অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतकरयांना समृद्ध करणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे त्यात सर्वात महत्वाची व ज्या योजनेचा प्रत्येक गावातील शेतकरी लाभ घेऊ शकतो अशी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होय. या योजनेत अनेक प्रकारचे लाभ शेतकरी घेऊ शकतो.

त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत.


या योजनेत भाग घेण्यासाठी लाभाथ्याँस सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजूर म्हणून  नोंदणीसाठी अर्ज करून जॉब कार्ड प्राप्त करून घ्यावे लागते. त्यानंतर ग्रामपंचायातीकडे अर्ज करून कामाची मागणी करावी लागते. यानंतर ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सदर लाभार्थीस काम मंजूर करते. कामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर लाभार्थी स्वतः व गावातील इतर मजूर काम करून कामे पूर्ण करतात. या योजनेतील मजूरीची रक्रम लाभार्थी व काम करणारे इतर मजूर यांच्या बँक खात्यावर जमा होते. या योजनेत वरीलप्रमाणे अनेक बाबी मंजूर आहेत. शेततळे व फळबाग लागवड हे घटक शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी खूप महत्वाचे आहेत.

या योजनेत शेततळे घेण्यासाठी ९ प्रकार मंजूर आहेत. यात कमीतकमी १ मीटर खोलीचे खोदकाम मजूरामार्फत करणे बंधनकारक असून उर्वरित काम यंत्राने पूर्ण करू शकतो.

शेततळे प्रकारानुसार इतर क्षेत्रात मंजूर मापदंडाची रक्कम (इनलेट व आउटलेटसह)

अ.क्र. शेततळे आकारमान मीटरमध्ये (लांबी * रुंदी *खोली ) कमीतकमी १ मीटर खोलीचे खोदकाम मजुरामार्फत व उर्वरित २ मीटर काम यंत्राने केल्यास रक्कम (रु.) सर्व खोदकाम मजुरांमार्फत केल्यास रक्कम (रु.)
१० *१०*३ १५,०९१ २२०१७
१५*१०*३ २२,४१० ३३६९५
१५*१५*३ ३५,०२१ ५८८०८
२०*१५*३ ४७,३९८ ८२२०९
२०*२०*३ ६५,७९८ ११५६५५
२५*२०*३ ८३,७६२ १४८८३९
२५*२५*३ १,०६,१७२ १९१३५२
३०*२५*३ १,२८,६०४ २३३८६४
३०*३०*३ १,५६,०२९ २८७०१६

जनजाती उपयोजना व डोंगराळ क्षेत्र अधिसूचित क्षेत्रात या मंजूर मापदंडात वाढ होते. फळबाग लागवडीसाठी आंबा, काजू, चिकू, पेरू,डाळिंब ,संत्रा ,मोसंबी ,लिंबू ,नारळ,बोर,सीताफळ ,आवळा ,चिंच , कवठ ,जांभूळ ,कोकम , फणस ,अंजीर , सुपारी इत्यादींसाठी लागवड मंजूर आहे. यापैकी सघन लागवडीसाठी शासनाने मंजुरी आहे. यापैकी सघन लागवडीसाठी शासनाने मंजुरी दिलि आहे

काही निवडक घन पध्दतीच्या फळबाग लागवडीसाठी मंजूर मापदंड

अ.क्र.फळबाग प्रती हेक्टर मंजूर मापदंड (रु.)
आंबा कलमे १,१८,१४६

 

डाळिंब कलमे २,१७,१२४
संत्रा कलमे १,६३,३४९
आवळा कलमे १,०१,५४२
बोर रोपे ९९,९२२

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी स्वतःच्या जमिनीचा विकास, पाण्याची उपलब्धता, सेंद्रिय पुनर्भरणाव्दारे जमिनीचा पोत सुधारणे अशा अनेक बाबींच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे स्वप्न साकार करू शकतो. या व इतर योजनेच्या माहितीसाठी व योजनेत सहभागी होण्यासाठी कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी/उपविभागीय कृषि अधिकारी/ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 8/3/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate