অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सर्वांसाठी माहिती

मुक्त डाटा प्लॅटफॉर्म

http://data.gov.in (दुवा बाहेरचा आहे)

खुल्या डाटा प्लॅटफॉर्म मंत्रालयांद्वारे/विभागांद्वारे खुल्या प्रारुपातील डाटासंच प्रसारित करण्यास मदत करतो ज्यांचा वापर, फेरवापर व फेरवितरण करता येते. माहिती व दस्तऐवज ऑनलाईन प्रकाशित केल्यामुळे नागरिकांना मुक्तपणे व सहजपणे माहिती उपलब्ध होईल.

शासन सर्व सामाजिक माध्यमातून सक्रियपणे संपर्क साधेल

सरकार माहिती देण्यासाठी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सक्रियपणे सामाजिक माध्यमांद्वारे व वेब आधारित प्लॅटफॉर्मद्वारे संपर्क करेल. MyGov.in, पंतप्रधानांनी २६ जुलै, २०१४ रोजी नागरिकांना प्रशासनात सहभागी करुन घेण्यासाठी सरकारला कल्पना/सूचनांची देवणाघेवाण करण्यासाठीचे माध्यम म्हणून एका मंचाची स्थापना केली. तो चांगल्या प्रशासनासाठी नागरिक व सरकारदरम्यान दुहेरी संपर्क साधण्यास मदत करेल.

ऑनलाईन संदेश पाठविणे

नागरिकांना विशेष प्रसंगी/कार्यक्रमांच्या वेळी ऑनलाईन संदेश पाठविण्यासाठी ईमेल व एसएमएसमुळे मदत होईल.

खुला डाटा प्लॅटफॉर्म, सामाजिक माध्यमाचा वापर व ऑनलाईन संदेश

खुला डाटा प्लॅटफॉर्म, सामाजिक माध्यमाचा वापर व ऑनलाईन संदेश पाठवण्यासाठी प्रामुख्याने सध्याच्या पायाभूत सुविधा वापरल्या जातील व त्यासाठी मर्यादित अतिरिक्त संसाधनांची गरज लागेल.

 

स्त्रोत : डिजिटल इंडिया

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate