माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठी विनंती
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठी विनंती
- तुम्ही माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये कोणत्या ही सार्वजनिक आस्थापनांकडून (सरकारी संस्था किंवा सरकारी अनुदानप्राप्त संस्था) माहिती मिळवू शकता.
- यासाठी लागणारा अर्ज हस्तलिखित असू शकतो किंवा टाईप केलेला असू शकतो.
- अर्ज इंग्रजी, हिंदी किंवा संबंधित राज्याच्या अधिकृत भाषेत असावा.
- तुमच्या अर्जात खालील माहिती पुरवा:
- सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी (पीआयओ) यांचे नाव व पत्ता
- विषय: माहितीचा अधिकार अधिनियम २००५, सेक्शन ६ (१) अन्वये माहिती मिळविण्यासाठी अर्ज
- तुम्हाला त्या संस्थेकडून/प्राधिकरणाकडून हवी असलेली विशिष्ट माहिती
- अर्जदाराचे नांव
- वडिलांचे/पतीचे नांव
- वर्ग: अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागासवर्गीय, इ.
- अर्ज फी
- तुम्ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबापैकी आहात का? हो/नाही
- पत्रव्यवहाराचा पत्ता (मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी आवश्यक नाहीत)
- तारीख आणि स्थळ
- अर्जदाराची सही
- सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी
- अर्ज करण्यापूर्वी सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी यांचे नाव व पत्ता, उल्लेख केलेली फी व फी देण्याची पद्धत पुन्हा एकदा तपासून पहा.
- माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळविण्यासाठी फी आकारण्याची तरतूद कायद्यात आहे मात्र अनुसूचित जाती/जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींकडून फी आकारण्यात येत नाही.
- ज्यांना फीमाफी हवी असेल त्यांनी अर्जासोबत अनुसूचित जाती/जमाती/दारिद्र्यरेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज स्वतः जाऊन/पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे दाखल करता येतो. जर तुम्ही अर्ज पोस्टाने पाठवत असाल तर नेहमी रजिस्टर पोस्टाचाच वापर करा. खाजगी कोरियर सेवा वापरणे सदैव टाळा.
- तुमच्या संदर्भासाठी अर्जाच्या (मुख्य अर्ज, फी भरल्याचा पुरावा, सोबत जोडलेली कागदपत्रे, पोस्टाने अर्ज पाठवल्याचा पुरावा, इ.) दोन (2) छायांकित प्रती तयार करा व सुरक्षितपणे ठेवा.
- जर तुम्ही अर्ज स्वहस्ते दाखल करणार असाल, तर एक पोचपावती तयार करा व त्यावर संबंधित कार्यालयाचा तारखेनिशी सही-शिक्का घ्या. जर अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवणार असाल तर ही पोचपावती अर्जासोबत जोडा आणि पोस्टाची अर्ज पाठवल्याची पावती व्यवस्थित जपून ठेवा.
- लोकमाहिती अधिकार्याला अर्ज मिळाल्यापासूनच्या दिवसापासून अर्जावर कार्यवाही करून माहिती पुरवण्याची मुदत मोजतात.
खालील बाबीही लक्षात ठेवा
क्र. |
परिस्थिती |
माहिती पुरवण्यासाठी कालावधी |
1 |
सर्वसामान्य परिस्थितींमध्ये माहिती पुरवणे |
३० दिवस |
2 |
एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी किंवा जीवनाशी संबंधित विषयावर माहिती पुरवणे |
४८ तास |
3 |
जर अर्ज सहाय्यक लोकमाहिती अधिकार्यामार्फत (एपीआयओ) स्वीकारण्यात आला असेल तर |
वरील दोन्ही परिस्थितींच्या कालमर्यादेमध्ये ५ दिवस आणखी जोडावेत. |
अंतिम सुधारित : 8/21/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.