कर्नाटकमध्ये ई-गव्हर्नन्स उपक्रमभूमी
भूमी’ जमिनीच्या रेकॉर्डस् प्रबंधन प्रणालीमधील प्रथम ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे जो सामान्य व्यक्तीच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प गेल्या ४ वर्षांपासून ७० लाख पेक्षा ही जास्त शेतक-यांना सेवा देत आहे.
या प्रकल्पांतर्गत, लैंड रेकॉर्ड कियॉस्क राज्यातील प्रत्येक तालुक्यात स्थापित करण्यात आला आहे व खालील सेवा हा प्रकल्प देईल :
जास्त माहिती करीता : http://www.bhoomi.kar.nic.in/
‘सामान्य माहिती’ हा कर्नाटक राज्यातील सर्व खेड्यांमध्ये उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांची माहिती देणारा वेब आधारित उपक्रम आहे ज्या योगे ग्रामीण विकास व पंचायती राज विभाग माहिती देतात. हा उपक्रम सर्व २१ विभागां मधील ३८७ परिमाणे कव्हर करतो. येथे खेडे, गाव, होबळी, ग्राम पंचायत, तालुका पंचायत, निवडणूक क्षेत्र, जिल्हा पंचायत निवडणूक क्षेत्रानुसार, असेंब्ली नुसार, संसदीय असेंब्ली नुसार, तालुक्या नुसार, जिल्ह्या नुसार आणि संपूर्ण राज्यासाठी सर्व २१ विभागां साठी माहिती पाहिली जाऊ शकते. ही माहिती संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा पंचायतीच्या द्वारे एकत्रित केली जाते आणि याचे निरीक्षण आर.डी.पी.आर. च्या पी.एम.ई. द्वारे करण्यात येते.
जास्त माहितीसाठी :http://rdpr.kar.nic.in
ई-ग्रंथालय हे विन्डो आधारित वाचनालयाचे कामकाजासाठीचे सॉफ्टवेअर आहे, जे संपूर्ण देशभरात एन.आय.सी. द्वारे कार्यान्वयनासाठी प्रमाणित करण्यात आलेले आहे.
याची वैशिष्ठये अशी आहेत :
जास्त माहितीसाठी कृपया : http://egranthalaya.kar.nic.in
सहकारिता अंकेक्षण निदेशालय
सहकार दर्पण’ एक द्विभाषीय पोर्टल आहे, ज्याचे उद्दिष्ठ प्रशासनात पारदर्शकता आणण्याचे आहे. हा एन.आय.सी. कर्नाटक आणि सहकारिता अंकेक्षण निदेशालयाचा उपक्रम आहे.
या पोर्टलमध्ये ३०,००० पेक्षा जास्त सहकारिता संस्थांची आर्थिक स्थिति, त्यांच्या बळकटपणा आणि कमकुवतपणाच्या चित्रणा सह दाखविण्यात आली आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये :
जास्त माहितीसाठी :http://sahakaradarpana.kar.nic.in/
वाहतूक विभाग
‘सारथी आणि वाहन’ क्षेत्रीय वाहतूक कार्यालय (आर.टी.ओ.) च्या संपूर्ण व्यवहारांचे ऍनिमेशन पुरविते – फी व टॅक्स, नोंदणीच्या सर्व अवस्था, परवाने, परमिट आणि एन्फोर्समेन्ट, फिटनेस, फी आणि कर विभागाच्या माध्यमाने कार्यप्रवाहाच्या पध्दतीवर आधारित.
खालील सेवा देखील याच्याद्वारे मिळू शकतात :
जास्त माहितीसाठी कृपया : http://rto.kar.nic.in/
‘रिटर्न फायलिंग सिस्टम’ चे कार्यान्वयन बंगलोरच्या १३० मंडल कार्यालयांमध्ये कराच्या इ.च्या माहिती देण्यासाठी करण्यात आले आहे. यामुळे कर प्रशासनामध्ये पारदर्शकता येईल.
या वेबसाइट वर कराच्या दरांसह कराचे वेळापत्रक आणि त्या संबधित सुचना देण्यात आलेली आहेत.
प्रमुख वैशिष्ट्ये
जास्त माहितीसाठी कृपया :http://ctax.kar.nic.in/index.asp
वस्तू देणे, क्रमवार लावणे व अनुमोदन, ताज्या वस्तूंच्या साठ्यात घेणे वा परत करणे या संबधी सर्व सुविधा या माध्यमाने मिळतात.
प्रमुख वैशिष्ठये :
जास्त माहितीसाठी कृपया :http://eman.kar.nic.in/
‘आस्थि तेरिज’ संपत्ती कराच्या एकत्रीकरणासाठी व मोजणीसाठी विकसित करण्यात आलेले सॉफ्टवेअर आहे. एकदा एखाद्या अधिकृत सरकारी अधिका-याने वार्षिक भाडे मूल्य व संपत्ती कर यांचा हिशेब केला की, सॉफ्टवेअर आपोआपच रकमेची मोजणी करते.कर्नाटक सरकार द्वारे ग्राम पंचायतींमध्ये ह्या संगणकीकृत यंत्रणेचे कार्यान्वयन करण्यात आले आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये :
जास्त माहितीसाठी कृपया लॉग ऑन करा :http://rdpr.kar.nic.in
कर्नाटक राज्य बालमजुर निर्मूलन प्रकल्प सोसायटी ने बालमजुर निर्मूलन गतिविधिंच्या माहितीची प्रणाली (सी.एल.ई.ए.आय.एस.) ची सुरूवात केली आहे ज्यायोगे – माहीती, शंका आणि आलेखा संबंधित माहिती मिळेल:
जास्त माहितीसाठी कृपया : http://balashrama.kar.nic.in/
‘कृषि मराठा वाहिनी’ एक वेब आधारित ऑनलाइन शेती उपयोगी वस्तू मूल्य माहिती प्रणाली आहे. इंग्रजी व कानडी भाषेत, दर रोज संध्याकाळी ४ वाजतां हे बाजाराप्रमाणे किंमतींची माहिती देते.
