हिमाचल प्रदेशमधील ई-प्रशासन ई-समाधान
जनतेच्या तक्रारी ऑनलाइन सोडवणे
संबंधित खात्याकडे तक्रारअर्ज ऑनलाइन पाठवणे
तक्रार/मागणी अर्जाची स्थिती तपासणे
आपला तक्रारअर्ज ऑनलाइन पाठवण्यासाठी
येथे क्लिक करा
सुगम एकात्मिक सांप्रदायिक माहिती केंद्र
महत्वाच्या सर्व नागरी सेवांसंबंधीची महिती एकाच ठिकाणी उपलब्ध
खालील प्रकारच्या सुविधा उपलब्ध - उच्च न्यायालयीन वाद-यादी (कॉजलिस्ट), व्यावसायिक तसेच नागरी सुविधांसंबंधीच्या अर्जांची विधानसभा-यादी, परीक्षांचे निकाल, मतदारांची नोंदणी, ऑनलाइन पोलिस तक्रारी, निवृत्तिवेतन धारकांसाठी हेल्पलाइन म्हणजे दूरध्वनीवरून मदत, निविदा सूचना, नोकरीविषयक प्रकटने, विजेचे बिल भरणे, रक्तदात्यांची यादी, बसच्या तिकिटाचे ऑनलाइन आरक्षण इ.
वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी
येथे क्लिक करा
ई- राजपत्र
राज्य सरकारच्या अधिसूचना तसेच राजपत्र हिंदी आणि इंग्रजी भाषांत उपलब्ध.
विभाग आणि दिनांकानुसार अधिसूचना तसेच राजपत्र पाहण्याची सोय.
हे दस्तऐवज पीडीएफ स्वरुपामध्ये असून ते सहजपणे अधिभारण (डाउनलोड) करता येतात.
अधिसूचना तसेच राजपत्र वाचण्यासाठी
येथे क्लिक करा
हिमाचल प्रदेश पोलिस वेब पोर्टल
तक्रार तसेच माहितीची ऑनलाइन नोंदणी
प्राथमिक माहिती अहवाल महणजे एफआयआर ऑनलाइन शोध घेणे
वाहतूक-नियमविषयक चलनाची रक्कम ऑनलाइन भरणे
राज्यातील पोलिस अधिकार्यांचे दूरध्वनी क्रमांक
२००६ सालापासूनचे गुन्हेगारीविषयक राजपत्र ऑनलाइन
वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी
येथे क्लिक करा
निवृत्त व्यक्तींसाठी ऑनलाइन हेल्पलाइन
आर्थिक वर्षासाठी निवृत्तीवेतनाचा तपशील
२००६-०७ ह्या आर्थिक वर्षापासून आजपर्यंतचे हे तपशील उपलब्ध आहेत
नियत सेवाकाळ भत्ता, थेट कुटुंब निवृत्तीवेतन, राजकीय निवृत्तीवेतन, थेट राजकीय -कौटुंबिक निवृत्तीवेतन अथवा कौटुंबिक निवृत्तीवेतनास जोडून नियत सेवाकाळ भत्ता मिळणारी कोणीही व्यक्ती ह्या आर्थिक वर्षासाठीच्या तिच्या निवृत्तीवेतनाचा तपशील पडताळून पाहू शकते.
आपली निवृत्तीवेतनाची रक्कम पडताळण्यासाठी येथे क्लिक करा अथवा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा.
ऑनलाइन मतदारयाद्या
ऑनलाइन मतदारयादीत आपले नाव शोधा. त्यामध्ये आपण फक्त स्वतःचेच नाव टाकू (एंटर करू) शकता.
मतदाराची संपूर्ण माहिती मिळते - नाव, वडिलांचे नाव, वय, ओळखपत्र क्रमांक, विधानसभा नाव, विभाग क्रमांक, मतदारयादीतील अनुक्रमांक इ.
छायाचित्र असलेल्या ओळखपत्राच्या क्रमांकानुसार मतदारयादीत नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा
मतदार म्हणून आपली नोंदणी करण्यासाठी
येथे क्लिक करा
ऑनलाइन निविदा
विभागवार निविदा अधिसूचना
सर्व निविदा पीडीएफ स्वरुपामध्ये असून त्या सहजपणे अधिभारीत (डाउनलोड) करता येतात.
बसच्या तिकिटाचे ऑनलाइन आरक्षण
लॉगइन केल्यानंतर बसच्या तिकिटाचे ऑनलाइन आरक्षण करणे किंवा तिकिट रद्द करणे.
बस सुटण्याआधी १२ तासांपर्यंत आरक्षण करण्याची सुविधा आज उपलब्ध आहे.
रद्द करण्याची प्रक्रिया मात्र आरक्षण-तक्त्यावरूनच करता येते.
आपल्या बसतिकिटाचे आरक्षण करण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षांचे निकाल
राज्य शासकीय संस्थांद्वारे विविध पातळीवर घेतल्या जाणार्या परीक्षांचे निकाल.
माध्यमिक, शालांत, अकरावी, बारावी, पदवी, राज्य लोकसेवा आयोग तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठीच्या प्रवेशपरीक्षांचे निकाल.
रोजगार वार्ता
नोकर्यांचे अर्ज भरण्यासाठी तसेच नोकरी देणार्यांना त्यांच्याकडील रिकाम्या जागांची महिती प्रसारित करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी.
करिअरविषयक समुपदेशन आणि नवीनतम उपलब्ध नोकर्यांबाबतची माहिती.
संकेतस्थळ (वेबसाइट) निर्देशिका
राज्य शासनाचे विभाग, संस्था, जिल्हे इ. ची वेबसाइट निर्देशिका.
