অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ई-प्रशासन- तंत्रज्ञानाद्वारे शासन प्रणालीत सुधारणा

विविध सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी सेवांचे वितरण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन सरकारी प्रक्रियांची फेररचना करणे व सरकारी प्रक्रिया अधिक कार्यक्षम करणे, अमूलाग्र बदलासाठी अतिशय महत्वाचे आहे व म्हणूनच सर्व मंत्रालयांमध्ये/विभागांमध्ये त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

तंत्रज्ञानाद्वारे शासन प्रणालीत सुधारणा घडविण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत

  • अर्जाचे सरलीकरण करणे व आवश्यक माहितीच भरणे – अर्ज अतिशय सोपे केले व वापरणाऱ्यासाठी अनुकूल केले पाहिजे व केवळ किमान व आवश्यक माहितीच गोळा केली जावी.
  • ऑनलाईन अर्ज व त्याची सद्यःस्थिती - ऑनलाईन अर्ज व त्यांच्या स्थितीचा मागोवा घेण्याची तरतूद.
  • ऑनलाईन संग्रहालय - ऑनलाईन संग्रहालयांचा वापर प्रमाणपपत्रे, शैक्षणिक पदव्या, ओळख दस्तऐवज इत्यादींसाठी करण्याचा आदेश दिला पाहिजे म्हणजे नागरिकांना हे दस्तऐवज प्रत्यक्ष स्वरुपात सादर करण्याची गरज नाही.
  • सेवा व प्लॅटफॉर्मचे एकत्रिकरण – सेवा व प्लॅटफॉर्मचे एकत्रिकरण उदा. भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाचा आधार प्लॅटफॉर्म (युआयडीएआय), पेमेंट गेटवे, मोबाईल सेवा प्लॅटफॉर्म, खुल्या अप्लीकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेसेस (एपीआय) व राष्ट्रीय व राज्य सेवा वितरण गेटवे (एसएसडीजी/एसएसडीजी) यासारख्या मिडलवेअरद्वारे डाटाची देवाणघेवाण करण्याचे आदेश दिले पाहिजेत, ज्यामुळे नागरिकांना व व्यवसायांना एकत्रित व आंतरसक्रिय सेवा वितरण करता येईल.

 

 

 

सर्व डाटाबेस व माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरुपात असली पाहिजे व हस्तलिखित स्वरुपात नाही. सरकारी विभागांतर्गत व संस्थांमधील कामाचा प्रवाह स्वयंचलित असला पाहिजे ज्यामुळे सरकारी प्रक्रिया कार्यक्षम होतील व नागरिकांना या प्रक्रिया पाहताही येतील. माहिती तंत्रज्ञानाचा वापर सध्याच्या समस्या ओळखण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी, डाटा स्वयंचलित करण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी केला पाहिजे. या प्रामुख्याने प्रक्रिया सुधारणा असतील.

 

 

स्त्रोत : डिजिटल इंडिया कार्यक्रम

संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate