অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओरिसामधील ई-शासन

भू-लेख

(ओरिसामधील जमिनीच्या नोंदींचे रेकॉर्ड)

भूलेख, हे सॉफ्टवेअर जमिनीच्या नोंदींचे रेकॉर्ड पुरविते. हा उपक्रम डायरेक्टरेट ऑफ रेकॉर्डस् एण्ड सर्व्हेज्, ओरिसा सरकार तर्फे सुरू करण्यात आला. हे सॉफ्टवेअर रेकॉर्डसचे अधिकतम संगोपन करते व अधिकारांच्या रेकॉर्डसच्या (आर.ओ.आर.) नकला भू-धारकांना संपूर्ण राज्यात पुरविते.

देण्यात येत असलेल्या सेवा

 • ओरिसाच्या १७१ तहसीलांची आर.ओ.आर. माहिती आता इंटरनेटवर उपलब्ध
 • ओरिसाचे लोक आता इंटरनेट वर त्यांच्या आर.ओ.आर. पाहू शकतात
 • जमिनीचे पासबुक अर्जाचे फॉर्म
 • नकाशे
 • फॉर्म
 • जमिनीच्या पासबुकसाठी अर्ज
 • मिश्र दाखला प्राप्त करण्यासाठी अर्ज
 • जमिनीच्या रेकॉर्डमध्ये बदलासाठी अर्ज
 • जमिनीच्या सेटलमेन्टसाठी अर्ज
 • ओरिसा सरकार व जमिनीच्या सेटलमेन्टचे कायदे
 • शेत जमीन संरक्षणासाठी एका रयतेचा अर्ज

जास्त माहितीसाठी कृपया http://bhulekh.ori.nic.in/वर जा

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी वेबसाइट

ओरिसाच्या लोकांसाठी आता ऑनलाइन पब्लिक युटिलिटी फॉर्म पोहोच आहे, जो ओरिसा सरकारचा एक उपक्रम आहे.

लोक आता विविध प्रकारचे ११६ फॉर्म पी.डी.एफ. फॉरमॅटमध्ये प्राप्त करू शकतात. पोर्टल वर उपलब्ध असलेल्या माहितीचा संबंध वाणिज्य व वाहतूक, खाद्य आपूर्ती व उपभोक्ता कल्याण, सामान्य प्रशासन, गृह, उद्योग, एक्साइज, ग्रामीण विकास, लोकांच्या तक्रारी व पेंशन प्रशासन, महसूल व आपदा प्रबंधन, कायदा, विज्ञान व तंत्रशास्त्र, एसटी व एससी विकास, अल्पसंख्यक व मागास जमात कल्याण विभाग, पर्यटन व संस्कृती, महिला व बाल कल्याण विकास विभाग.

जास्त माहितीसाठी http://orissa.gov.in/portal/ViewFormDetails.asp?vchGlinkId=GL007&vchplinkId=PL034 वर जा

ई-शिशु

ई-शिशु, हा ओरिसा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमाद्वारे सुरू करण्यात आलेला प्रकल्प आहे. हा देशभरातील एकमेव आहे. या प्रकल्पाचे दोन घटक आहेत:

 • चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टम (सी.टी.एस.) व
 • इंटरव्हेन्शन मॉनिटरिंग व सूचना प्रणाली (आय.एम.आय.एस.)

सी.टी.एस १४ वर्षांच्या खालील सर्व मुलांचा एकत्रित डाटाबेस आहे. यामध्ये त्यांची सामाजिक-आर्थिक तसेच डेमोग्राफिक माहिती आहे.
आय.एम.आय.एस., सर्व १४ इंटरव्हेन्शनचे ऑनलाइन निरीक्षण सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत करणे शक्य करते.

वैशिष्ठये

 • ६ ते १४ वर्षांच्या नोंदणी झालेल्याची, कधी ही नोंदणी न झालेल्या व राहुन गेलेल्या मुलांच्या स्थितिवर लक्ष ठेवते.
 • सरकार/पालक/सामान्य लोक यांना त्यांच्या मुलांची शाळेतील स्थिति पाहण्याची परवानगी देते.
 • जिल्हेवारी शाळेचा डाटा देते.

जास्त माहितीसाठी http://www.opepa.in/वर जा

आय.टी.आय.एम.एस.

एकत्रित वाहतूक माहिती प्रबंधन प्रणाली

वाणिज्य व वाहतूक विभागाने त्यांच्या पद्धतींच्या कांमकाजासाठी एका सॉफ्टवेअरचा विकास केला आहे ज्याचे नांव इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट इन्फर्मेशन मॅनेजमेन्ट सिस्टम(आय.टी.आय.एम.एस.) आहे. आर.टी.ए. च्या पुष्कळशा कार्यालयांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून लवकरच इतर जागीही सुरू होईल.

सॉफ्टवेअरने आपल्या विविध घटकांच्या द्वारे खालील पद्धतीचे संगणकीकरण केले आहे:

 • सारथी च्या माध्यमाने वहान चालवण्याचे परवाने (ड्रायव्हिंग लायसन्स)
 • वाहन च्या माध्यमाने मोटर वाहनांची नोंदणी व परवानगी
 • चेक गेट संगणकीकरणाच्या माध्यमाने मोटर वाहनांच्या करांचे एकत्रीकरण

वहान चालवण्याचे परवान्यांसाठी विभागाने ऑनलाइन फॉर्म पुरवणी सुरू केली आहे.

