www.maharojgar.gov.in हे पोर्टल शासनाने युवकांना रोजगार व स्वयंरोजगार साठी मार्गदर्शन करणे तसेच त्यांचे उत्पन्न व त्यांच्या कौशल्य व कलागुणांना वाव देण्यासाठी सुरु केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत जिल्हा निहाय रोजगार मेळावा आयोजित केला जातो त्या संबधी माहिती मिळवण्यासाठी महारोजगार या पोर्टलवर क्लिक करून त्यातील Current Job Fairs वर क्लिक करा
महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत ठिकाणानुसार चालू रोजगारसंबधी माहिती मिळवण्यासाठी महारोजगार येथे क्लिक करून त्यातील Current Job वर क्लिक करा
जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे विविध पदाच्या 24 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपीक (6 जागा), तलाठी (18 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://washim.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (कनिष्ठ) गट-अ पदाच्या 16 जागा
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (कनिष्ठ) गट-अ (16 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 24 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mls.org.in या संकेतस्थळावर उपल्बध आहे.
भारतीय तट रक्षक दलामध्ये दहावी उर्त्तीण झालेल्यांसाठी नाविक म्हणून उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 6 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://www.joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे विविध पदाच्या 330 जागा
माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे विविध पदाच्या 330 जागासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 29 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने दंतशल्यचिकित्सक गट-ब पदाच्या 189 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील आरोग्य संचालनालय, मुंबई कार्यालयांतर्गत दंतशल्यचिकित्सक सामान्य राज्य सेवा गट-ब (189 जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने वैज्ञानिक अधिकारी गट-ब पदाच्या 10 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने वैज्ञानिक अधिकारी, अन्न व औषध प्रशासन गट-ब (10 जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने अधिष्ठाता पदाची जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या गट-अ (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने संचालक(व्यवसाय शिक्षण/प्रशिक्षण) पदाची जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने संचालक व्यवसाय शिक्षण/प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2015आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने कला संचालक पदाची जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने कला संचालक, कला संचालनालय (म.रा) महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट-अ (1 जागा) या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने संशोधन अधिकारी पदाची जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने गृह विभागातील संशोधन अधिकारी, सामान्य राज्य सेवा (कारागृह विभाग) गट-अ (1 जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती याwww.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने महाव्यवस्थापक गट-अ पदाची जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने महाव्यवस्थापक (देवनार पशुवधगृह) बृहन्मुंबई महानगरपालिका गट-अ (1 जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.inसंकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (कनिष्ठ) गट-अ पदाच्या 6 जागा
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (इंग्रजी) (कनिष्ठ) गट-अ (3 जागा), प्रतिवेदक (हिंदी) (कनिष्ठ) गट-अ (3 जागा), या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 24 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नवी मुंबई येथे प्रतिनियुक्तीने विविध पदाच्या 12 जागा
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे जलस्वराज्य-2 कार्यक्रम अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष कार्यालयात प्रतिनियुक्तीने वित्त नियंत्रक (1 जागा), कार्यकारी अभियंता (1 जागा), संनियत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ (1 जागा), कक्ष अधिकारी (1 जागा), सहाय्यक लेखाधिकारी (1 जागा), सहाय्यक संनियत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ (2 जागा),संपादणूक तज्ज्ञ (1 जागा), लघुलेखक (नि.श्रेणी) (1 जागा), शिपाई (1 जागा), अधीक्षक अभियंता (1 जागा), कार्यकारी अभियंता (1 जागा) या पदासाठी योग्य मार्गाने (कार्यालयामार्फत/प्रशासकीय विभागामार्फत) अर्ज करावेत. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 6 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती water.maharashtra.gov.in आणि www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने अन्न सुरक्षा अधिकारी पदाच्या 48 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी (48 जागा) अन्न औषध प्रशासन गट-ब या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नवी मुंबई येथे विविध पदाच्या 10 जागा
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे जलस्वराज्य-2 कार्यक्रम अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष कार्यालयात संपादणूक तज्ज्ञ (1 जागा), ज्ञान व्यवस्थापन तज्ज्ञ (1 जागा), व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ज्ञ (1 जागा), लेखा सहाय्यक (1 जागा), सहाय्यक माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ (1 जागा), निम्न व्यवसायी (5 जागा) ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 6 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहितीwater.maharashtra.gov.in आणि www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अपंग व्यक्तींसाठी विशेष भरती
