वेबसाईट : सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था
सहकार आयुक्त व सहकारी संस्था नोंदणी निबंधक यांचा कृषी औद्योगिक क्षेत्रात मुख्यत्वे करून ग्रामीण पत पुरवठा यांचे क्षेत्रात प्रमुख भूमिका आहे. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था म. रा. पुणे यांचे कार्यालयाचे कामकाज सहकार पणन व वस्त्रोद्योग महाराष्ट्र शासन व ग्रामीण अर्थपुरवठा आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्था, बँकिंग, जिल्हा मध्य. सह. बँक, औद्योगिक संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि नियम 1961 खाली चालते. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी म. रा. यांचेकडे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा 1963, मुंबई सावकारी कायदा 1546, मुंबई वखार कायदा 1959 आणि त्याखालील केलेले नियम ह्या कायद्याच्या खालील काम सोपविलेले आहे. सहकार म्हणजे लोकांची चळवळ ही उत्स्फुर्तपणे निर्माण झाली आहे. स्वयंनिर्मित व स्वयंपूर्ण काम आहे. तथापि चळवळीचे आर्थिक महत्त्व आणि लाभ यात समावेश असलेल्या अनेक लोकांचे हित विचारात घेऊन शासनाने यावर नियंत्रण व व्यवस्थापन राहणेसाठी कायदे केलेले आहेत. हे लोकांच्या हिताचे रक्षण करणेसाठी केलेले आहे. या कायदयाच्या कक्षेत खालील बाबींचा अंतर्भुत झालेला आहे.
महाराष्ट्र हे भारतातील सहकार चळवळीतील विस्तारीत राज्य असून त्यास प्रदिर्घ इतिहास आहे. सहकार हे महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतो. महाराष्ट्रात 2.18 लाख सहकारी संस्था आहेत. सहकार आयुक्त हे मित्र, तत्त्वज्ञानी आणि मार्गदर्शक असल्याने त्यांना अनेक भूमिका कराव्या लागतात व संपूर्ण सहकारी चळवळीचे व्यवस्थापन करावे लागते.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/22/2020
या उद्योगाच्या गरजा लक्षात घेत, सहकार विभागांतर्गत...
कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण पत क्षे...
तील शेतमाल मोठ्या प्रमाणावर पिकवला जात असला तरी तो...