हे प्रमाणपत्र कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीसाठी अथवा आरक्षण असलेल्या शासकीय, निमशासकीय,शासन अनुदानित संस्थेत सेवेतील रिक्त जागेसाठी खुल्या अथवा मागासवर्गीय उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र / उमेदवार उन्नत व प्रगत गटात येत नाही.असे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते.
जर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसेल तर आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. आरक्षणाच्या प्रत्येक अधिनियमात नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र उमेदवाराने द्यावे हि महत्त्वाची बाब आहे. आरक्षणाचा लाभ घेता यावा याकरिता सर्व उमेदवारांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्त करावे. सदर प्रमाणपत्र एका वर्षा करिता ग्राह्य धरण्यात येते. व दर वर्षी ते रिन्यू करावे लागते.
नॉन क्रिमिलेअर प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
1. आई / वडिलांचा मा.तहसीलदार कार्यालयातील मागील तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला.
2. जातीचा दाखला.
3. शाळा सोडल्याचा दाखला.
4. तलाठी रहिवासी दाखला .
5. रेशनकार्ड झेरॉक्स प्रत.
6. रिन्यू करावयाचे असल्यास एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.
मात्र महा ई सेवा केंद्रात ही सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे.
सदरील माहिती इरफान गोल्डन टच , महा ई सेवा केंद्र, मंगलगेट अहमदनगर यांचेकडून घेतली.
संकलन - सुनिल बाप्ते
अंतिम सुधारित : 7/12/2023
परदेशात शेतीमाल निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्रांच...
आदिवासी जमाती प्रमाणपत्र वाटपाचा अभिनव उपक्रम.
डॉक्टरांकडून मिळणा-या वैद्यकीय प्रमाणपत्रांबद्दल क...