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अपंग व्यक्तींना विशेष भरती अभियानांतर्गत विविध पदे उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 6 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://www.bpclcareers.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने सहयोगी प्राध्यापक/प्राध्यापक पदाच्या 105 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने महाविद्यालयीन शाखांसाठी सहयोगी प्राध्यापक (विषयासह)- गृहशास्त्र (1 जागा), इंग्रजी (1 जागा), मराठी (1 जागा), संख्याशास्त्र (2 जागा), भौतिकशास्त्र (12 जागा), रसायनशास्त्र (9 जागा), वनस्पतीशास्त्र (6 जागा), पाणीशास्त्र (3 जागा), जीवशास्त्र (3 जागा), जैविक तंत्रज्ञान (2 जागा), सूक्ष्मजीवशास्त्र (2 जागा), जीवभौतिकशास्त्र (2 जागा), जीवरसायनशास्त्र (2 जागा), विधी (3 जागा), न्यायसहाय्यक विज्ञान (3 जागा), संगणकशास्त्र (3 जागा), गणित (3 जागा), अर्थशास्त्र (2 जागा) प्राध्यापक (विषयासह)- इतिहास (1 जागा), भूगोल (1 जागा), गृहशास्त्र (1 जागा), इंग्रजी (1 जागा), मराठी (1 जागा), अर्थशास्त्र (1 जागा), जीवरसायनशास्त्र (1 जागा), भौतिकशास्त्र (7 जागा), प्राणीशास्त्र (3 जागा), राज्यशास्त्र (1 जागा), भूगर्भशास्त्र (1 जागा), न्यायसहाय्यक विज्ञान (3 जागा), संगणक शास्त्र (3 जागा), गणित (3 जागा), सूक्ष्मजीवशास्त्र (2 जागा), वनस्पतीशास्त्र (1 जागा), रसायनशास्त्र (10 जागा), जीवशास्त्र (3 जागा), जैविक तंत्रज्ञान (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र गृहनिमार्ण व क्षेत्रविकास प्राधिकरण मुंबई येथे विविध पदाच्या 486 जागा
महाराष्ट्र गृहनिमार्ण व क्षेत्रविकास प्राधिकरण मुंबई यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) (4 जागा), मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी (1 जागा), उप अभियंता (11 जागा), उप अभियंता (विद्युत) (2 जागा), लेखाधिकारी (3 जागा), सहाय्यक लेखाधिकारी (3 जागा), मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी (1 जागा), सहाय्यक विधी अधिकारी (1 जागा), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (24 जागा), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (5 जागा), विधी सहाय्यक (4 जागा), सहाय्यक (1 जागा), स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (21 जागा), कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (149 जागा), लघुटंकलेखक (2 जागा), भूमापक (10 जागा), तारतंत्री (244 जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकमत 1 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती mhada.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ज्ञ पदाच्या 4 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंर्तगत सार्वजनिक आरोग्य खाते व प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ज्ञ (4 जागा) या पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज 26 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2015 या कालावधीत स्वीकारले जातील. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 3 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
निबंधक भागीदारी संस्था, मुंबई येथे विविध पदाच्या 11 जागा
निबंधक भागीदारी संस्था, मुंबई येथे अधीक्षक (1 जागा), प्रमुख लिपिक (2 जागा), वरिष्ठ लिपिक (4 जागा), लिपिक टंकलेखक (1 जागा), शिपाई (3 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आयबीपीएस यांच्यावतीने क्लार्कची पदे
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यावतीने निम्न सूचिबद्ध सहभागी संघटनांमधील 2016-17 तील सीडब्ल्यूई-क्लार्क-V या पदाच्या सामायिक भरती प्रक्रियेकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 11 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2015 असा आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 6 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.ibps.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिडेट, मुंबई येथे विविध पदाच्या दोन जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिडेट, मुंबई येथे उप व्यवस्थापक (सीएसआर) (1 जागा), वरिष्ठ अधिकारी (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 6 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने लघुलेखक पदाच्या 1064 जागा
कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने गट-क व ड या वर्गातील लघुलेखक (1064 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 ऑगस्ट 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://sscregistration.nic.in/mainmenu2.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) या संस्थेत वितरक आणि पुस्तक विक्रेता होण्याची संधी
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) या संस्थेत एक सुवर्ण संधी आहे. या संस्थेच्या प्रकाशनाचे अधिकृत वितरक आणि पुस्तक विक्रेता करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. 2500 रुपये सुरक्षा ठेवीच्या आधारावर बेरोजगार युवक युवतींना आकर्षक मानधन दिले जाणार आहे. मागासवर्गीय तरुणांसाठी ही ठेव 2000 रुपये आहे. अधिक माहितीसाठी www.nbtindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्त्रोत : महान्युज
माहिती संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 7/19/2020