जास्त माहितीसाठी http://www.orissa.gov.in/commerce%26transport/

ऑरिस

(ओरिसा रजिस्ट्रेशन सूचना विभाग)

ओरिस, हा ओरिसा रजिस्ट्रेशन इंन्फरर्मेशन सिस्टम, ओरिसा सरकारच्या महसूल विभागाची एक संगणकीकृत संस्था आहे.

या सॉफ्टवेअरचा उपयोग करारनाम्याचे संगणकीकृत नोंदणी, दस्तऐवज आणि एनकंब्रन्स दाखल्यास मान्यता देणे, राज्याच्या महसूल विभागाचे नोंदणी विभाग विंग, जी.२.सी. आणि जी.२.जी. या दोन्ही सेवा ऑनलाइन देत आहे.

खालील जी.२.सी. सेवा त्या वेबसाइट वर उपलब्ध आहेत:

 • सर्व प्रकारच्या जमिनीची मूल्यांकन किंमत
 • जमिनीचे बेंचमार्क मूल्यांकन
 • स्टॅम्प ड्यूटी/नोंदणी फी
 • एनकंब्रन्स दाखला (ई.सी.)

जास्त माहितीसाठी http://ws.ori.nic.in/neworis/default.aspवर जा

ई-ग्राम

ग्रामीण सूचना प्रवेशद्वार (गेट वे)

ई-ग्राम, हे ग्रामीण सूचनेचे प्रवेशद्वार आहे ज्याची सुरूवात जिल्हाधीशांच्या व डी.आर.डी.ए. गंजम, ओरिसाच्या सक्रियतेमुळे झाली. या प्रकल्पाच्या द्वारे सर्व २२ विभागांना एन.आय.सी. , बेरहमपुरच्या एन.आय.सी.एन.ई.टी. आणि डी.आर.डी.ए. तर्फे इंटरनेट व इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमाने,सूचनेची पोच मिळाली आहे.

हा गेट वे विविध विकास योजना, सामाजिक सुरक्षा मापदंड आणि यांसारख्या पुष्कळ योजनांच्या स्थितिची माहिती देतो. ही माहिती राज्य मुख्यालयाचे उच्चाधिकारी, ग्रामीण विकास मंत्रालय, जी.ओ.आय.  आणि जनमानसांना मिळू शकते.

वैशिष्ठये

 • ब्लॉक, तहसील, जिल्हा येथील प्रगति व समीक्षेपर्यंत पोहोच शक्य करते
 • शेती व संबंधित उत्पादांचे सरकारी/बाजार भाव यांची माहिती पुरविते
 • विविध ग्रामीण तंत्रशास्त्रांवर माहिती पुरविते

जास्त माहितीसाठी कृपया http://ganjam.nic.inवर जा

ई-साक्षरता

ई-साक्षरता, जी.ओ.आय., सूचना प्रौद्योगिकी विभागाचा उपक्रम आहे ज्यामुळे सचिवालयात स्टेट-ऑफ-दि-आर्टची रचना करणे शक्य झाले आहे. सूचना प्रौद्योगिकी वर विशिष्ठ वर्ग देखील पुरविले जातात. सरकारी कर्मचा-यांना पूर्ण वर्षभर प्रशिक्षणाच्या पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार सगळ्या पातळ्यांवर प्रशिक्षण देण्यात येते.

या कार्यकमाची मुख्य वैशिष्ठये अशी आहेत:

 • सर्व सरकारी कर्मचा-यांना संगणकाच्या उपयोगाच्या विविध पक्षांवर प्रशिक्षण देण्यात येईल.
 • सध्या विद्यमान असलेल्या सूचना प्रौद्योगिकी विभागाच्या इन-हाउस क्षमतांचे योग्य प्रकारे संवर्धन करण्यात येईल.
 • सरकारी खात्यांतील भविष्यकालीन नियुक्तिंसाठी न्यूतम संगणकाच्या ज्ञानाची  आवश्यकता असेल. भर्तीच्या नियमांमध्ये योग्य सुधारणा करण्यात येतील.
 • सूचना प्रौद्योगिकीच्या क्षेत्रांत डिप्लोमा किंवा डिग्री घेण्यासाठी अभ्यास चालू ठेवण्याची परवानगी असेल.
 • संगणक केंद्रे व कियॉस्क्स् यांचा ग्रामीण पातळी उपयोगकर्त्यांसाठी विस्तार केला जाईल व त्यांना संगणकाच्या विविध पक्षांचे प्रशिक्षण देण्यात येईल.
 • ग्राम पंचायत कार्यालये (जेथे गरज असेल तेथे) संगणक व इंटरनेट कनेक्शनयुक्त असतील.
 • स्थानिक भाषेचा वापर आणि राज्य सरकारच्या वेबसाइटद्वारे ई-सेवा उपयोग कर्त्यांसाठी सुलभ करण्यात येतील.
 • संगणक सेवांचा उपयोग करण्यासाठी निवडक जागी सरकारद्वारे मदत पुरविण्यात येईल.

जास्त माहितीसाठी http://orissa.gov.in

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम


अंतिम सुधारित : 6/3/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate