*99# सेवा : यूएसएसडी (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्विस डेटा)
भारतीय राष्ट्रीय भुगतान महामंडळाने (National Payments Corporation of India - NPCI) सुरू केलेल्या नावीन्यपूर्ण भुगतान योजनांमध्ये *99# सेवा महत्त्वाची आहे. ही सेवा यूएसएसडी तत्वानुसार चालते. (Unstructured Supplementary Service Data - USSD) मोबाइल बँकिंगची मोठ्या प्रमाणात असलेली उपयुक्तता ध्यानात घेऊन, छोट्या रकमांची देयके तिथल्या तिथे चुकती करता यावीत म्हणून विशेषत्वाने ही सेवा लागू करण्यात आली आहे. बँकिंगचा वापर न करणाऱ्या समाजघटकांचे पैशांचे व्यवहार अधिक सखोल करत त्यांना मुख्य प्रवाहातील बँकिंगमध्ये आणण्यात ती सहाय्यभूत ठरते. भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजनेचा भाग म्हणून २८ ऑगस्ट २०१४ रोजी *99# सेवा देशाला अर्पत केली.
देशभरातील प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी *99# सेवा सुरू करण्यात आली आहे. मोबाईलवर *99# हे आकडे डायल करून बँकखातेधारक या सेवेच्या माध्यमातून संबंधित कामे करू शकतात. टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्या *99# नंबरवर ही सेवा देतात. हा नंबर डायल केल्यावर आपल्या मोबाइलवर संबंधित व्यवहारांची यादी दिसते, त्यातून हव्या त्या बँकिंग व्यवहाराची निवड उपभोक्त्याने करावी. *99# द्वारे प्रामुख्याने बँकेअंतर्गत खात्यांमध्ये परस्पर निधी स्थानांतर, खात्यावरील शिल्लक तपासणे, अलिकडच्या मोजक्या व्यवहारांचा तपशील मिळवणे (मिनी स्टेटमेंट) आदी सेवा मिळतात. देशातील ४३ प्रमुख बँका आजमितीस *99# सेवा देतात. त्याशिवाय GSM सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्या ही सेवाही देतात. हिंदी व इंग्लिश या भाषांसह १२ भाषांत ही सेवा उपलब्ध आहे. अंतर्गत व्यवहारांसाठी थेट ग्राहकास वापरता येणारी अशी ही एकमेव सेवा आहे. व्यवस्थेच्या विविध पातळ्यांवर कार्ये करणाऱ्या बँका आणि टेलिकॉम कंपन्यांसारख्या ग्राहकोपयोगी संस्थांना सहभागी करून ही सेवा साकारली आहे.
बँका आणि टेलिकॉमसेवा देणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात एकत्र आणत, ग्राहकांना मोबाइल (साधे तसेच स्मार्टफोन) फोनवर बँकिंग सेवेचा मोठा लाभ मिळवून देणारा हा एक सामायिक मंच एनपीसीआयने तयार केला आहे.
सध्या *99# सेवेमार्फत खालील आर्थिक, बिगर आर्थिक आणि मूल्यवर्धित सेवा दिल्या जातात.
आर्थिक सेवा |
निधी स्थानांतर (P2P – व्यक्ती ते व्यक्ती) |
निधी स्थानांतर (P2A – व्यक्ती ते खाते) |
|
निधी स्थानांतर (P2U – व्यक्ती ते यूआयडीएआय) |
|
बिगर आर्थिक सेवा |
एमएमआयडी जाणून घेणे |
एमपिन
|
|
एमपिन बदलणे |
|
ओटीपी तयार करणे |
|
शिल्लक तपासणे |
|
मिनी स्टेटमेंट |
|
मूल्यवर्धित सेवा |
क्यूएसएम (आधार मॅपरवर चौकशी सेवा- QSAM) किंवा *99*99# |
स्त्रोत : भारतीय राष्ट्रीय भुगतान महामंडळ
अंतिम सुधारित : 3/26/2020
*९९# सर्व्हिस कशा प्रकारे काम करते याची माहिती याम...
ऑनलाईन बँकिंग म्हणजे काय? अनेक बँकांमध्ये इंटरनेट ...
डिजिटल देयकेचा प्रचार आणि प्रसारासाठी वापरण्यात आल...
भारत सरकार निर्मित डिजिटल देयक प्रणाली (डिजिटल पेम...