অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पश्चिम बंगालमधील ई-प्रशासन

 

इ-प्रशासनाचा पुरस्कार करण्याच्या हेतूने, पश्चिम बंगाल सरकारने, विविध शासकीय खाती व निदेशालयांमध्ये, संगणकीकरणाचा स्वीकार केला आहे. ह्यामध्ये, अर्थ, श्रम, वाहतूक, पंचायत आणि ग्रामविकास, भूमी आणि भूमी सुधार, आय. आणि सी.ए., पर्यटन, वन, युवा सेवा, महापालिका, उच्चशिक्षण, पर्यावरण, गृह इ. चा समावेश आहे. भूमि अभिलेखांच्या संगणकीकरणाची सुरूवात, वर्घमान जिल्हयात एका लहान पथदर्शक प्रकल्पा पासून झाली. आता तिचा विस्तार पश्चिम बंगालमधील इतर सर्व जिल्हयात झाला आहे. राज्यातील ३४१ विभागांपैकी सध्या २३८ विभागांचे संगणकीकरण झालेले आहे. कॅडेस्ट्रल नकाशांचे अंकीकरण आता सुरू झाले आहे. तसेच भूमि संपादन माहिती प्रणालीही नुकतीच विकसित करण्यात आली आहे जिच्याद्वारे, भूमिसंपादन विषयक केसेसचा त्वरित निकाल लावणे शक्य झाले आहे. कॅडेस्ट्रल नकाशांच्या अंकीकरणासाठी हुगळी जिल्हयात एक लघु पथदर्शक प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. भूमि संपादन माहिती प्रणालीद्वारे, भूमिसंपादन विषयक अधिसूचना, प्रतिज्ञापत्र, भूमि अनुसूची, अंदाजपत्रक इ. ची जलद आणि कार्यक्षम पद्धतीने निर्मिती केली जाऊ शकते. ही पद्धती , राजारहाटच्या नव्या नागरी प्रकल्पासाठी, चाचणी म्हणून राबविली जात आहे.

टेलिमेडिसीन प्रकल्प : मिदनापूर

टेलिमेडिसीन ही अत्यवस्थ रूग्णांसाठी उपलब्ध असलेली, टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा उपयोग करून निर्माण केलेली अत्यंत उपयुक्त व्यवस्था आहे. ह्या योजने अंतर्गत पुरूलिया प्रांतातील रूग्णालय, एन.आर.एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि बरद्वान वैद्यकीय महाविद्यालय ह्यांच्याशी जोडले गेले आहे. रूग्णाची केस हिस्टरी इंटरनेटद्वारे वरिष्ठ केंद्रांना पाठविली जाते आणि त्या मार्गाने, संबंधित रूग्णालयाला औषधयोजनेची माहिती दिली जाते. आवश्यकता वाटल्यास संबंधित रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, इंरनेटद्वारा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करून वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञांचा थेट सल्ला घेऊ शकतात.

For more information .

स्मार्ट कार्ड

वेबेल सक्षम पश्चिम बंगाल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सुरू करण्यास सक्षम असलेले भारतातील पहिले राज्य आहे. केंद्र सरकारने, देशभरात ‘स्मार्ट कार्ड’ वर आधारित, वाहनचालक परवाना आणि वाहनांच्या नोंदणीची पद्धत लागू करून रस्ते वाहतुकीशी संबंधित वाहनांचे प्रमाणीकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हे काम ‘सारथी’ व ‘वाहन’ द्वारा केले जाते आणि त्यामुळे देशभरातील सदर व्यवस्थेत समानता आली आहे.

‘स्मार्ट कार्ड’ हे एक क्रेडिट कार्डच्या आकाराचे छोटे इलेक्ट्रॉनिक कार्ड आहे. ह्यात एक छोटा इलेक्ट्रॉनिक संस्कारक बसविलेला असतो जो आधार सामग्री /माहिती संग्रहित करून ठेवतो. जी कितीही वेळा वाचली, लिहिली जाऊ शकते.


‘स्मार्ट कार्ड’ चे खालील फायदे आहेतः

 • सोप्या पद्धतीने माहितीची साठवण व उपलब्धता
 • वाहकासोबत, स्वट्रॅकिंग, आधारसामग्री विनिमय प्रवाह
 • सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीची खात्री
 • मापनक्षम व आंतर कार्यप्रवण व्यवस्था
 • कर,दंड इ. भरल्यावर कार्ड लगेच अद्यायवत होणे
 • नक्कल प्रती आणि खोट्या सहयांवर पूर्ण नियंत्रण
 • देशभरात सर्व ठिकणी स्वीकार्य

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .

सरकारी खात्यांचे संगणकीकरण

सरकारी फायलींच्या प्रगतीची स्थिती, विभागीय कार्मिक व्यवस्था उभारणे,आणि अनेक शासकीय खात्यांमध्ये उपलब्घ निधीच्या वापरावर नियंत्रण ह्या तीन प्रमुख कारणांसाठी, वेबेल ही कंपनी पश्चिम बंगाल शासनाच्या संगणकीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. ह्या प्रक्रियेसाठी १६ खाती निवडण्यात आली आहेत. ह्यामध्ये, अर्थ, श्रम, वाहतूक, पंचायत आणि ग्रामविकास, भूमी आणि भूमीसुधार, आय.अँन्ड सी.ए., पर्यटन, वन, युवा सेवा, महापालिका, उच्चशिक्षण, पर्यावरण, गृह इ. चा समावेश आहे.

महापालिकांसाठी भौगोलिक माहिती व्यवस्था

राज्यातील १० महापालिकांमध्ये भौगोलिक माहिती व्यवस्थेची अंमलबजावणी झालेली आहे. पुजाली, कुरसिओंग, बजबज, कलिपोंग आणि बिधानगर येथील महापालिकांमध्ये अवकाशीय आधारसामग्री सर्वेक्षण आणि भौगोलिक माहिती व्यवस्थेची अंमलबजावणी सध्या पूर्ण झालेली आहे.

माहितीकेंद्रे / वेबसाइट्स च्या माघ्यमातून जनसंपर्क पटल

पश्चिम बंगाल शासनाची अधिकृत वेबसाइट शासनाचे विविध क्षेत्रातील पुढाकार आणि अन्य तपशील नागरिकंना पुरविते. विविध शासकीय खात्यांच्या आणि संपर्क पटलांच्या वेबसाइट्स, वेबेलमुळे आणि माहिती केंद्रांमुळे सुकर झालेल्या आहेत.

उच्च शिक्षण विभाग
ह्या विभागासाठी, मूलभूत आधार सामग्री विकसित करण्यात आलेली आहे. विभागाच्या वेबसाइट व माहिती केंद्रातून स्पर्शपटल व आय.वी.आर.च्या सहाय्याने ह्या आधार सामग्री पर्यंत पोहोचता येते. महाविद्यालयां मधिल विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना ह्याचा खूप उपयोग होतो.

पर्यटन विभाग
पर्यटन विभागासाठी एका वेबसाइटचा आणि माहितीकेंद्राचा विकास झालेला आहे. पर्यटकांनासाठी हवी असलेली सर्व माहिती येथे पुरविली जाते. स्वदेशी तसेच विदेशी पर्यटकांना ह्याचा चांगला फायदा होतो. वेबेलने, वेब आधारित डब्ल्यु.बी.टी.डी.सी. सेवा उपलब्ध केली आहे ज्याद्वारे पर्यटक विश्राम गृहांमध्ये आरक्षण करता येते व इतरही माहिती मिळते.

सूचना व सांस्कृतिक कार्यविभाग
ह्या विभागासाठी एका स्पर्शपटल आधारित माहिती केंद्राची उभारणी झाली आहे. ह्या केंद्राद्वारे अनेक जनोपयोगी सेवा नागरिकांना पुरविण्यात येतात. बिधाननगर महापालिकेसाठी असे एक माहितीकेंद्र आणि वेबसाइट कार्यरत आहे, जिथून विविधप्रकारचे अर्ज व तक्रारींची नोंद ह्यासंबंधी माहिती उपलब्ध आहे.

भौगोलिक माहितीव्यवस्था

२० महापालिकांमध्ये ह्या व्यवस्थेची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. पुजाली, कुरसियोंग, कलिपोंग व बिधान नगर येथील महापालिकांचे अवकाशीय आधारसामग्री सर्वेक्षण आणि जी.आय.एस. ची अंमलबजावणी पूर्ण झालेली आहे.

संपर्कप्रवणता

आय.एस.पी. सेवेमार्फत राज्यातील मोठे उद्योग, शैक्षणिक संस्था, रूग्णालये, आणि इतर संस्था तसेच सामान्य नागरिक ह्यांना उत्तम दर्जाची इंटरनेट सेवा, रास्त दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही सेवा ग्रामीण भागातही उपलब्ध असून, त्याद्वारे, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधीही उपलब्ध होत आहेत. तसेच ज्ञानाची नवीन दालनेही उघडली जात आहेत. नागरिकांना शासनाशी संपर्क प्रस्थापित करणे सहज शक्य झाले असून आरोग्य आणि लोककल्याण सेवांमध्येही ह्या सोयीमुळे लक्षणीय सुधारणा झाली आहे. ग्रामीण भारताचे स्थान शहरी भारताला पूरक असावे ह्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे ज्या द्वारे, टेलि-शिक्षण, टेलि-मेडिसीन, इ-प्रशासन, मनोरंजन आणि रोजगार निर्मिती संबंधी सेवासुविधा ग्रामीण भागातही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अधिक माहितीसाठी वर क्लीक करा .

कोलकाता पोलिसांचे इंटरनेट आणि संगणक नेटवर्ककोलकाता पोलिस विभागाने, वेबेल कम्युनिकेशन लि. च्या सहाय्याने, ४५ पोलिस ठाणी, ५ विभागीय कार्यालये, ३० इतर बटालियन कार्यालये आणि सहाय्यक आयुक्तांची कार्यालये ह्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी, गुन्हगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता यावे, दैनंदिन कामकाजाच्या नियंत्रणासाठी लालबाजार मधील उच्च अधिका-यांशी संपर्कात राहता यावे ह्या हेतूने, त्यांचे संगणकीकरण केले आहे. त्याचबरोबर पोलिस कर्मचा-यांसाठी एक अप्लिकेशन सॉप्टवेअर तयार करण्याचे कामही वेबेल वर सोपविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी वर क्लीक करा..

पश्चिम बंगालमधील राज्यव्यापी, क्षेत्रीय माहितीजाळे WEBSWAN

पश्चिम बंगालमधील राज्यव्यापी, क्षेत्रीय माहितीजाळे वेबस्वान हे राज्यशासनाचे आय.पी. आधारित माहितीजाळे असून राज्यभरातील आधारसामग्री व दृश्य-श्राव्य संप्रेषणाचा प्रमुख आधार आहे. राज्यशासनातर्फे इ-प्रशासनाचे कार्य ह्याच माहितीजालाचा वापर करून केले जाते.