या पोर्टलच्या माध्यमाने मिळालेल्या माहितीचा उपयोग व्यापारी व शेतकरी त्यांच्या शेतकी उत्पादांचे मूल्य स्थिर करण्यासाठी करीत आहेत.जास्त माहितीसाठी कृपया : http://maratavahini.kar.nic.in/
खाद्य, नागरिक पुरवठा व उपभोक्ता प्रकरण विभागाने ‘आहार’ प्रकल्पाची सुरूवात केली आहे. हा वेब आधारित उपक्रम सरकारची खाद्य निती, गरीबी रेषेच्या खालच्या (बी.पी.एल.) लोकांपर्यत नेण्यासाठी व लोकप्रिय करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. विभाग ५० लक्षांपेक्षा जास्त बी.पी.एल. कुटुंबांना खालील विषयांवर ऑनलाइन माहिती देतो:
जास्त माहितीसाठी कृपया : http://ahara.kar.nic.in/
नियंत्रकाचे कार्यालय (गणना प्रबंधन) व सरकारचे पूर्व-कार्यालयीन सचिवांनी, राज्याच्या कामांना दिशा देण्यासाठी व एकत्रित करण्यासाठी वित्त विभागामध्ये लोकवित्त प्रबंधन आणि विश्वसनीयता वाढविण्यासाठी “ऑडिट मॉनिटरिंग सिस्टम ” ची सुरूवात केली आहे.
त्यांनी सरकारी विभागाच्या प्रतिक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी वेबसाइट विकसित केली आहे:
जास्त माहिती करीता : http://www.ams.kar.nic.in/
कर्नाटक सरकारच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (डी.एस.ई. आर.टी.), ने १०वी च्या वर्गासाठी ऑनलाइन पाठ्यपुस्तके पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
विभागाने उपलब्ध करविलेल्या पुस्तकांत – विज्ञान, हिंदी, इंग्रजी, कानडी, गणित, जीवशास्त्र, समाजशास्त्र, संस्कृत, मराठी, तामिळ, तेलुगू व उर्दू दहावीच्या वर्गासाठी आहेत उदा. कानडी, इंग्रजी, हिंदी, मराठी, तेलुगू, उर्दू व तामिळ सर्वसाधारण वर्गां साठी आहेत. ही सारी पुस्तके पी.डी.एफ. फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत.
जास्त माहिती करीता : http://ktbs.kar.nic.in/
रायता मित्र, कर्नाटक सरकारचे एक पोर्टल शेतक-यांना दैनिक स्वरूपात चांगल्या पिकांसाठी युक्त्या, माहिती व बातम्या उपलब्ध करविते.
राज्यातील ७४५ रायता मित्र केंद्रांच्या माध्यमाने ही माहिती विनामूल्य पुरविली जाते.
जास्त माहितीसाठी कृपया http://raitamitra.kar.nic.in
शिक्षा विभागासाठी
कॅसेट – 2003, हे मेडिकल व इंजिनियरिंगच्या व्यावसायिक कॉलेजमध्ये दाखला मिळविण्या साठी सुविधा देणारे एक सॉफ्टवेअर आहे. गेल्या १० वर्षांपासून हा प्रकल्प काम करीत आहे. सी.ई.टी. चे साफल्या मुळे इतर डिग्री कोर्समध्ये जसे डिप्लोमा इंजिनियरिंग, नर्सिंग, आयुर्वेदिक, युनानी, आणि होमिओपॅथी मध्ये सल्ला व दाखल्याच्या दिशेने मार्गदर्शन मिळत आहे. ऑटोमेशनमुळे निकाल काढणे व दाखला देणे या मध्ये पारदर्शिता आली आहे.
वैशिष्ट्ये
जास्त माहितीसाठी : http://cet.kar.nic.in
आर्चीव्ह (अभिलेखागार) विभागासाठी
ई-आर्चीव्ह एक वेब आधारित कॅटलॉग सॉफ्टवेअर आहे, ५ लाखापेक्षा जास्त दस्तऐवजांसाठी हे एक पावरफुल फोनेटिक सर्च इंजिन आहे. सॉफ्टवेअर आर्चीव्ह विभागातर्फे १७व्या शतकांपासूनच्या मूल्यवान दस्तऐवजांची माहिती पुरविण्यासाठी सुरू करण्यात आले.
ही वेबसाइट कानडी व संस्कृत, राज्य अभिलेखागार, कर्नाटक गॅझेटियर, पुरातत्व व संग्रहालये, ऐतिहासिक वारसा, सूचनेचा अधिकार इ. ची संपूर्ण माहिती इंग्रजी व कानडी भाषेत पुरविते.
जास्त माहितीसाठी : http://kannadasiri.kar.nic.in
अंतिम सुधारित : 12/24/2019
आंध्रप्रदेश या राज्यातील ई-शासन आणि त्यांच्या वेब ...
विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मृत्यूचे प्रमाणपत्र वीज...
कार्यक्षम व्यवस्थापनासाठी - एकात्मिक संगणकीय माहित...
आधार कार्डाशी संलग्न असलेली 'ई-लॉकर' ही सुविधा महा...