निर्देशिकेची वर्गवारी ह्याप्रमाणे केली आहे - केंद्र शासनाच्या संस्था, राज्याचे विभाग, महामंडळे, आयोग, न्यायालये, राज्य विधानसभा, शैक्षणिक संस्था, जिल्हे इ.
ऑनलाइन हॉटेल आरक्षण
हॉटेलमधील खोलीचे ऑनलाइन आरक्षण करणे.
क्रेडिट कार्डद्वारे रक्कम भरण्याची सोय.
ई-वेतन
कर्मचारी एखाद्या निवडलेल्या कोषागारामधून विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये घेतलेल्या वेतनाचा तपशील मिळवू शकतो.
कर्मचारी आपला क्रमांक, नाव आणि कोषागाराचे नाव टाकून (एंटर करून) ही माहिती मिळवू शकतो.
ऑनलाइन न्यायालयीन सेवा
- हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयातील दैनिक तसेच मासिक वाद-यादी
- शिमला येथील जिल्हा सत्र न्यायालयाची (सेशन कोर्टाची) वाद-यादी
- हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे निवाडे
उच्च न्यायालयाचे निवाडे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
विजेचे बिल ऑनलाइन भरणे
- विजेचे बिल ऑनलाइन भरणे.
- पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर रक्कम भरता येईल.
आपले विजेचे बिल ऑनलाइन भरण्यासाठी येथे क्लिक करा
मतदारांची ऑनलाइन नोंदणी
- मतदारांना मतदार सूचीमध्ये त्यांच्या नावाची ऑनलाईन नोंदणी करण्या करिता ही सोय करण्यात आलेली आहे.
- ते त्यांच्या नावात किंवा पत्त्यत कोणताही बदल करण्याकरिता ऑनलाईन मागणीअर्ज देखील देऊ शकतात.
आपले नाव मतदान सूचीत नोंदवण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
हिमाचल प्रदेशातील उच्च न्यायालयातील मामल्याची स्थिती
हिमाचल प्रदेशाच्या उच्च न्यायालयाची सूचना प्रणाली तयार करण्यात आली आहे, ज्यात, आंतरजालावर (इंटरनेटवर) वकील, सार्वजनिक वादी आणि बाकीच्या कनिष्ठ (खालच्या) न्यायालयाचे न्यायाधीश प्रलंबित मामले आणि निकाली मामल्यांबद्दल माहिती मिळवू शकतात. आवश्यक माहिती मोठ्या डेटाबेस मधून एनआयसी NIC च्या मदतीने मिळवली गेली आहे, जी हिमाचल प्रदेशाच्या उच्च न्यायालयाने तयार केली आहे आणि याचे व्यवस्थापन (रजिस्ट्री) हिमाचल प्रदेशाच्या उच्च न्यायालयाद्वारे ठेवण्यात येते.
मामल्याबाबत माहिती खालील प्रमाणे मिळविता येईल :
- मामला क्रमांक
- शीर्षक (वादी/प्रतिवादीचे नाव)
- वकिलाचे नाव
- खालील न्यायालयांची माहिती
ह्यात मामल्याच्या परिस्थितीवरुन त्या मामल्याची सध्याची माहिती मिळू शकते. ही खालील प्रमाणे असेल :
- वादी-प्रतिवादींची नाव
- वकिलांची नावे
- विषय प्रकार
- निकाली केल्याचा दिनांक
- स्थगिती
- अखेरीस सूचीबद्ध केल्याचा दिनांक
- प्रतीक्षा स्थिती
- सुनावणीची पुढील तारीख
- डायरी क्रमांक.
हिमाचल प्रदेशाच्या उच्च न्यायालयातील मामल्यांच्या स्थितीचा तपास करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
जिल्हा न्यायालयांची कारण सूची
- जिल्हा न्यायालायांची दैनिक मामले सूची यावरुन मिळते.
- मामले सूची फक्त इंग्रजीतूनच मिळू शकते.
- विलासपुर, चंबा, हमीरपुर, कांगड़ा, किन्नौर, कुलू व लहाऊ-स्पीति, मंडी, शिमला, सिरमौर, सोलन आणि उना ह्या जिल्ह्यातील दैनिक मामले सूची ऑनलाईन मिळू शकते.
आपल्या जिल्हा न्यायालयाच्या मामले सूचीसाठी या लिंकवर क्लिक करा
ई-रोजगार
- आपण आपल्या जवळच्या रोजगार विनिमय केंद्रामध्ये नाव नोंदणी करु शकता.
- नोंदणीकृत सभासददेखील त्यांचे तपशील पाहू शकतात.
- नोकरी देणारेदेखील उमेदवार शोधण्यासाठी नोंदणी करु शकतात
- नवीनतम पद भर्तीच्या जागांची सूची पहायला मिळू शकते.
ई-वेतन
- हिमाचल प्रदेशातील सरकारी कर्मचारी त्यांच्या वेतनाबाबतची, विशिष्ट आर्थिक वर्षासाठीची, माहिती निवडलेल्या राजकोषातून प्राप्त करु शकतो.
- माहिती मिळविण्यासाठी त्यांना त्यांचा कर्मचारी कोड, कर्मचारी नाव आणि राजकोषाचे नाव दिलेल्या सूचीतून निवडावे लागेल.
निवृत्तांसाठी हेल्पलाइन
- निवृत्तिवेतन मिळणा-या व्यक्ती आपले निवृत्तिवेतन आपल्या खात्यात जमा झाले की नाही हे तपासून पाहू शकतात.
- निवृत्तांना आपल्या जिल्ह्याचे नाव, निवृत्तिवेतनाचा प्रकार आणि पीपीओ क्र. तसेच नाव ही माहिती द्यावी लागेल
निवृत्तिवेतनाबद्दल माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा