भारत सरकारच्या लघु, मध्यम उद्योग मंत्रालय व जर्मनीच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे इन्डो जर्मन या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने कुशल मनुष्यबळासाठी विविध अभ्यासक्रम शिकविले जातात.
संस्थेने नुकतीच काही पूर्ण वेळ व काही अर्ध वेळ अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची घोषणा केली आहे. हे अभ्यासक्रम नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होत असून संस्थेच्या औरंगाबाद/नागपूर/पुणे/ मुंबई केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांचे नाव, कालावधी, आवश्यक पात्रता आदी माहिती पुढीलप्रमाणे आहे.
पूर्णवेळ अभ्यासक्रम
- मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड टूल इंजिनियरिंग
- मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॅड/कॅम
- मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईन
- मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन प्रोडक्ट डिझाईन
- मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टेक्नॉलॉजी. अनुक्रमांक 1 ते 5 या अभ्यासक्रमांसाठी उमेदवार हे मेकॅनिकल/प्रॉडक्शन किंवा समकक्ष विषयातील इंजिनियरिंग मधील पदवी/पदवीकाधारक असावेत.
- मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स
- मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन ॲण्ड रोबोटिक्स. अनुक्रमांक 6 व 7 या अभ्यासक्रमांसाठी उमेदवार हे इलेक्ट्रिकल/ ईसीई/ इन्स्ट्रुमेंटेंशन/ मेकॅनिकल/ प्रॉडक्शन किंवा समकक्ष विषयातील इंजिनियरिंग पदवीधर असावेत.
- मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन स्ट्रक्चरल डिझाईन ॲण्ड ॲनॅलिसिस - या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हे सिव्हिल इंजिनियरिंग मधील किंवा समकक्ष विषयातील पदवी/पदवीकाधारक असावेत.
- मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन वेल्डींग ऑपरेशन या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हे मेकॅनिकल/प्रॉडक्शन किंवा समकक्ष विषयातील इंजिनियरिंग पदवी/पदविकाधारक असावेत.
अर्धवेळ अभ्यासक्रम
- सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईन अॅण्ड कॅड/कॅम
- सर्टिफिकेट कोर्स इन कॅड /कॅम
- सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईन
- सर्टिफिकेट कोर्स इन प्रॉडक्ट डिझाईन
- सर्टिफिकेट कोर्स इन रिव्हर्स इंजिनियरिंग ॲण्ड 3डी प्रिंटींग. अनुक्रमांक 10 ते 14 या अभ्यासक्रमांसाठी उमेदवार हे मेकॅनिकल/प्रॉडक्शन/ऑटो किंवा समकक्ष विषयातील इंजिनियरिंग पदवी/पदविकाधारक/आयटीआय पूर्ण केलेले असावेत.
- सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स
- सर्टिफिकेट कोर्स इन व्हीएलएसआय ॲण्ड एम्बेडेड सिस्टिम डिझाईन. अनुक्रमांक 15 ते 16 या अभ्यासक्रमांसाठी उमेदवार हे इलेक्ट्रिकल/ ईसीई/ इन्स्ट्रुमेंटेंशन/ मेकॅनिकल/ प्रॉडक्शन किंवा समकक्ष विषयातील पदवी/ पदविकाधारक आयटीआयमधून पूर्ण केलेले असावेत.
अनुक्रमांक 4, 5, 6, 7, 8, 9, 13, 14, 15 आणि 16 हे अभ्यासक्रम फक्त औरंगाबाद येथील केंद्रात उपलब्ध आहेत. अनुक्रमांक 1 ते 9 या अभ्यासक्रमांसाठी 40 हजार रुपये इतके, अनुक्रमांक 10 या अभ्यासक्रमासाठी 50 हजार रुपये इतके, तर अनुक्रमांक 11 ते 16 या अभ्यासक्रमांसाठी 25 हजार रुपये इतके शुल्क भरावयाचे आहे.
अनुक्रमांक 10 या अभ्यासक्रमाचा कालावधी 12 महिन्यांचा असून या अभ्यासक्रमांचे शुल्क दोन हप्त्यात भरता येईल. इतर अभ्यासक्रम हे 6 महिने कालावधीचे आहेत. हे अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना नोकरी मिळण्यासाठी संस्थेतर्फे सहाय्य केले जाईल. वसतिगृहाची सुविधा फक्त औरंगाबाद येथेच उपलब्ध आहे. नियमानुसार विविध संवर्गांसाठी आरक्षण फी सवलत उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया संबंधित संस्थांमध्ये संपर्क साधावा तसेच संस्थेच्या igtr-aur.org, igtr-aur.gov.in, या संकेतस्थळास भेट द्यावी.
संस्थांचे पत्ते
- इन्डो जर्मन टूल रुम, औरंगाबाद, पी-31, एम.आय.डी.सी. इंडस्ट्रियल एरिया, चिखलठाणा, औरंगाबाद - 431006 महाराष्ट्र, दूरध्वनी क्र.- (0240)-2486832, 2482593, 2470541, फॅक्स-(0240)- 2484028, ईमेल – training@igtr-aur.org
- इन्डो जर्मन टूल रुम, औरंगाबाद, एक्सटेन्शन सेंटर पुणे, आयजीटीआर-एमएसएमई डीआय कॅड/ कॅम ट्रेनिंग सेंटर, शंकरशेठ रोड, पीएमटी वर्कशॉप जवळ, स्वारगेट, पुणे- 411037, महाराष्ट्र, दूरध्वनी क्र.-(020) 24440861, फॅक्स- (020) 24440862, ईमेल- igtr_pune@yahoo.co.in
- इन्डो जर्मन टूल रुम, औरंगाबाद, एक्सटेन्शन सेंटर नागपूर, प्लॉट नं. पी-142, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, हिंगाणा, नागपूर-440006, महाराष्ट्र, दूरध्वनी क्र. (07104) 645114, फॅक्स (07104) 645114,ईमेल – training_ngp@igtr-aur.org
- एमएसएमई डीआय-इन्डो जर्मन टूल रुम, औरंगाबाद, ट्रेनिंग सेंटर मुंबई, एमएसएमई डीआय, साकीनाका, कुर्ला-अंधेरी रोड, मुंबई - 400072, महाराष्ट्र, दूरध्वनी क्र.- (022) 28573020, 28573024, ईमेल- training_mum@igtr-aur.org
लेखक - देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती)(वृत्त)
स्त्रोत - महान्युज