परिचय
- बँक प्रतिनिधी किंवा मायक्रो-एटीएम च्या माध्यमातून व्यवहार करण्याची सुविधा आधार प्रणित प्रणालीद्वारे मिळते.
- AEPS चा लाभ घेण्यासाठी आपले आधार कार्ड बँकेच्या खात्याशी सलंग्न असायला हवे
- या प्रणाली मार्फत व्यवहार करताना आपल्याला कोणताही पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही.
प्रणाली मार्फत मिळणाऱ्या सेवा
- खात्यावरील रकमेची चौकशी
- रक्कम काढणे
- रक्कम भरणे
- आधार ते आधार रक्कम ट्रान्सफर करणे
आधार प्रणित प्रणालीमध्ये व्यवहार कसा कराल
- आपल्या नजीकच्या Micro-ATM किंवा बँक प्रतिनिधीला भेट द्या
- आपल्या बँकेचे नाव आणि १२ अंकी आधार कार्ड नंबर सांगा
- जो व्यवहार करायचा तो निवड जसे - खात्यावरील रकमेची चौकशी करणे, रक्कम काढणे, रक्कम भरणे किंवा आधार ते आधार रक्कम ट्रान्सफर करणे
- स्कॅनर वर आपले फिंगर प्रिंट स्कॅन करा
- व्यवहार पूर्ण झाल्यावर आपल्याला व्यवहाराची पावती मिळेल.
कॅशलेस महाराष्ट्राच्या यशोगाथा पाहण्यासाठी महाराष्ट्र डिजिधन जागृतता कार्यक्रमाच्या (अवेअरनेस प्रोग्रॅमच्या) फेसबुक पेजला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र डिजिधन अवेअरनेस प्रोग्रॅम
स्त्रोत- http://www.digidhan.info/#
अंतिम सुधारित : 7/26/2023
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.