অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेंढी व शेळीसाठी पैदास धोरण

मेंढी व शेळीसाठी पैदास धोरण

मेंढी व शेळीसाठी पैदास धोरण

बुधवार, 02 डिसेंबर 2009 05:33 शेवटचा बदल केलेला दिनांक मंगळवार, 18 मार्च 2014 06:38
  • मेंढी व शेळी पैदास धोरण प्रामुख्याने मांस उत्पादन वाढीसाठी आणि लोकरीची स्थानिक मागणी भागविण्यासाठी मेंढ्यांसाठी या सारखा उद्देश आहे लोकरचे उत्पादनसुध्दा वाढविणे.
  • सध्या भारतातील अन्य भागांमध्ये तसेच परदेशांतून आढळणा-या जर्मप्लाझम वापरुन सुरु असलेल्या प्रायोगिक प्रजनन/ पैदास धोरणाचे निष्कर्ष विचारात घेता, उस्मानाबादी आणि संगमनेरी ह्या शेळ्यांच्या जाती आणि मेंढ्यांची डेक्कनी जात ह्यांचे जर्मप्लाझम त्या त्या बिगर वर्णनीकृत जातींच्या आनुवंशिक सुधारणेसाठी ओळखल्या गेले आहेत. शेळ्यांची कन्याल जात आणि मेंढ्यांची मडग्याल जातींचा वापर शेळ्या व मेंढ्यांच्या बिगर वर्णनीकृत जातींच्या आनुवंशिक सुधारणेसाठी त्यांच्या मुळ मुलखामध्ये वापरली जाऊ शकते.
  • मेंढ्या व शेळ्यामध्ये संकरीत प्रजनन या स्टेजला, जास्त उपयोगी नसल्याचे आढळून आले आहे आणि त्यामुळे फक्त संशोधन उद्देश वगळता संकरीत प्रजनन मेंढ्या व शेळ्यामध्ये कटाक्षाने प्रतिबंधित केलेले आहे.
  • मेंढ्या व शेळ्यामधील कमी गर्भावस्था कालावधी व प्रजनन कालावधी लक्षात घेऊन शिवाय कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचे इतर परिणाम लक्षात घेता मेंढ्या व शेळ्या मध्ये आनुवंशिक सुधारणेसाठी नैसर्गिक गर्भाधान धोरण व कार्यपध्दतीच वापरली जाईल.
  • पुण्यश्लोक अहिल्या देवी शेळी व मेंढी विकास महामंडळ, पुणे; प्रक्षेत्रांची निवडलेल्या जातींचे केंद्रीत कळप निर्मितीसाठी आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार असेल. पैदासकार-शेतकरी आणि पैदासकारच्या असोसिएशन पशुधन उत्पादनाच्या कार्यक्रमा अंतर्गत वितरीत करण्यासाठी आणि त्यांच्या योजनांतर्गत योजना अंतर्गत उपयुक्त धोरणाद्वारे विकत घेणे. तो केंद्रीत कळपाचा पुरवठादार म्हणून काम करू शकतो.
  • पुण्यश्लोक अहिल्या देवी शेळी व मेंढी विकास महामंडळ, पुणे; महाराष्ट्र पशु व मत्स्य शास्त्र विद्यापीठ, नागपूर आणि सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक घटकासह मेंढ्या आणि शेळी च्या मुळ जाती संवर्धनास जबाबदार राज्य कृषी विद्यापीठांचे पशु विज्ञान विभाग ह्या नियुक्त संस्था असतील.
  •  

    माहिती संकलन: प्राची तुंगार

    स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

    अंतिम सुधारित : 12/14/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate