, जि. सोलापूर

तीन दिवस

दर महि­याच्या 
दि. २६ ते ३० तारखेपर्यंत

रू.२५० /

प्रक्षेत्र व्यवस्थापक 
(० २१८७-२४६८६७)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र,दहिवडी 
ता. माण, जि. सातारा

तीन दिवस

दर महि­याच्या 
दि. २१ ते २५ तारखेपर्यंत

रू. २५० /

प्रक्षेत्र व्यवस्थापक 
(० २१६५-२० ४४८० )

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, पडेगांव
जि.औरंगाबाद

तीन दिवस

दर महि­याच्या 
दि. २६ ते ३० तारखेपर्यंत

रू. ५५० /

प्रक्षेत्र व्यवस्थापक 
(० २४० -२३७० ४४९)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र,तिर्थ र्र्बुं 
ता. तुळजापुर, 
जि. उस्मानाबाद

तीन दिवस

दर महि­याच्या 
दि. २५ ते २९ तारखेपर्यंत

रू. २५० /

प्रक्षेत्र व्यवस्थापक 
(० २४७१-२५९० ६६)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, अंबेजोगाई जि. बीड

तीन दिवस

दर महि­याच्या 
दि. २६ ते ३० तारखेपर्यंत

रू. २५० /

प्रक्षेत्र व्यवस्थापक 
(० २४४६-२४७२३९)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, मुखेड
जि. नांदेड

तीन दिवस

दर महि­याच्या 
दि. २५ ते २९ तारखेपर्यंत

रू. २५० /

प्रक्षेत्र व्यवस्थापक 
(० २४६१-२० २० २२)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र,बिलाखेड ता. चाळीसगाव, जि. जळगाव

तीन दिवस

दर महि­याच्या 
दि. २३ ते २७ तारखेपर्यंत

रू. २५० /

प्रक्षेत्र व्यवस्थापक 
(० २५८९-२२२४५७)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, पोहरा 
ता जि. अमरावती

तीन दिवस

दर महि­याच्या 
दि. २५ ते २९ तारखेपर्यंत

रू. २५० /

प्रक्षेत्र व्यवस्थापक 
(० ७२१-२३८५५२३)

 

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate