क्र . | तज्ञ | क्र | तज्ञ |
---|---|---|---|
१ | सामान्य शल्यक्रिया | ८ | रोगनिदान शास्त्र |
२ | सामान्य वैद्यक | ९ | मानसोपचार |
३ | प्रसूतिशास्त्र | १० | त्वचा व गुप्त रोग |
४ | बालरोग | ११ | छातीचे रोग |
५ | अस्थिरोग | १२ | नेत्ररोग |
६ | भूलशास्त्र | १३ | नाक कान घसा |
७ | किरणोपायोजन शास्त्र | १४ | दंत आरोग्य |
१ अतिदक्षता विभाग : शासनाने अतिदक्षता विभागासाठी जिल्हा / सामान्य रुग्णालयामध्ये अतिरिक्त कर्मचारी वर्गासह ६ खाटांचा अतिदक्षता विभाग मंजूर केला आहे. या अतिदक्षता विभागांसाठी आवश्यक त्या उपकरणांची व्यवस्था केली आहे.
२ विशेष नवजात दक्षता विभाग : जन्मतःच कमी वजनाच्या व योग्यवेळे पूर्वी जन्म झालेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जिल्हा व महिला रुग्णालयात १० अतिरिक्त कर्मचारी व रेडियंट वॉर्मर्स आणि फोटोथेरपी युनिट इत्यादि आवश्यक उपकरणासह विशेष नवजात दक्षता विभाग स्थापन केला आहे.
३ जळीत विभाग : भाजून होणारे मृत्यू कमी करण्यासाठी वेगळा जळीत विभाग मंजूर आहे. या विभागासाठी ३ कर्मचारी ( २ वर्ग २च्या परिचारिका व एक चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचारी ) मंजूर आहेत. पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी ५ खाटा आहेत.
४ सि.टी. स्कॅन : विविध रोगांच्या निदानासाठी सि.टी. स्कॅन करणे आवश्यक असते. वाशीम व पुणे येथील जिल्हा रुग्णालय व मालेगाव सामान्य रुग्णालय सोडून सि.टी. स्कॅन सेवा सर्व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे.
५. मानसोपचार सेवा : १.३.२००६च्या शासकीय निर्णयानुसार २३ जिल्हा रुग्णालयामध्ये १० खाटांचा मानसोपचार विभाग मंजूर आहे. याअंतर्गत २० पदे मंजूर आहेत.
६ सोनोग्राफी सेवा : रोगांचे निदान योग्य रीतीने होण्यासाठी सर्व जिल्हा, महिला व सामान्य रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
७ सुरक्षा, रुग्णवाहिका, आहार व स्वच्छता सेवा करार पद्धतीच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.
राज्यात १०० खाटांची एकूण २८ उपजिल्हा रुग्णालये कार्यरत असून त्यापैकी २३ तीस खाटांची रुग्णालये १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धित करण्यात आली असून भिवंडी येथे १०० खाटांचे १ नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे. ५६ तीस खाटांची रुग्णालये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये श्रेणीवर्धित करण्यात आली आहेत.
क्र. | १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या तज्ञ सेवा | क्र. | ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या तज्ञ सेवा |
---|---|---|---|
१ | सामान्य शल्यक्रिया | १ | रोगनिदान शास्त्र |
२ | सामान्य वैद्यक | २ | मानसोपचार |
३ | प्रसूतिशास्त्र | ३ | त्वचा व गुप्त रोग |
४ | बालरोग | ४ | छातीचे रोग |
५ | अस्थिरोग | ५ | नेत्ररोग |
६ | भूलशास्त्र | ६ | नाक कान घसा |
७ | किरणोपायोजन शास्त्र | ७ | दंत आरोग्य |
राज्यामध्ये ३० खाटांची ३८७ ग्रामीण रुग्णालये मंजूर आहेत. त्यापैकी ३६० ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. प्रादेशिक असमतोल योजनेखाली १४३ ग्रामीण रुग्णालये मंजूर आहेत. ग्रामीण रुग्णालयांत एक वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोगतज्ञ / शल्यचिकित्सक, बालरोगतज्ञ / वैद्यकीय चिकित्सक व भूलतज्ञ यांच्या सारखे तज्ञ असतात. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून संदर्भित झालेल्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार केले जातात. या रुग्णालयांमध्ये क्ष-किरण, प्रयोगशाळा,व रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असतात. ग्रामीण रुग्णालयांत २५ कर्मचार्यांचा आकृतीबंध असून सुरक्षा, रुग्णवाहिका, आहार व स्वच्छता सेवा करार पद्धतीवर आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या रुग्णालयातील ट्रॉमा दक्षता विभागासाठी शासनाने कर्मचारीवर्ग, उपकरणे व सुसज्ज रुग्णवाहिका पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ६८ रुग्णालयांमध्ये (२३ जिल्हा रुग्णालये व ४५ उपजिल्हा व संदर्भ सेवा रुग्णालये ) ट्रॉमा दक्षता विभाग मंजूर करण्यात आला आहे. या ट्रॉमा दक्षता विभागांसाठी १५ कर्मचारी मंजूर आहेत.
स्त्रोत : आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन
माहिती संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 8/10/2020
सार्वजिनक आरोग्य सेवा - मार्गदर्शक पुस्तिका
सध्या आरोग्य क्षेत्रात ढोबळमानाने दोन दृष्टिकोनातू...
लोकाधारित देखरेख सुरू असलेल्या गावांपैकी प्रत्येक ...
आरोग्य अधिकार व आरोग्यसेवांचा अधिकार या मार्गदर्शक...