Paytm हे एक ई-वॉलेट आहे. Paytm बाबत जाणून घेण्याआधी आपण ई-वॉलेट हि संकल्पना समजून घेऊया.
आपण सर्व दैनंदिन जीवनामध्ये पैसे ठेवण्यासाठी पर्स,पॉकेट,बटवा इ. चा वापर करतो. यांच्या वापरामुळे पैश्याची देवाणघेवाण, व्यवस्थापन सुलभ होते. Paytm हा पण एक बटवा/पर्स/पॉकेट आहे, फरक फक्त इतकाच कि, Paytm आपण elctronically वापरतो.
जसे आपण पैसे बँकेतून काढून आपल्या पॉकेट्मधे ठेवतो आणि नंतर व्यवहारांसाठी आपण या पैशांचा वापर करतो. अगदी तसच आपण आपल्या बँकेच्या अकाउंट मधून पैसे paytm मध्ये ऍड (Add) करतो. पण हि प्रक्रिया पूर्णतः electronic असते.
Paytm वापरण्याचे खूप फायदे आहेत. जसे कि, पैसे ऍड करण्यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरज नाही. अगदी क्षणामध्ये पैश्यांची देवाणघेवाण करता येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे व्यवहार खूप सुरक्षित आहेत.
कॅशलेस महाराष्ट्राच्या यशोगाथा पाहण्यासाठी महाराष्ट्र डिजिधन जागृतता कार्यक्रमाच्या (अवेअरनेस प्रोग्रॅमच्या) फेसबुक पेजला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र डिजिधन अवेअरनेस प्रोग्रॅम
स्त्रोत - http://www.digidhan.info/#
अंतिम सुधारित : 7/28/2023