वेबस्वान ची प्रमुख वैशिष्ठये

 • हे माहितीजाल, कोलकात्यातील स्विचिंग सेंटरहून, सर्व जिल्हा मुख्यालये तसेच काही महत्वाच्या शहरांना, २ एम.बी.पी.एस.(ई-लिंक) बी.एस.एन.एल. लीज लाईनद्वारा, आधारसामग्री, दृष्य-श्राव्य सामग्री संप्रेषणाची सुविधा उपलब्ध करून देते.
 • सर्व विभागीय मुख्यालयांना, जिल्हा मुख्यालयांशी, ६४ के.बी.पी.एस.  लीज लाईनद्वारा जोडले जाईल.
 • वेबस्वान च्या पुढील टप्प्यामध्ये, निवडक पंचायत कार्यालयांना त्यांच्या विभाग मुख्यालयांशी जोडले जाईल.
 • कोलकात्यातील एम.सी.यु. (मल्टीपाँईंट काँन्फरन्सिंग युनिट) तर्फे, राजधानी कोलकाता तसेच सर्व जिल्हा मुख्यालयां मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि मल्टि-कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
 • सर्व स्तरांवर संपर्क प्रवणतेचा प्रसार व्हावा म्हणून प्रावधान करण्यात आलेले आहे.

वेबस्वान अप्लिकेशन आणि सेवा

 • शासनाचे सर्व विभाग, निदेशालये, ह्या विभागांची पश्चिम बंगालमधील
 • कार्यालये व निदेशालये ह्यांना उच्च दर्जाची संपर्कसेवा पुरवणे.
 • शासनाचा ए.एस.पी. (अँप्लीकेशन सर्विस प्रोवाईडर) उपक्रम ह्याच माहितीजालावर आधारित राहील.
 • सरकार-नागरिक, सरकार-उद्योगक्षेत्र ह्यांच्यातील परस्पर संपर्क तसेचयंत्रणेची कार्यक्षमता वाढवणारा माहितीचा ओघ ह्यामुळे प्रशासन अधिक प्रभावी, कार्यप्रवण आणि पारदर्शी होण्यास मदत होईल.

अधिक माहितीसाठी वर क्लीक करा.

ब्रेल संबंधी सहाय्य

अंध विद्यालयांसाठी, ‘माहितीतंत्रज्ञान आधारित ब्रेल शिक्षण आणि त्यासाठी आवश्यक संसाधनांमध्ये वाढ’ ह्या प्रकल्पांतर्गत, वेबेल मिडिआट्रॉनिक्स लिमिटेड, माहितीतंत्रज्ञान आधारित ब्रेल शिक्षणाची पायाभूत व्यवस्था, २७ शाळा आणि २ वाचनालयांमध्ये करीत आहे.

माहिती तंत्रज्ञान विभाग, संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार; माहिती तंत्रज्ञान विभाग पश्चिम बंगाल शासन आणि जनसंवाद विभाग पश्चिम बंगाल शासन ह्यांनी हा प्रकल्प उभारण्यात सहाय्य केले आहे.

ब्रेल शिक्षणाच्या पायाभूत व्यवस्थेचा विकास

 • अंधांसाठी कार्य करणा-या ७० संस्थांमधे प्रगत तंत्रज्ञान आणि इंटरनेट जोडणी ह्यांची स्थापना करून वेबेलने, देशभरात एक संपर्कजाल प्रस्थापित केले आहे. ज्याद्वारे अंधव्यक्तींना माहिती तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने ब्रेल मधून शिक्षण देता येईल.
 • ह्या संस्था, संस्थेमधील व संस्थेबाहेरील जास्तीजास्त लोकांना, ब्रेलमधील पाठ्यसामग्री आणि ब्रेलमधून शिक्षण देण्याची व्यवस्था करतील.
 • दृष्टिहीन व्यक्ती ब्रेलमधील आधारसामग्री, हया केंद्रांमधून किंवा ह्या प्रकल्पातील वाचनालयातून घेऊ शकतील.
 • ही केंद्रे स्वतः संसाधनांची निर्मिती करतील तसेच अशा इतर केंद्रांशी इंटरनेटद्वारा माहितीचे आदान प्रदान करतील ज्यातून संसाधनांचा, एक राष्ट्रीय स्तरावरील साठा तयार होईल.
 • For more informationCLICK HERE.

  http://www.wbgov.com/e-gov/English/EnglishHomePage.asp
  http://www.itwb.org
  http://www.webel-india.com
  http://www.purulia.gov.in/egov/egov_initiative.html

   

  अंतिम सुधारित : 6/5/2020  © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate