অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधार कशासाठी?

आधार कशासाठी?

    आधार कशासाठी?

  • आधार क्रमांक ही सर्वमान्य ओळख असेल. कालांतराने देशभरात आणि सर्व सेवा पुरवठादारांकडून आधार हे मान्यताप्राप्त ओळख म्हणून स्वीकारले जाईल.
  • प्रत्येक रहिवाशाला दिला जाणारा आधार क्रमांक हा विशिष्ट असेल.
  • देशभरातील निबंधक आणि संस्थांना त्यांच्या परिचय-आधारित प्रक्रियांसाठी वापरता येण्याजोगी प्राथमिक माहिती, सर्वमान्य ओळख उपलब्ध करून देण्यासाठी आधार क्रमांक उपयुक्त ठरेल.
  • आधार नोंदणीसाठी युनिक आयडेंटिटी ऑफ इंडिया (UIDAI) विविध निबंधकांसह भागीदारी करेल. अशा निबंधकांमध्ये राज्य सरकारे, राज्यांतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, बँका, टेलेकॉम कंपन्या इ. चा समावेश असेल, हे निबंधक कालांतराने रहिवाशांची आधार नोंदणी करणा-या संस्थाचे भागीदार होतील.
  • सार्वजनिक तसेच खाजगी संस्था आणि रहिवासी यांच्यातील विश्वास वाढवण्याचे काम आधार मुळे साध्य होईल.
  • रहिवाशांनी ‘आधार’साठी नोंदणी केल्यानंतर, सेवा पुरवठादारांना सेवा देण्यापूर्वी “तुमचा ग्राहक जाणून घ्या” अर्थात KYC ही प्रक्रिया वारंवार राबवण्याची आवश्यकता भासणार नाही. ओळख पटवणा-या कागदपत्रांच्या अभावी रहिवाशांना सेवा नाकारावीही लागणार नाही.
  • रहिवाशांना सुध्दा बँकेत खाते उघडताना, पारपत्र मिळवताना, वाहनचालक परवाना मिळवताना अथवा तत्सम कामे करताना प्रत्येक वेळी ओळख पटवणारी कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या त्रासातून मुक्ती मिळेल.
  • आधार क्रमांकाव्दारे स्वतःच्या ओळखीचा स्वच्छ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे समाजातल्या गरीब आणि दुर्बल गटातील नागरिकांना बँकेमार्फत व्यवहार पूर्ण करण्याची तसेच सरकार आणि खाजगी क्षेत्रामार्फत उपलब्ध विविध सेवा प्राप्त करण्याची संधी उपलब्ध होईल.
  • UIDAI च्या मध्यवर्ती तांत्रिक पायाभूत सुविधेमुळे कधीही, कोठेही आणि कसेही अधिकृत ओळख पडताळणीचे कार्य सहजशक्य होईल. यामुळे स्थलांतरीतांनाही आधार क्रमांक उपयुक्त ठरेल.
  • आधारव्दारे ओळख पटवण्याचे काम ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे शक्य आहे. भ्रमणध्वनी अथवा दूरध्वनीमार्फत रहिवाशांना अधिकृतरित्या ओळख पटवण्याची सोय उपलब्ध होईल.
  • शहरी भागातील सुस्थितीतील रहिवाशांप्रमाणे गरीब आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बँक आणि रोख व्यवहार क्षेत्रातील सेवा मिळवण्यासाठी आणि आपली ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांकामुळे मदत मिळेल.
  • आधार साठी नोंदणी करतानाच, समावेशापूर्वी पुरेशा पडताळणीची मागणी केली जाईल.
  • देशात सध्या अशा प्रकारची माहिती असणा-या डाटाबेसमध्ये बनावट आणि खोट्या लाभार्थीचा बुजबुजाट झाला आहे, ही समस्या लक्षात घेत बनावट अथवा खोट्या नोंदी टाळण्यासाठी UIDAI मार्फत नागरिकांची लोकसंख्याशास्त्रीय आणि जैविक नोंदणी प्रस्तावित आहे. त्यामुळे जमा होणारी माहिती सुरूवातीपासूनच स्वच्छ आणि खरी असेल.
  • तुमच्या रहिवाशाला जाणून घ्या’ अर्थात KYR शिर्षकांतर्गत निश्चित केलेली मानके, गरिबांच्या नोंदणीमध्ये अडथळा ठरणार नाहीत.कागदपत्रे नसणा-या रहिवाशांसाठीही ओळख उपलब्ध करून देणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
  • या यंत्रणेच्या माध्यमातून अधिकृत व्यक्ती (परिचयकर्ते) ज्यांच्याकडे आधार आहे, ते आधार नसणा-या रहिवाशांना, तो मिळवून देण्याच्या दृष्टीने मदत करू शकतील.

 

स्त्रोत : आधार महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate