फळपिके
काजू- समाविष्ट धोके-अवेळी पाऊस,कमी तापमान विमा संरक्षण कालावधी-1 डिसेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 तसेच गारपीटसाठी- 1 जानेवारी 2017 ते 30 एप्रिल 2017 आहे.
आंबा :- अवेळी पाऊस- 1 जानेवारी 2017 ते 15 एप्रिल 2017, कमी तापमान, 1 डिसेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 अवेळी पाऊस- 16 एप्रिल 2017 ते 15 मे 2017 जास्त तापमान- 15 मार्च 2017 ते 31 मे 2017 गारपीट -1 जानेवारी 2017 ते 30 एप्रिल 2017 असा आहे.
विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान- या योजनेअंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे. तथापि शेतकऱ्यांनी फळपीकनिहाय प्रति हे विमा दर पुढीलप्रमाणे आहेत.
1) बहार- आंबिया पिके-आंबा, काजू, शेतकऱ्यांनी भरावयाचा जास्तीत जास्त विमा हप्ता- विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के.
विमा कंपनीकडून पीक निहाय प्रति हेक्टर प्राप्त वास्तवदर्शी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता यामधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजण्यात येईल. हे अनुदान केंद्र व राज्य शासनामार्फत समप्रमाणात दिले जाईल.
योजना अंमलबजावणी वेळापत्रक
- कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आणि बँकांनी कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांचे घोषणापत्र (Declaration) संबंधित विमा कंपनीकडे सादर करणे याबाबत आंबिया बहराचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
1.) बँकेकडून अधिसूचित फळपिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकऱ्यांचा फळपिकांचा विमा प्रस्ताव (प्रपोजल) बँकांना सादर करणेची मुदत-फळपीक- काजू,आंबासाठी 30 नोव्हेंबर 31 डिसेंबर. बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांची घोषणापत्र (डिक्लेरेशन) संबंधित विमा कंपनीस सादर करण्याची मुदत- फळपीक- काजू-20 डिसेंबर 2016. आंबा पिकासाठी 19 जानेवारी 2017 बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव (प्रपोजल) बँकांना सादर करण्याची मुदत.
फळपीकनिहाय विमा संरक्षित रक्कम शेतकऱ्यांनी भरावयाची विमा दर रक्कम. पिकाचे नाव-काजू, आंबा-विमा संरक्षित रक्कम अनुक्रमे- 76,000/- 1,10,000/-शेतकरी हिस्सा- अनुक्रमे-3800/- 5500/- शेतकऱ्यांकरिता विमा दर-(विमासंरक्षित रक्कमेच्या) प्रत्येकी- 5% विम्याची कंपनी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीकडून.
आंबा पीक विमा संरक्षण